Site icon InMarathi

चंद्रावर तब्बल २१ वेळा अभ्यासासाठी अवकाश पाठवणारे भारतासह अनेक देश आहेत. कोणते देश?

man-on-moon-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२२ जुलै २०१९ रोजी भारताने यशस्वीपणे चंद्रयान २ अवकाशात सोडले आहे. चंद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. चंद्राची ही बाजू अभ्यासणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

चंद्रावर झेंडा रोवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. ह्या आधी अमेरिका, सोव्हिएत आणि चीन ह्या देशांनी सुद्धा चंद्राचा पृष्ठभाग अभ्यासण्यासाठी यशस्वीपणे अवकाशात याने पाठवली आहेत.

ह्या आधी तब्बल २१ वेळेला चंद्राचा अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या दिशेने याने पाठवण्यात आली आहेत. आज ह्या २१ “मून मिशन्स” बद्दल माहिती घेऊया.

 

 

सर्वप्रथम अमेरिकेने केव्हा व किती वेळेला चंद्राच्या दिशेने अवकाशयाने पाठवली आहेत ह्याबाबतीत माहिती घेऊया.

१. सर्व्हेअर १

सर्व्हेयर वन हे नासाचे पहिले ल्युनर सॉफ्ट लँडर यान होते. ते ३० मे १९६६ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते. हे मानवरहित यान होते. अमेरिकेने चंद्राचा पृष्ठभागाचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी ल्युनर सॉफ्ट लॅन्डर चंद्रावर पाठवले होते.

कारण १९६९ साली अमेरिका अपोलो ह्या अवकाशयानातून पहिल्यांदा अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार होती. अपोलो हे यान चंद्रावर उतणार होते.

त्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागाची अचूक माहिती असणे आवश्यक होते. म्हणून सर्व्हेयर वन हे चंद्रावर पाठवण्यात आले.

 

 

२. सर्व्हेअर ३

सर्व्हेअर ३ हे विमान चंद्रावर जाणारे तिसरे यान होते. हे सुद्धा मानवरहित होते आणि सर्व्हेअर प्रोग्रॅममधील तिसरे यान होते. हे यान १७ एप्रिल १९६७ साली अवकाशात सोडण्यात आले.

 

 

ह्या यानाद्वारे इतिहासात पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तिथल्या मातीचे / पृष्ठभागाचे नमुने घेण्यात आले. अवकाश संशोधनाच्या इतिहासातील ही खूप मोठी प्रगती होती.

 

३. सर्व्हेअर ५

अमेरिकन मानवरहित सर्व्हेयर प्रोग्रॅममधील सर्व्हेयर ५ हे चंद्रावर उतरणारे पाचवे यान होते. हे यान केप कॅनावेरल येथून ८ सप्टेंबर १९६७ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते.

चंद्राच्या पृष्ठभागावरील Mare Tranquillitatis येथे ते यान उतरले आणि त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे १९११८ इतके फोटो पृथ्वीवर ट्रान्स्मिट केले.

 

 

४. सर्व्हेअर ६

सर्व्हेयर ६ हे यान ७ नोव्हेम्बर १९६७ रोजी पृथ्वीवरून अवकाशात सोडण्यात आले होते आणि ते चंद्रावरील सायनस मेडाय ह्या भागात उतरले. आपल्याला पृथ्वीवरून चंद्राचा जो गोलार्ध दिसतो त्या ठिकाणच्या मध्यावर हे यान उतरवण्यात आले होते.

सर्व्हेअर ६ हे अमेरिकेच्या मानवरहित सर्व्हेअर प्रोग्रॅम मधील सहावे यान होते जे यशस्वीपणे चंद्रावर उतरले होते. ह्या यानाने चंद्राच्या पृष्ठभागाची एकूण ३००२७ इतकी छायाचित्रे पृथ्वीवर ट्रान्स्मिट केली होती.

 

 

५. सर्व्हेअर ७

अमेरिकेच्या मानवरहित सर्व्हेयर प्रोग्रॅममधील सर्व्हेयर ७ हे शेवटचे अंतराळयान होते जे चंद्रावर पाठवण्यात आले होते. हे अंतराळयान ७ जानेवारी १९६८ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते.

ते Tycho ह्या विवराच्या बाह्य रिमच्या जवळ उतरले होते. हे विवर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात आहे.

 

 

६. अपोलो ११

अपोलो ११ हे यान १६ जुलै १९६९ रोजी केप केनेडी येथून अवकाशात सोडण्यात आले होते. इतिहासात पहिल्यांदाच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले.

नासाच्या अपोलो प्रोग्रॅममधील हे पाचवे मिशन होते ज्यात अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात आले होते.

 

 

७. अपोलो १२

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून अपोलो १२ हे या अवकाशात सोडण्यात आले होते. हे यान १४ नोव्हेम्बर १९६९ रोजी म्हणजेच अपोलो ११ नंतर चार महिन्यांनी अवकाशात गेले. ह्या यानात सुद्धा अंतराळवीर होते.

अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रॅममधील हे सहावे यान होते. चंद्रावर मानवासहित जाणारे व उतरणारे हे दुसरे यान होते. हे यान चंद्रावर उतरल्यानंतर अंतराळवीरांनी सर्व्हेयर ह्या यानाला भेट दिली आणि त्यातील काही भाग काढून घेतले जे नंतर पृथ्वीवर आणण्यात आले.

 

 

८. अपोलो १४

अपोलो १४ हे यान केनेडी स्पेस सेंटर मधून ३१ जानेवारी १९७१ रोजी अवकाशात सोडण्यात आले. ह्या यानात ३ अंतराळवीर होते. चंद्राच्या डोंगराळ प्रदेशात उतरणारे हे पहिले यान होते ज्यात अंतराळवीर सुद्धा होते.

हे अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रॅम मधील आठवे असे यान होते ज्यात अंतराळवीर सुद्धा होते.

हे मिशन अमेरिकेच्या “एच मिशन” मधील सर्वात शेवटचे मिशन होते. ह्या मिशनमध्ये चंद्रावर टार्गेटेड लँडिंग, दोन दिवस वास्तव्य आणि दोन वेळेला चंद्राच्या पृष्ठभागावर चालणे ह्या सर्वांचा अंतर्भाव होता.

 

 

९. अपोलो १५

हे यान २६ जुलै १९७१ रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच केले होते. हे अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रॅममधील नववे क्र्यूड मिशन होते. आणि “जे” मिशन मधील पहिले यान होते.

ह्या मिशनमध्ये चंद्रावर अधिक काळ वास्तव्य केले गेले आणि लँडिंग शिवाय वैज्ञानिक बाबींवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तसेच ह्या मिशन दरम्यान पहिल्यांदाच ल्यूनार रोव्हिंग व्हेकलचा उपयोग करण्यात आला होता.

 

 

१०. अपोलो १६

नासाच्या अपोलो प्रोग्रॅममधील “जे” मिशन मधील हे दुसरे यान होते जे केनेडी स्पेस सेंटरमधून १६ एप्रिल १९७२ रोजी अवकाशात सोडले गेले.ह्याताही अंतराळवीरांच्या समावेश होता. हे मिशन ११ दिवस १ तास आणि ५१ मिनिटे इतक्या वेळ चालले.

 

११. अपोलो १७

नासाच्या अपोलो प्रोग्रॅम मधील “जे”मिशन मधील हे शेवटचे मिशन होते. हे यान ७ डिसेम्बर १९७२ रोजी केनेडी स्पेस सेंटर मधून अवकाशात झेपावले.

ह्या मिशनमध्ये अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर तीन दिवस वास्तव्य केले आणि ह्या मिशन दरम्यान तिसऱ्या ल्यूनार रोव्हिंग वेहिकल उपयोग करण्यात आला होता.

अमेरिकेसह सोव्हिएतने सुद्धा चंद्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या होत्या. त्यापैकी ल्यूना ९ हे मानवरहित यान ३ फेब्रुवारी १९६६ रोजी पाठवण्यात आले होते.

हे यान सोव्हिएतच्या ल्यूना प्रोग्रॅममधील पहिले यान होते जे पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले. त्यानंतर सोव्हिएतने २१ डिसेम्बर १९६६ रोजी ल्यूना १३ हे यान पाठवले.

हे सुद्धा मानवरहित यान होते आणि ते चंद्राच्या पृष्ठभागावरील Oceanus Procellarum ह्या भागात उतरले होते. सोव्हिएत ल्यूना प्रोग्रॅममधील ल्यूना १८ किंवा ल्युनिक १६ हे सुद्धा मानवरहित यान चंद्रावर यशस्वीपणे उतरले होते.

हे चंद्रावर उतरणारे पहिले रोबोटिक यंत्र होते. ह्या यंत्राने चंद्रावरील मातीचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणले होते. त सोव्हिएतच्या ल्यूनार १७ किंवा ल्युनिक १७ ह्या मानवरहित यानातून चंद्राच्या पृष्ठभागावर पहिल्यांदा रोबोटिक रोव्हर उतरवण्यात आले होते.

 

 

सोव्हिएतने तीन वेळा यशस्वीपणे चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर अभ्यासासाठी आणले होते. त्यापैकी ल्यूना २० हे यान १४ फेब्रुवारी १९७२ साली अवकाशात सोडण्यात आले होते.

त्यानंतर ८ जानेवारी १९७३ रोजी सोव्हिएतने ल्यूना २१ हे मानवरहित यान चंद्रावर सोडले होते.

ह्या मिशनची उद्दिष्ट्ये चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढणे, पृथ्वीवर लेझर रेजिंगचा प्रयोग करणे, सोलर एक्स रे चा अभ्यास करणे आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे अशी होती.

त्यांत २८ ऑक्टोबर १९७४ रोजी सोव्हिएतने ल्यूना २३ हे मानवरहित अवकाशयान चंद्रावर पाठवले. ह्या मिशनचे उद्दिष्ट्य सुद्धा चंद्रावरील पृष्ठभागाचे नमुने पृथ्वीवर आणणे हेच होते.

सोव्हिएतच्या ल्यूना प्रोग्रॅममधील ल्यूना २४ हे शेवटचे मिशन होते. चंद्रावरील मातीचे नमुने आणणारे सोव्हिएतचे हे तिसरे यान होते आणि हे एक रोबोटिक प्रोब होते.

ह्या दोन देशांव्यतिरिक्त चीनने सुद्धा चंद्रावर आजवर दोन याने पाठवली आहेत. त्यातील Chang’e 3 हे पहिले यान चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनद्वारे २०१३ च्या डिसेंबर महिन्यात पाठवले गेले.

ह्या यानातुन एक रोबोटिक लॅन्डर आणि चीनचे पहिले ल्यूनार रोव्हर पाठवले होते. २८ डिसेंबर २०१५ रोजी Chang’e 3 ला चंद्राच्या पृष्ठभागावर एक नव्या प्रकारचा बेसाल्टीक दगड सापडला.. ह्यात ilmenite हे खनिज होते.

 

 

त्यानंतर चीनने Chang’e 4 हे यान ७ मे २०१८ रोजी अवकाशात सोडले आणि ह्या यानाने ३ जानेवारी २०१९ रोजी चंद्राच्या दुसऱ्या टोकावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळवले. हे मिशन चायनीज ल्यूनार एक्सप्लोरेशन प्रोग्रॅममधील दुसऱ्या टप्प्याचा एक भाग होते.

तर अश्या प्रकारे भारताने सुद्धा आता चंद्रयान आणि मंगलयान यशस्वीपणे पाठवल्यामुळे “प्रतिष्ठित स्पेस क्लब”मध्ये जागा मिळवली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version