Site icon InMarathi

मोबाइल हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे? या काही टिप्स वाचा!

mobile theft inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तंत्रज्ञान कशाप्रकारे विकसित झालं आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. सुरुवातीला पेजर आले, ज्यावरून अगदी मर्यादित शब्दांत मेसेज पाठवता यायचा, त्यांनंतर ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल्स आले जे अत्यंत महाग होते आणि त्यात फक्त फोन आणि मेसेज करण्याची सोय होती!

अशा फोनसाठी सुद्धा  ३० रुपये प्रती मिनिट असा महाग रेट होता, तरी बरेच लोक ते फोन्स सुद्धा वापरत होते. तिथूनच मोबाईल फोन्सची उत्क्रांती चालू झाली ती अजूनही चालूच आहे. आता तर अनेक कंपनीज अगदी स्वस्त दरात फूल स्पीड इंटरनेट आणि फुकट कॉल्स सेवा देत आहे!

 

 

मोबाईल वापरणाऱ्या लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे, मार्केट मध्ये कमीत कमी किंमतीपासून ते अगदी महाग अशा रेंज मध्ये फोन्स उपलब्ध करून देणाऱ्या कित्येक कंपन्या आल्या आहेत! आणि यामुळे कोणत्याही माणसाला अँन्ड्रॉईड किंवा स्मार्टफोन वापरता येतोय!

या स्मार्टफोन्सनी फक्त तरुण मुलांनाच या जाळ्यात अडकवल आहे अशातला भाग नसून, अगदी मोठ्यांपासून वृद्ध माणसांपर्यंत संगळ्यांवर मोहिनी घातली!

शाळकरी आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलांमध्ये तर या स्मार्टफोन्सची क्रेझ काही वेगळीच आहे!

===

हे ही वाचा – चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

===

अँन्ड्रॉईड स्मार्टफोन हा सर्वसामान्य माणसाला परवडतो तर आयफोन हा काही ठराविक लोकांनाच परवडतो, जास्तकारून आयफोन हा बरीच लोकं स्टेटस सिंबॉल म्हणून सुद्धा घेतात, किंमतीचा फरक सोडला तर दोन्ही प्रकारच्या फोन मध्ये नवीन एडव्हान्स फीचर्स मिळतात!

अशी सरधोपट दोन गटात विभागणी केली तरी मोबाईलचं महत्त्व कमी होत नाही. आजकाल बहुतेक सर्व लोक स्मार्टफोन वापरतात. पण अपवादात्मक रित्या सुरुवातीला असलेले साधे फोन आजी आजोबा लोकच वापरतात.

 

 

नातवंडं, सुना यांच्या मदतीनं हे आजी आजोबा लोकसुद्धा स्मार्ट होऊ लागले आहेत. विविध अॅपनी माणसाचं जीवन फारच सोपं बनवलं आहे.

रेल्वेच्या तिकीटापासून सिनेमाचे तिकीट आणि कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सारं काही एका अंगठ्यावर आणून दिलं आहे या तंत्रज्ञानानं. करलो दुनिया मुठ्ठी में हे गंमत वाटणारं वाक्य आता तंतोतंत खरं ठरलं आहे.

पण कधीकधी हा जीवाचा सखा मोबाईल हरवतो किंवा चोरीला गेला तर काय अवस्था होते? कारण हा मोबाईल तुमच सारं काही असतो, तुमची बँक असतो, तुमचं मनोरंजन करतो!

एकाएकी मोबाईल हरवला तर दुसरा मोबाईल मिळेपर्यंत काय करायचं हा केवढा मोठा प्रश्न पडतो. तर…आज या लेखात मोबाईल हरवला तर काय कराल?? त्याबाबतीत आज या लेखात थोडं समजून घेऊया!

 

 

१. रिपोर्ट

तुम्ही ज्या कंपनीचं नेटवर्क वापरत असाल तर या कंपनीला डाटा प्रोव्हायडर असं म्हणतात. या कंपनीला आपलं सिम कार्ड लाॅक करायला सांगावं म्हणजे तुमचा मोबाईल त्याक्षणी बंद होतो.

त्याचबरोबर तुमच्या फोनचा एक विशिष्ट असा IMEI नंबर असतो, जो तुम्ही मोबाईल कंपनीत जाऊन कळवले तर तुमच्या फोनचे लाईव्ह ट्रॅकिंग काढता येते आणि तुमचा फोन सापडायची शक्यता अजून दाट होते!

कारण समजा चोरानं कार्ड टाकलं तरी तो नंबर काढू शकत नाही. त्यावरुन तो फोन शोधता येतो. तसंच पोलिसांची तक्रार दाखल करा. त्यामुळे तुमचे अनावश्यक फोन काॅल लक्ष देऊन बंद करता येतात.

 

 

२. विमा

फोन जितका महाग असेल तितका तो जपून वापरावा..त्याचाही विमा उतरवावा.तो या स्थितीत लागू आहे का हे तपासून घ्यावे.

 

===

हे ही वाचा – तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते!

===

३. नवीन सिम कार्ड

फोन हरवला की प्रथम नवीन सिम कार्ड घ्या. ज्यामुळे तुमचं मूळ कार्ड ब्लाॅक होईल. कंपनी ते कार्ड चालू करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारते. तसेच नवा फोन घेऊन त्यात तुमचे नंबर चालू करुन घ्या.

४. ट्रॅकिंग

डिव्हाईस मॅनेजरच्या मदतीनं फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करा. त्यासाठी गूगलची मदत घ्यावी.वायरलेस प्रोव्हायडरपासून तुमचा फोन प्रथम  करा.त्यामुळं चोर फोन रिसेट करु शकणार नाही.

की दुसरं सिमकार्ड त्यात बसवून वापरु शकणार नाही. त्याचबरोबरीने तुमचा IMEI नंबर दिला तर फोनचे लोकेशन ट्रेस होते. त्यासाठी हा नंबर *#०६# हा नंबर डायल करुन मिळवू शकता.

तो नंबर मोबाईल चोरीला गेल्यानंतर cop@vsnl.net वर मेल केला की मोबाईल ट्रॅकिंग सुरु होते आणि २४ तासात जरी सिम कार्ड बदलले तरीही मोबाईल ट्रॅक करता येतो.

 

 

मात्र त्यासाठी तुमचा मेल आयडी, शेवटचा वापरलेला सिम कार्ड नंबर, मोबाईल माॅडेल, तुमचे नांव, पत्ता हे सर्व आवश्यक आहेत.

प्रत्येक मोबाईल मध्ये डिव्हाईस मॅनेजर असतोच. त्याच्या मदतीनं तुम्ही डेस्कटॉपवरून तुमचा मोबाईल ऑपरेट करु शकता.

गूगलच्या मदतीने तुम्ही आपलं डिव्हाईस आपल्या गूगल अकाऊंट सोबत सिंक्रोनाईझ केलं असेल तर डिव्हाईस मॅनेजर मधून आपला फोन कुठे आहे ते पाहू शकता. त्यावरुन डेस्कटॉपवरून त्याला लाॅक करु शकता.

किंवा त्यातील सर्व डेटा काढून टाकू शकता. हे करताना डेस्कटॉप जवळ नसेल तर एखाद्या मित्राचा फोनही वापरु शकता. पण त्यासाठी इंटरनेट हवं ते नसेल तर काही करता येत नाही.

पण यासाठी फोन लाॅक करायची सवय लावून घ्यावी. म्हणजे फोन लाॅक असल्यामुळे जरी तो कुणाला सापडला किंवा कुणी घेतला तरी त्याची सेटींग्ज सहजासहजी वापरु शकत नाही.

गूगल मॅप हिस्ट्री ऑन असेल तर त्यावरुनही मोबाईल चे लोकेशन डेस्कटॉपवरून ट्रेस करता येते.

शक्यतो मोबाईल हरवू नये म्हणून काळजी घ्या पण त्यातूनही हरवलाच तर वर सांगितलेल्या टिप्स लक्षात घेऊन मोबाईल शोधून काढा… पोलिसांच्या मदतीशिवाय!!!!

===

हे ही वाचा – स्मार्टफोनच्या कॅमेरावर धूळ जमलीये? या ६ अफलातून युक्त्या वापरुन लेन्स करा स्वच्छ!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version