Site icon InMarathi

इसरोच्या ‘बाहुबली’ उड्डाणामागे आहे, कित्येक दशकांमध्ये घडून आलेली ही पडद्यामागील अचाट कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दिनांक २२ जुलै २०१९. भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा क्षण. ज्या क्षणाची सर्वच जण उत्सुकतेने वाट पाहत होतं. आणि ठरल्याप्रमाणे दुपारी २.४३ मिनिटांनी या चांद्रयानाने भरारी घेतली.

इस्रो ने बहुमूल्य कामगिरी केली. या रॅकेटला ‘बाहुबली’ रॉकेट असं नाव देण्यात आलं. आगीचा प्रचंड लोळ उडवत हे रॉकेट मार्गस्थ झाले. चांद्रयान-२ ला लाँच केल्यानंतर सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये उपस्थित असलेल्या वैज्ञानिकांच्यात आनंदीआनंद झाला.

सगळ्या देशाचं लक्ष तिकडे लागून राहिलं होतं. लहानमुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे टी.व्हीकडे नजर लावून बसले होते.

जेव्हा या यानाने अवकाशात झेप घेतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही टाळ्या वाजवून मिळालेल्या यशाला दाद दिली आणि सांगितले की, ‘‘भारताच्या १३० कोटी देशवासीयांना गर्व वाटावा असा हा दिवस आहे.’’

 

Scroll.in

तर अशा या बाहुबालीचा प्रवास दिसतो तेवढा साधा-सोपा मुळीच नाही याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. तसंच या उड्डाणामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. पाहुया या ‘बाहुबली’ची कहाणी.

श्रीहरिकोटा येथून चांद्रयान – २ चे जीएसलव्ही-एमकेआयआय रॉकेटचे प्रयाण १५ जुलै २०१९ ला होणार होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते रद्द करण्यात आले.

अंतरिक्ष संशोधन संघटनेच्या वैज्ञानिकांनी त्यातील त्रुटी शोधून काढून त्याच्यावर मात केली आणि २२ जुलै रोजी दुसर्‍या प्रयत्नात ते यशस्वी झाले.

आधी असलेल्या समस्या खूप प्रयत्नांनी सोडवत अंतरिक्ष संशोधन संघटनेने जरी दुसर्‍या प्रयत्नात यश मिळवलं असलं तरी प्रश्‍न हा आहे की, जीएसएव्ही एमके – ३ मधील क्रायोजेनिक अपर स्टेज जी ‘बाहुबली’ या नावाने ओळखली जाते त्यात नक्की सोडवण्यास अवघड अशी काय समस्या होती.

 

Zee Business

तर जाणून घेऊया ती समस्या.

क्रायो स्टेज समस्येच्या गोंधळाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रथम त्याचं डिझाइन जाणून घेणे आवश्यक आहे. सर्व रॉकेट इंधनापैकी, हायड्रोजन हा घन आणि टिकाऊ द्रव प्रवाहाच्या तुलनेत पृथ्वीवरील प्रचंड पुरवठा असणारं इंधन म्हणून ओळखलं जाते.

परंतु नैसर्गिक स्वरूपातील हायड्रोजन साठवण करणे आणि हाताळणे कठीण आहे. त्यामुळे पीएसएलव्ही सारख्या सामान्य इंजिनमध्ये त्याचा वापर केला जात नाही.

तथापि द्रवस्वरूपातील हायड्रोजन रॉकेट इंजिनमध्ये साठवता येते, परंतु त्यासाठी कमी तापमानात २५३ डिग्री सेल्सियस एवढे तापमान आवश्यक असते आणि द्रव स्वरूपातील इंधन जळण्यासाठी ऑक्सिजन देखील द्रव स्वरूपात असणे आवश्यक आहे.

किमान १८७ अंश सेल्सियस. रॉकेटमध्ये अशा कमी तापमानाचे वातावरण तयार करणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर इतर सामुग्रींना प्रॉब्लेम येऊ शकतो.

२५-३० वर्षांपूर्वी जेव्हा एस्रो त्याच्या जीएसएलव्ही रॉकेटसाटी क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्यास उत्सुक होती, पण जे यान भौगोलिक कक्षामध्ये ३६,००० किमी उंचीवर ३-४ टन इतके प्रचंड पेलोड उचलले, तेच आपले अंतरिक्ष यान इतर ग्रहांकडे पाठवू शकले.

पण इस्रो केवळ ६००० किमी. च्या उंचीवर म्हणजे १.७ टन पेलोड वितरित करू शकत होती. हे भौगोलिक ट्रान्सफर कक्षामध्ये कमी उंचीवर जाऊ शकते, पण जास्त उंचीवर जाऊ शकत नाही.

म्हणून पीएसएलव्हीने २००८ मधील चांद्रयान – १ आणि मंगळ ऑर्बिटर मिशनच्या प्रक्षेपणासाठी वापरलेले पेलोड १.४ टनांपेक्षा जास्त नव्हतं. ही मुख्य अडचण होती.

 

The Indian Express

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारताने सोव्हिएत युनियन, जपान आणि फ्रान्स येथे क्रायो तंत्रज्ञानासाठी मदत मागितली होती. केवळ सोव्हिएत संघच मदतीसाठी पुढे आला होता.

पण अमेरिकेने इस्रो आणि सोव्हिएतच्या ग्लाव्हकोसमॉस लाँच सर्व्हिस प्रोव्हायडर वर आक्षेप घेतल्याने सोव्हिएतने देखील माघार घेतली.

अमेरिकेने जरी रशियन क्रायो तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणात अडथळा आणला असला तरी तशी सात इंजीन ग्लाव्हकोस्कोमोमधून आयात करण्यास भारत सक्षम होता.

ही इंजिन्स जीएसएलव्ही ची सुरुवातीची व्हर्जन्स प्रक्षेपित करण्यासाठी वापरली जातात. पण परिपूर्ण यंत्रणा तयार करायच्या ध्येयाने झपाटून इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्वत:ची क्रायो टेक्नॉलॉजी करायला सुरुवात केली.

म्हणतात ना ‘जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ या तत्त्वावर इस्रोने स्वत: कष्ट घेतले. तब्बल दोन दशकं मेहनत घेतली, पण तरीही ही खूप अवघड व गुंतागुंतीची यंत्रणा असल्याने काही समस्या येतच होत्या. जशी १५ जुलैला आली तशी.

 

Satnews Publishers: Daily Satellite News

हेलियम क्रायोजेनिक चेंबर मध्ये प्रेशर मेंटेन ठेवायला वापरतात. क्रायो अपर स्टेजमधील हेलियम बॉटल गळतीमुळे १५ जुलैला अडचण आली. ही गळती टँक लिक्वीड हायड्रोजन म्हणजे इंधन व लिक्वीड ऑक्सिजन म्हणजे ऑक्सीडायजर ने भरल्यावर चालू झाली.

प्रेशरद्वारे क्रायोजेनिक चेंबर पकडले जात नव्हते व उड्डाण रद्द करण्याखेरीज पर्याय नव्हता.

पण या सगळ्या अडचणींवर मात करून इस्रोने ही मोहीम यशस्वी करायचंच ठरवलं आणि अडचणींच्या ‘बाहुबली’ला नाउमेद केलं आणि ‘चांद्रयान-२’ म्हणजेच ‘बाहुबली’ रॉकेटची मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाली.

तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेलच की हे एक दोन नव्हे तर २० वर्षं या क्रायोजेनिक इंजिनवर कष्ट घेण्याचं काम सुरू आहे. इस्रोचे चेअरमन राधाकृष्णन यांनी सांगितले की, ‘‘क्रायोजेनिक इंजीन आणि त्याच्या विकासासाठी २० वर्षे मेहनत आणि प्रयत्न सुरू आहेत,

पण गेल्या तीन वर्षांपासून त्या प्रयत्नांना उत्तेजन दिले गेले आहे. त्याचे महत्त्व पटले आहे.’’

रविवारी श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून भारतीय रॉकेटच्या यशस्वी उड्डाणानंतर ते बोलत होते, ते म्हणाले, ‘‘इस्रोच्या टीमने हे केलं म्हणून मला खूप आनंद आणि अभिमान आहे. भारतीय क्रायोजेनिक स्टेजने अपेक्षेनुसार काम केले आहे.

 

Livemint

जीएसएलव्ही ही एक मोठं यश आहे. भारतीयांसाठी, भारतीय विज्ञान आणि स्पेस तंत्रज्ञानासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या सर्व कर्जाची परतफेड देशाला केली आहे. इस्रोच्या सर्व वर्तमान आणि भूतकाळातील अधिकार्‍यांना धन्यवाद.’’

रामकृष्णन यांनी सांगितले, ‘‘इस्रो मध्ये आम्ही जीएसएलव्हीला एक दंगेखोर मुलगा म्हणत होतो, पण आज हाच मुलगा आज्ञाधारक बनला आहे.’’

तर मंडळी अशी आहे या चांद्रयान-2 म्हणजेच ‘बाहुबली’ रॉकेटची कथा. एक यश मिळवण्यामागे किती जणांची मेहनत, बुद्धी, लगन लागते हे यावरूनच समजते.

पण एक मात्र खरं की, ‘एकीचं बळ मिळतं फळ’ या म्हणीप्रमाणे इस्रोच्या सर्व टीमने हे आव्हान पेललं आणि यशस्वी करून दाखवलं. आता त्यांचं उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण होऊ दे हीच मनोकामना.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved

Exit mobile version