Site icon InMarathi

कॅप्टन कूल धोनीचा उल्लेख आम्रपाली फसवणुकीच्या खटल्यात, काय आहे हे प्रकरण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्‍वातील अतिशय गाजलेलं नाव. लाखो लोक ज्याच्यावर जीव ओवाळून टाकतात त्याची मूर्ती आपल्या हृदयात घेऊन फिरतात. तरुण मुलांचा तो आयडॉल आहे. त्याची मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्ती याच्यावर सारे फिदा आहेत.

धोनी सर्वांत यशस्वी कॅप्टन मानला जातो. स्टंप मागचा चांगला विकेटकीपर आणि त्याच्यासमोरचा एक अप्रतिम फिनिशर म्हणून धोनीची प्रतिमा जगभरात आहे.

तसाच तो एक यशस्वी मॉडेल पण आहे. अशा या भारताच्या लाडक्या धोनीचा आम्रपालीच्या मुद्यामुळे चर्चेत आला आहे.

जर धोनीचा आणि आम्रपाली फसवणुकीचा काही संबंध असेल तर ते खूपच दु:खकारक आहे आणि धोनीच्या प्रतिमेला डागाळणारं आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची बातमी सर्वत्र पसरली आहे.

 

NewsX

तर दुसरीकडे आम्रपालीशी भारताच्या माजी कर्णधाराच्या पत्नीचा संबंध आहे अशी खबर आली आहे. २३ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली (रिअल इस्टेट ग्रुप) ला सांगितले की, त्यांनी त्यांच्या हजारो क्लाएंटना वेळेवर घर देणं बंधनकारक आहे.

आम्रपाली ग्रुपवर असा आरोप आहे की, सामान्य लोकांची घरे बांधण्यासाठी त्यांनी पैसे काढले आहेत, पण हे पैसे गेले कुठे? कोर्टाने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षकांच्या मते, सुमारे ४३ कोटी रुपये धोनीच्या मदतीने त्याच्या दोन्ही कंपन्यांकडे हे पैसे गेले.

मंगळवारी २३ जुलै ला कोर्टाने दिलेली ऑर्डर धोनीच्या चाहत्यांना वाचायला फारच त्रासदायक होती. ते म्हणतात की, ‘‘आम्रपालीच्या प्रवर्तकांनी रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रा. लि. आणि आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रा. लि. यांच्याबरोबर करारामध्ये प्रवेश केला आहे.

रीती स्पोर्ट्स या कंपनी मध्ये धोनीला वाटा आहे तर त्यांची पत्नी साक्षी आम्रपाली गटाची डायरेक्टर आहे. धोनी त्याच्या चाहत्यांमध्ये “माही” म्हणून ओळखला जातो, म्हणजेच, या सर्व प्रकरणांमध्ये धोनी आणि त्याची पत्नी,या दोघांचाही समावेश असल्याचे दिसून येते.

 

Outlook India

माही हा एप्रिल २०१६ मध्ये आम्रपालीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता, परंतु त्याला हजारो फ्लॅट धारकांच्या नाराजीमुळे आम्रपाली ग्रुपशी संबंध तोडावे लागले.

मंगळवारी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी न्यायमूर्ती यूयू ललित यांच्यासमोर सादर केलेल्या फॉरेंसिक ऑडिट अहवालात सांगितले की,

‘‘आम्हाला विश्‍वास आहे की, फ्लॅट खरेदीदारांचे पैसे अवैध आणि चुकीच्या मार्गाने रीती स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जमा केले आहेत. तेव्हा ही रक्कम त्यांच्याकडून कायद्याने परत घ्यावी.’’

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, रेकॉर्डनुसार ही रक्कम साक्षी धोनीला रोख देण्यात आली. ऑडिटरने सांगितले की, आम्हाला सांगितलं गेलं होतं की, ही कंपनी रांचीमधील एका प्रोजेक्टमध्ये पण जोडली गेली आहे.

त्यासाठी आम्ही दोन बाजूंच्या मध्यस्थीवर स्वाक्षरी पण केली होती, परंतु आम्ही ती प्रत प्रदान नाही केली. अहवालाच्या मते, 2009 आणि 2015 च्या दरम्यानं रीती स्पोर्टस्ने आम्रपाली गूप कडून २००९ ते २०१५ या काळात ४२.२२ कोटी रुपये मिळवले.

यामधील आम्रपाली सफायर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ने ६.५० कोटी दिले होते. परंतु रीती स्पोर्टस्ला एवढी मोठी रक्कम का दिली होती याचं काहीच स्पष्टीकरण नाही.

 

आम्रपाली प्रोजेक्ट्स

अजून सर्वोच्च न्यायालयाने काहीच निकाल दिलेला नाही, तरी सर्वोच्च न्यायालयाने २३ कंपन्यांची यादी तयार केली आहे. ज्यात फक्त निधी आणि व्यवसायासाठी तयार केल्या आहेत. त्यामध्ये फार कमी व्यवहार होतात.

सर्व फॅमिली मेंबर्स आणि नातेवाईक व्यवहारासाठी त्यात समाविष्ट केलेले आहेत. त्यापैकी दोन आहेत धोनी आणि त्यांची पत्नी यांच्याशी संबंधित दोन कंपन्या समाविष्ट आहेत.

धोनीसारख्या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तीने आधीच विचार केला पाहिजे की, या अशा संशयास्पद कंपन्या आणि उत्पादनांसोबत ते अधिक आणि सोप्या मार्गाने पैसे मिळवण्यासाठी का जोडले गेले आहेत? त्यांना काय कमी आहे?

शिवाय जनमानसातील त्याची प्रतिमाही खूपच उच्च प्रतीची असताना अशा लोभापासून दूर राहणंच उत्तम.

तरीपण मुद्दा हा आहे की खरंच हा अपराध त्याने केला आहे का? आत्तापर्यंतच्या त्याच्या वर्तनावरून तरी तो निर्दोष असावा असं वाटत आहे, सेलिब्रेटीजना निर्दोष असतानाही त्यांच्या प्रतिमेला धक्का लागावा असा आघात सहन करावा लागतो हे काही प्रथमच होत नाहीये.

पूर्वीही काही सेलिब्रेटींनी अशा प्रकारे त्यांच्या काही वक्तव्यामुळे किंवा वागण्यामुळे खड्ड्यात पाय घातला होता. किंवा काही नतद्रष्ट लोकं उगाचंच त्यांना गुंतवण्याचा प्रयत्नही करत असतात.

१.३ बिलियनपेक्षा जास्त देशांमध्ये एक सेलिब्रिटी असणं सोपी गोष्ट नाही. तसंच रोल मॉडेल म्हणून सिमेंटसारखी अभेद्य प्रतिमा निर्माण केलेल्यांनी मोहापासून दूर राहणं उत्तम. कारण प्रतिमा तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो, पण ती डागाळण्यासाठी काही क्षणही पुरेसे असतात.

 

Cricwizz

धोनी आम्रपालीत दोषी आहे का? लवकरच कळेल. पण लेखापरीक्षकांनी असे निरीक्षण केले आहे की, रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडबरोबर आम्रपाली ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने आणि सीएमडी अनिल कुमार शर्मा, सीएमडीला सर्व आम्रपाली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने करारात प्रवेश करण्यासाठी अधिकृततेवर कोणताही ठराव नाही.

आम्रपाली आणि रीती यांच्यातील करारांमध्ये ग्रे क्षेत्र आहेत. २० मार्च २०१५ रोजी आणखी एक करार धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल संघातर्फे करण्यात आला.

सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे ऑडिट रिपोर्ट मध्ये असं आढळून आलं आहे की, हा करार एका साध्या पेपरवर आम्रपाली आणि रिती स्पोर्टस्मध्ये झालं आहे आणि या करारात चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने कोणतेही साक्षीदार नाहीत.

न्यायालयाने अंमलबजावणी संचालयनायाला जबाबदार व्यक्तींवर चौकशी करण्याचे आणि उत्तरदायित्व निश्‍चित करण्याचे निर्देश दिले होते.

‘फोरेंसिक ऑडिटरच्या अहवालानुसार, ज्या कंपन्यांमध्ये होमबॉइर्सची रक्कम उपलब्ध आहे त्यानुसार विविध कंपन्या/संचालक आणि इतर पदाधिकारी, एका महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे.’’

 

ndtvimg.com

सर्व धोनी चाहत्यांची आशा हीच आहे की, त्याच्यावर लागलेला हा आरोप खोटा ठरावा.

अनेक वादळांपैकी हेही एक वादळं ज्याप्रमाणे उधळली गेली आहेत तसेच हे वादळ शमून जावे. आणि त्याची जी प्रतिमा आहे तीच प्रतिमा जनमानसात राहावी. मोहासारख्या जंजाळात त्याने अडकू नये हीच सदिच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version