लादेन पाकिस्तानात असल्याचं आम्हाला माहीत होतं : इम्रान खानची कबुली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पाकिस्तानने पहिल्यांदाच अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता अशी धक्कादायक कबुली दिली आहे
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत, पाकिस्तानी संघटना आयएसआयनेच अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेला लादेनच्या पाकिस्तानातील पत्त्याची माहिती दिली होती असा दावा केला आहे.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा २०११ रोजी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून खात्मा केला होता.
तेव्हापासूनच आपल्याला लादेनच्या पाकिस्तानातील वास्त्यव्याबद्दल काहीच कल्पना नव्हती असे म्हणत कानावर हात ठेवले होते.
परंतु सध्याचे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी लादेनच्या वास्तव्याची पाकिस्तानला कल्पना होती आणि पाकिस्तानने अमेरिकेला केलेल्या मदती मुळेच लादेनला मारणे अमेरिकेला शक्य झाल्याचे सांगितले.

इम्रान खान सध्या अमेरिका दौ-यावर आहेत, त्यांनी अमेरिकी न्युज एजेन्सी फॉक्स न्यूज ला मुलाखत दिली या मुलाखती मध्ये लादेनची माहिती सीआयए ला पुरविणा-या डॉ.
शकील आफ्रिदीची सुटका पाकिस्तान करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शकील आफ्रिदीला पाकिस्तान गुप्तहेर समजतो असे उत्तर दिले.
विशेष म्हणजे लादेनचा शोध घेण्यासाठी डॉ. शकील आफ्रिदी वैद्यकीय तपासणी मोहिमेचं कारण देऊन घराघरांना भेटी देत होते. त्यातूनच लादेनचा ठावठिकाणा अमेरिकेला समजला.
यानंतर २ ऑक्टोबर २०११ च्या मध्यरात्री अमेरिकेच्या स्पेशल टीमनं लादेनचा खात्मा केला. सध्या आफ्रिदी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.
डॉ. शकील आफ्रिदीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तोरख़म सीमेवर अटक करण्यात आली. २३ मे २०१२ रोजी त्याला देशद्रोहाच्या ३३ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
डॉ. आफ्रिदिने १९९० मध्ये पेशावर येथील खैबर मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. डॉ. शकील आफ्रिदीची मुक्तता करावी यासाठी “फ्री डॉ. शकील आफ्रिदी नाऊ” या सदराखाली अनेक ऑनलाईन पिटीशन आणि वेब पेजेस तयार करण्यात आली आहेत.

आफ्रिदीवर पाकिस्तानचे आरोप अफरीदी पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर आदिवासी भागात जम्रुद हॉस्पिटलचे मुख्य सर्जन होते. जागतिक आरोग्य संघटनेचे अर्धा डझन कुलर बॉक्सेस परवानगी शिवाय घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला.
सदरचे बॉक्सेस हे लसीकरण मोहिमेसाठीचे होते परंतु एबोटाबाद किंवा खैबर प्रांतात अशी कोणतीही मोहीम त्यावेळी सुरु नव्हती.
६ ऑक्टोबर २०११ रोजी बिन लादेनच्या मृत्यूची चौकशी करणार्या पाकिस्तानी कमिशनने, उपलब्ध पुराव्याच्या आधारावर पाकिस्तानच्या राज्याविरुद्ध कट रचणे आणि राजद्रोह याचा असे आरोप ठेवले.
पाकिस्तानने अफ्रिदीची मालमत्ता जप्त केली. अफ्रिदीचे निवासस्थान पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सीलबंद केले आणि त्याचे कुटुंब एका अज्ञात स्थानावर गेले.
सुमारे आफ्रिदीला या खोट्या लसीकरण मोहिमेत मदत करणा-या सुमारे १५ महिला आणि पुरुष कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले.
पाकिस्तानी तपास अधिका-यांनी जुलै २०१२ मधील अहवालात सांगितले की आफ्रिदी २५ वेळा परदेशी गुप्तहेरांना भेटला आणि संवेदनशील माहिती त्यांना पुरवली. यावर आफ्रिदीने सांगितले सेव्ह दि चिल्ड्रन संस्थेने अमेरिकी गुप्तहेर एजेंटसशी भेट घडवून आणली मात्र सेव्ह दि चिल्ड्रनने हे फेटाळून लावले.

आफ्रिदीचे पाकिस्तानकडून शोषण फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा तो आयएसआय मुख्यालयात होता त्यावेळी सिगारेटचे चटके आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ करण्यात आला. मात्र आफ्रीदिच्याच वकिलांनी मुलाखतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
फॉक्स न्यूज रिपोर्टर दि-नटाले याला पाकिस्तानने काळ्या यादीत टाकून देशात परत येण्यास बंदी घातली. तर निर्माता सिब कैफे यांना देशातून पळ काढण्यास भाग पाडले होते.
३० मे २०१२ रोजी, अफ्रिदी यांना सीआयएच्या मदतीसाठी नाही तर बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-इस्लामच्या मदतीसाठी ३३ वर्षांची शिक्षा आणि २ लाख ३० हजार रुपये दंड ठोठवण्यात आला.
नोव्हेंबर २०१२ च्या अखेरीस पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून यांनी अफगाणिस्तान येथील पेशावर तुरुंगातील स्थितीबद्दल उपोषण केले.
फॉक्स न्यूज रिपोर्टर दि-नटाले आणि सिब कैफे यांनी सांगितले त्यांनी आफ्रिदीची तुरुंगात असताना फोनवर तीन वेळा मुलाखत घेतली. आफ्रिदीला मोबाईलवर बोलू दिल्याने २ तुरुंग रक्षक आणि तुरुंग अधिकारी यांना निलंबित करण्यात आले.
तत्कालीन सीआयए अध्यक्ष लिओन पॅनेटा जे आताचे अमेरिकेचे संरक्षण सचिव आहेत त्यांनी डॉ. आफ्रिदीची एबोटाबादमधील लादेनचा ठावठिकाणा शोधून काढण्यात असलेली महत्वाची भूमिका मान्य केली.

हिलरी क्लिंटन यांनी देखील आफ्रीदिला कैदेत ठेवण्याचे काहीच कारण नसल्याचे सांगितले. अमेरिकेने पाकिस्तानला देत असलेल्या मदतीत ३३ दशलक्ष डॉलर्सची कपात केली ही कपात आफ्रिदीला दिलेल्या ३३ वर्ष शिक्षेच्या प्रतिवर्ष १दशलक्ष डॉलर या प्रमाणे होती.
२०१२ मध्ये अमेरिकेने त्यांच्या ताब्यात असलेल्या आफ्रिया सिद्द्दीकीला सोपवण्यच्या बदल्यात आफ्रिदीला सोडण्याची विनंती केली, मात्र पाकिस्तानने ही विनंती धुडकावून लावली.
(डॉ. शकील आफ्रिदी) आफ्रिदीला ज्या लष्करे इस्लाम संघटनेची संबंध असल्याचा आरोपाखाली ३३ वर्षांची शिक्षा दिली, त्या संघटनेने मात्र डॉ. आफ्रिदीशी कोणत्याही संबंधाचा इन्कार केला.
उलट अशा निर्ल्लज माणसाला (लादेनला मारण्यास मदत करणा-या ) आम्ही मारून टाकू असा दावा केला.

पाकिस्तान सुरवातीपासून लादेन त्याच्या भूमीत राहत असल्याची माहिती नव्हती असा दावा करीत असताना आणि त्याची माहिती अमेरिकी सीआयएला पुरवणा-या डॉ. शकील आफ्रिदीला ३३ वर्षाची शिक्षा ठोठावली.
असे असताना आता अमेरिकेत जाऊन इम्रान खानने सांगितले की पाकिस्ताननेच लादेनची माहिती सीआयएला दिली.
हे सांगून त्यांनी स्वताचेच हसू करून घेतले आहे हे वेगळे सांगायला नको.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.