Site icon InMarathi

परदेशी पसार झालेल्या बलात्काऱ्याला पकडून आणलंय या धाडसी महिला IPS ऑफिसरने!

merin-yourstory inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रोज सकाळी पेपर उघडा अथवा न्यूज चॅनल लावा एक तरी बलात्कारची बातमी असतेच असते. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असली तरी वास्तव आहे, आणि आजही त्यात काडीचाही फरक पडलेला नाही!

महिलांवर अत्याचार हे प्रत्येक क्षेत्रात होतच असतात, फिजिकल किंवा मानसिक अत्याचाराला सामोरं जाण्यातच या महिलांचं आयुष्य जातं!  पण प्रत्येक महिला या विरोधात आवाज उठवतेच असं नाही!

या गोष्टीला आळा बसावा म्हणून बाहेरच्या देशात ‘Me too’ या नावाने कॅम्पेन सुद्धा चालवला गेला, ज्यामुळे पिडीत महिला या घटनांवर खुलेपणाने भाष्य करायला लागल्या!

भारतात सुद्धा काही प्रमाणात हे कॅम्पेन यशस्वी झाले  पण तरी आजही महिलांवरचे अत्याचार पूर्णपणे थांबले आहेत असं म्हणता येणार नाही

 

outlook india

 

त्यामुळे अशा मॅटर्स च्या बाबतीत डोळेझाक केली जाऊ शकत नाही, या अशा बातम्या वाचून किंवा पाहून आपण नुसतेच तळमळून गप्प बसतो. कायदा, पोलिस ह्यांना शिव्यांची लाखोली वाहतो. पुढे ती बातमी विसरूनही जातो. पोलिसांना भ्रष्ट ठरवून मोकळे होतो.

दिल्लीतली निर्भया रेप केस असो, कठुआ रेप केस असो किंवा नुकतीच डॉक्टर प्रियांका रेड्डी हिची रेप आणि मर्डर केस असो, ह्या केसेस ची नाव जरी ऐकली किंवा या अमानवीय घटनांचा विचार जरी केला सुद्धा आपली तळपायाची आग मस्तकात जाते!

पण खरंच का पोलिस काहीच करत नाहीत? हे त्यांचे कामच आहे ह्या गोष्टीची आपल्याला आहे तशी त्यांनाही जाणीव असते आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ते हरप्रकारे प्रयत्न करतच असतात.

सारेच भ्रष्ट नसतात. काही प्रामाणिकही असतात जे सचोटीने आपले काम करतात आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यात त्याची मदत करतात.

 

freepressjournal.in

 

मंडळी आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला पोलिस आधिकार्‍याविषयी सांगणार आहोत ज्यांच्यासाठी त्यांची कर्तव्ये हीच प्राथमिकता आहे. आपण फक्त महिलांना शिकवलं पाहीजे किंवा women empowerment च्या फक्त बाता करत बसतो,

पण या महिलेने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे आणि समाजातल्या अपराध्यांना शिक्षा मिळण्यासाठी तिने प्रचंड प्रयत्न केले

ज्यांनी पराकाष्ठेचे प्रयत्न करून एका फरार झालेल्या बलात्कार्‍याला बाहेरदेशातून पकडून आणले आणि पीडितेला न्याय मिळवून दिला.

त्या महिला आधिकार्‍याचे नाव आहे आईपीएसअधिकारी मेरिन जोसेफ.

केरळच्या कोल्लम येथे पोलिस कमीशनर म्हणून कार्यरत असणार्‍या मेरीन ह्या पहिल्या भारतीय आयपीएस अधिकारी आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने सौदी अरबशी प्रत्यावर्तन करार केला आणि गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले.

हा गुन्हेगार भारतात अक्षम्य गुन्हा करून सौदी अरब मध्ये पळून गेला होता. बघूया नेमके काय घडले ते.

ही घटना आहे २०१७ सालची. कोल्लमचाच रहिवासी असलेला सुनील कुमार भद्र हा नराधम आपल्या १३ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर सतत तीन महीने अत्याचार करत होता आणि गप्प राहण्यासाठी धमकावत होता. त्यानंतर तो तिथून परागंदा झाला.

 

dnaindia.com

एकेदिवशी त्या मुलीची सहनशक्ति संपली आणि आपल्याबरोबर काय घडले ते तिने तिच्या आईवडिलांना संगितले. संतापलेल्या पालकांनी ताबडतोब पोलिसात ह्याची तक्रार केली आणि सुनील वर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला.

ज्यावेळी गुन्हा नोंदवण्यात आला त्यावेळी सुनील देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तो सौदी अरब देशात लादी बसवणारा कामगार म्हणून काम करत होता.

या घटनेनंतर पीडित मुलीला मानसिक स्थैर्यासाठी कोल्लमच्या कारिकोड येथील सरकारी महिला मंदिर ह्या पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले परंतु ती ह्या नैराश्यातून बाहेर पडू शकली नाही.

तिच्या कोवळ्या मनावर ह्या घटनेचा एवढा खोलवर परिणाम झलला होता की तिने जून २०१७ ला केंद्रातच गळफास लावून घेऊन आपले आयुष्य संपवले.

तिचा मामा ज्याने तिची आणि त्या नराधमाची भेट घडवून आणली होती त्याने ही आत्मक्लेशापायी आत्महत्या केली.

त्यानंतर जून २०१९ साली पोलीस आयुक्त म्हणून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या मेरिन जोसेफ यांनी महिला आणि काम सुरू करतानालहान मुलांशी संबंधित प्रकरणांना प्राथमिकता दिली. त्यावेळी त्यांना या केसबद्दल माहिती मिळाली.

 

India Today

ह्या केस मुळे आधीच खूप गोंधळ झालेला होता.  आता मेरीन ह्यांनी ह्या प्रकरणाला तडीस न्यायचे ठरवले. त्यांनी कारवाईला सुरुवात केली.

गुन्हेगार देशाबाहेर पळून गेलेला असल्याने केरळ पोलीस या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास करीत होते.

सुनील विरुद्ध इंटरपोलवर नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र इंटरपोल सोबतचा फॉलोअप आणि दोन्ही देशांचे आवश्यक सहकार्य असतानाही हे प्रकरण वेग घेत नव्हते.

तत्पूर्वी २०१० साली तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि सौदी चा राजा किंग अब्दुल्ला यांनी भारत आणि सौदी प्रत्यावर्तन करारावर सह्या केल्या होत्या मात्र आतापर्यंत एकही प्रत्यावर्तन करण्यात आलेले नव्हते

ह्यापूर्वी अनेक केरळ वासी सौदी अरब येथे पळून गेलेले होते. मात्र यावेळी केरळ पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे सौदी अरेबियाच्या पोलिसांतर्फे अखेरसुनीलला ताब्यात घेण्याविषयी सूचना करण्यात आली.

गुन्हेगाराला अटक करण्यासाठी मेरिन यांचे कनिष्ठ अधिकारी तयारच होते मात्र मेरिन यांनी स्वतः जाऊन गुन्हेगाराला अटक करून आणायचे ठरविले आणि आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले.

 

 

काही वर्षांपूर्वी एका मीडिया हाऊसने एक लेख प्रकाशित केला होता ज्या लेखात देशातील सुंदर आयपीएस अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता त्यात केरळच्या आयपीएस अधिकारी मेरिन जोसेफ यांचाही उल्लेख होता परंतु मेरिन जोसेफ यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला की महिलांना त्यांच्या दिसण्यावरून ओळखले जाणे ही चूक आहे.

त्यानंतर सोशल मीडियावर हा ट्रेंड झाला हळूहळू लोक मेरिन जोसेफ यांच्या साहसाबद्दल आणि कर्तबगारीबद्दल त्यांना ओळखू लागले आणि त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ व्हायला लागली.

आजवर अनेक केसेस आपल्या चातुर्य आणि सहसाने सोडवण्यात मेरीन ह्यांना यश आलेले आहे.

आता मेरिन जोसेफ ह्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेऊ.  मेरिन जोसेफ ह्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या असतानाचत्यांनी आयपीएस अधिकारी म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात केलेली आहे.

२० एप्रिल 2२०१९ ला जन्मलेल्या मेरिन जोसेफ यांनी सहावीत असतानाच आपण सिविल सर्विसेस मध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे ध्येय स्पष्ट होते. म्हणूनच त्या नुसार त्यांनी पुढे परीक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास देखील केली.

 

 

मेरिन जोसेफ या अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या. त्यांना मनापासून अभ्यास करण्यात आनंद वाटायचा.

आयपीएस परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर लवकरच त्यांनी केरळ येथील मनोचिकित्सक डॉक्टर क्रिस अब्राहम यांच्याशी लग्न केले. त्यांनी हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी मधून आपले प्रशिक्षण घेतले.

 

मेरीन जोसेफ ह्यांची आजवरची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे. देशाला अशा एकाच नव्हे तर अनेक मेरीन जोसेफची गरज आहे जेणेकरून देशात अशा गुन्ह्यांना चाप बसेल आणि महिलांना सुरक्षित आयुष्य जागता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version