पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या या भारतीय “फायटर पायलट” ची कथा वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या आणि धाडसाच्या अनेक रोमांचक कथा ऐकायला मिळतात. अशीच एक रोमांचकारी कथा आहे बंगाली फायटर पायलट इंद्रा लाल उर्फ लॅडी रॉय या तरुण, तडफदार, तरबेज वैमानिकाची!
लंडनमधील केन्सिंग्टन येथे स्थायिक झालेल्या रॉय कुटुंबाच्या कानावर युद्ध सुरु झाल्याच्या बातम्या येऊन धडकत होत्या.

युद्धाबाबत रॉय कुटुंबाच्या भावना काहीशा संमिश्र स्वरूपाच्या होत्या. लॅडचे वडील एक नामवंत बॅरीस्टर आणि कलकत्ता येथील सार्वजनिक अभियोजनचे संचालक होते.
मुलांना चांगले इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून १९०१ सालीच या कुटुंबाने लंडनला स्थलांतर केले होते.
लॅडीच्या वडलांना मुलांनी शरीराने तांदरुस्त आणि मजबूत असावं असं वाटायचं. त्यांनी मुलांना सायकलिंग आणि घोडेस्वारी आवर्जून शिकवली.

मुलांना सानाजातील चांगल्या रीतीभाती आणि शिष्टाचाराशी ओळख व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी एक खाजगी शिक्षिका देखील नेमली होती.
शालेय जीवनात देखील लॅडी रग्बी खेळण्यात आणि पोहण्यात निष्णात होता. या सुखवस्तू कुटुंबाच्या आरामशीर जगण्यावर युद्धाच्या बातम्यांचा मात्र परिणाम होऊ लागला.
१५ वर्षांच्या इंद्राने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. नुकतीच पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाने परेशने देखील हेच केले होते.
“बंगाली देखील किती शूर असतात आणि इतर सैनिकांप्रमाणे ते देखील युद्धभूमीवर लढू शकतात हेच मला दाखवून द्यायचं आहे,” असे परेश म्हणत असे.
इंद्राने सेंट पॉल शाळेतील स्कूल कॅडेटफोर्स मध्ये आपले नाव देखील नोंदवले. युध्द सुरुच राहिले तर आपल्यालाही त्यात सहभागी होऊन काही तरी करायचे आहे, याचा त्याने ठाम निश्चय केला होता.
त्याला ऑक्सफर्डची स्कॉलरशिप मिळालेली असूनही सैन्यात जाऊन फायटर पायलट व्हायचे हेच त्याच अंतिम ध्येय होतं.
लॅडीने रॉयल फ्लायिंग कॉर्प्समध्ये भारती होण्यासाठी अर्ज देखील केला पण, त्याची नजर कमजोर असल्याचे कारण देत, त्याला फ्लायिंग कॉर्प्समध्ये नाकारण्यात आले.

पण, पायलट बनण्याची त्याही जिद्द इतकी तीव्र होती की, त्याने आपली मोटारबाईक विकून देशाच्या प्रसिद्ध नेत्रतज्ञाकडून पर्यायी चाचणी करून घेतली आणि तो नेत्रचाचणी पास झाला.
त्याने ही चाचणी पास केल्याने फ्लायिंग कॉर्प्सला आपला निर्णय बदलून त्याला भारती होण्यास परवानगी दिली. ४ एप्रिल १९१७ रोजी, रॉयल फ्लायिंग कॉर्प्समध्ये रुजू झाला.
जुलै मध्ये त्याला लेफ्टनंटपदी बढती देण्यात आली आणि व्हेन्डोम मध्ये त्याचे पोस्टिंग झाले, तेंव्हा तो फक्त अठरा वर्षांचा होता.
आकाशातील शक्य तितक्या जर्मन विमानांना पाडणे हेच त्याचे एकमेव ध्येय होते. लवकरच तो आकाशात कर्टीस, सोपिथ कॅमल आणि अॅव्रोसारखी लढाऊ विमाने तो लीलया आकाशात गिरक्या मारत असे. त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी पटीने साहसी प्रदर्शन करत असे.
६ डिसेंबर १९१७ रोजी, लॅडीचे विमान जर्मन फायटर विमानाकडून पडले गेले आणि तो नो मॅन्स लँडवर जाऊन पडला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करून मृत समजून आहे त्याच परिस्थितीत सोडून देण्यात आले.

परंतु, काही वेळाने लॅडीला शुद्ध आल्यानंतर त्याने त्या शवागाराचा दरवाजा ठोठावला आणि सगळा हॉस्पिटल स्टाफ हादरून गेला. त्याला पुढील उपचारासाठी इंग्लंडला परत पाठवण्यात आले.
या धक्क्यातून सावरत असताना लॅडीने आपल्या आवडत्या विमानांच्या ऐवजी यावेळी स्पोर्ट कारचे भरपूर स्केचेस बनवले.
त्याच्या या अपघातानंतर लॅडी विमान चालवण्यास असक्षम असल्याचे घोषित करण्यात आले. परंतु, मृत्युच्या जबड्यातून परत आलेल्या या बंगाली वाघाला “नाही” हे उत्तरचा माहित नव्हते.
तो इतर अधिकार्यांना जेव्हा विमान चालवताना पाहत असे तेव्हा त्यालाही पुन्हा एकदा आकाशात विहार करण्याची इच्छा होई. आपली सर्व हट्टीपणा आणि ताकद पणाला लावून आपल्या अधिकाऱ्यांचे मन वळवण्यात तो यशस्वी ठरला.
पुन्हा एकदा १९१८ च्या जून मध्ये तो वैद्यकीय चाचणीत पास झाला आणि फ्रान्सला जाणार्या नं. ४० स्क्वॅड्रन वर टेम्परारी लेफ्टनंट म्हणून हजर झाला. यावेळी मात्र आपण आपला छाप उमटावायाचाच अशी खून गाठ त्याने मनाशी बांधली होती.
कॅप्टन जॉर्ज मॅक्लेरॉय यांच्या मार्गदर्शनाखाली लॅडीला कठोर प्रशिक्षण देण्यात आले. अल्प्वाधीतच लॅडीने स्वतःला एक उत्तम फायटर पायलट म्हणून सिद्ध केले.

६ जुलै रोजी त्याने फ्रांसच्या उत्तर भागात पहिल्या जर्मन विमानाचा पाडाव केला. त्याच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्याच्या सहकार्यांकडून त्याला अमाप स्तुती मिळाली. यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही.
९ जुलै ते १९ जुलै या दहा दिवसांत, अवघ्या १७० तासांच्या कालावधीत त्याने एकूण नऊ जर्मन विमानांचा पाडाव केला आणि विमान चालवण्याच्या कौशल्यात अत्यंत निपुण आणि तरबेज असणारा पहिला भारतीय म्हणून नाव लौकिक देखील मिळवला.
युद्ध संपण्याच्या एक महिना अगोदर लॅडी फ्रान्सच्या करवीन येथील खंदक खोदलेल्या प्रदेशावरून अआपल्या लढाऊ विमानातून आकाशाकडे झेपावला तोच, चारही बाजूनी जर्मन सैन्याच्या विमानाने त्याला घेरले.
त्यांच्यात अतिशय घनघोर लढाई झाली, पण, लॅडीच्या विमानाने पेट घेतला आणि ते जर्मनच्या सीमारेषेत कोसळले. ही त्याची शेवटची झेप होती, तेंव्हा लॅडीचे वय अवघे १९ वर्षांचे होते.
भग्न झालेल्या विमानाच्या अवशेषात य बेंगाली तरुणाचा देह शांतपणे पहुडला होता. बंगाली लोकांमध्ये देखील लढाऊ बाणा असतो हे लॅडीने सिद्ध केले होते.

त्याच्या आईला पत्राद्वारे हे दुखःद वार्ता काळवताना, लॅडीच्या कमांडर अधिकर्यांनी लिहिले,
“त्याने स्क्वॅड्रन जॉईन केल्यापासून जर्मन विमानांचा पाडाव करणे हेच एक ध्येय ठेवले. आपले कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे जर्मनची नऊ विमाने पाडण्यात तो यशस्वी ठरला. तो इथे आल्या नंतर ही एक अद्भुत नोंद त्याच्या नावावर नोंदली गेली.
–
मला खात्री आहे की, इथे जितका काळ त्याने घालवला तो खूप आनंदी होता. स्क्वॅड्रनच्या प्रत्येक अधिकार्याला आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाने भरलं घातली होती.”
सप्टेंबर १९१८ मध्ये आरएएफने अधिकृत रित्या लॅडीला मृत घोषित केले. तीन दिवसानंतर त्याला त्याने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल डिस्टिंगिश्ड फ्लाइंग क्रॉस हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डीएफसीचा सन्मान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. ब्रिटन मधील हा तिसरा अत्युच्च सन्मान समजला जातो.

त्याला हा सन्मान प्रदान करताना करण्यात आलेल्या उद्धारणात, असे म्हंटले गेले,
“एक अत्यंत पराक्रमी आणि निश्चयी अधिकारी, ज्याने फक्त तेरा दिवसांत शत्रूचे नऊ विमाने पाडली. या सगळ्या प्रक्रियेत त्याने आम्हाला त्याच्यातील अद्भुत कौशल्याचा साक्षात्कार घडवला. एकाच वेळी दोन मशीन्स पडण्याचे अभूतपर्व कामगिरीही त्याने करून दाखवली.”
१९९८ साली त्याच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भारत सरकारने देखील त्यांच्या नावाचा स्टॅप प्रसारित केला होता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.