आयसिसच्या शेकडो दहशतवाद्यांना, एक-हाती जहन्नूम मध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मृत्यू म्हटलं की, कोण नाही घाबरत? प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला मृत्यू अटळ आहे हे आपणा सर्वांनाच माहीत असतं, पण तरीही आपण मृत्यूला घाबरतो.
मृत्यू नैसर्गिक असेल तर काही इलाजच नाही, पण मारामारी, खून, अॅक्सिडंट यातून जर मृत्यू झाला तर तो अधिकच भयावह असतो. पण दुसर्याला मारणारासुद्धा स्वत:च्या किंवा स्वत:च्या जवळच्या माणसाच्या मृत्यूला मात्र घाबरतो म्हणजेच त्यालाही मृत्यूपासून भय असते.
अशीच एक घटना घडली आहे इराणमध्ये, तेथील एक व्यक्तीने संपूर्ण दहशतवादी संघटनेला असा धक्का दिलाय की त्याच्याबद्दल आयसिसच्या दहशतवाद्यांना चांगलीच जरब बसली आहे.
कोण आहे हा माणूस? आणि पूर्ण जग अगदी दहशतवादी संघटनासुद्धा या माणसाच्या नुसत्या नावानेच घाबरत आहे. पाहुया या आयसिसच्या आतंकवाद्यांना घाबरवणार्या खतरनाक माणसाची गोष्ट…
अबू अजरेल हे नाव आयूब फलेहच्या चाहत्यांनी त्याला दिलं आहे. आयएसच्या दहशतवाद्यांनी त्याला ‘मृत्यूचा देवदूत’ म्हटले आहे.
जरी सीरिया आणि सीरियाच्या अनेक शहरी भागात दहशतवादी दहशत पसरवत असले तरी अबू अजरेल त्यांना त्यांच्या कारनाम्याप्रमाणेच त्यांना पुरून उरत आहे. तो आयएसच्या दहशतवाद्यांसाठी मृत्यूपेक्षा कमी नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
इतकी त्याची दहशत त्या आतंकवाद्यांना वाटते आहे. दहशतवादीच त्याला घाबरत आहेत. आहे ना आश्चर्यकारक!
एकटा माणूस सगळ्या दहशतवाद्यांना पुरून उरला आहे म्हणजे किती सामर्थ्य असेल त्या माणसाच्यात. इराणमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांसाठी दहशतीचं नाव म्हणजे अबू अजरेल असं समीकरण बनलं आहे.
जर कोणताही दहशतवादी त्याच्या तावडीत सापडला तर त्या दहशतवाद्याच्या हाती यमसदनाशिवाय काही लागणार नाही. कोण असेल हा अबू अजरेल? ज्याच्या नुसत्या नावाच्या उच्चाराने पण दहशतवादी संघटना घाबरतात, याची उत्सुकता नक्कीच लागते.
छातीवर बुलेटप्रूफ जाकीट, एका हातात एसाल्ट राइफल आणि दुसर्या हातात कुर्हाड आणि लक्ष्य फक्त एकाच गोष्टीवर ते म्हणजे दहशतवादी. म्हणजे दहशतवाद्यांना चांगला धाक दाखवायचा किंवा त्यांचा नाश करायचा.
असा माणूस इराणमध्ये फिरत असतो तोच अबू अजरेल. त्यांचा पोषाख आणि दाढी बघूनच जरब बसल्याशिवाय राहात नाही, वेगवेगळ्या शहरात आयएस दहशतवाद्यांच्या विरुद्ध एकटाच तो लढा देत आहे. असामान्य असे धैर्य त्यांच्यापाशी आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार हा माणूस ४० वर्षांचा आहे आणि इराणचा नागरिक आहे व तो ख्रिश्चन आहे. ते एका युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते. फक्त एवढंच नाही तर ते इराणमधील कराटेचे चँपियन होते अशीही माहिती मिळते.
इराणमधील शिया मुस्लिमांच्या कत्तलीनंतर त्यांनी नोकरी सोडली आणि इमाम अली ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. इमाम अली ब्रिगेड शिया मिलिशिया ग्रुप हा असा ग्रुप आहे की जो आयएसविरुद्ध लढा देत आहे.
अबू अजरेल या गटाचा कमांडर बनला. अशी बातमी आहे की त्यांनी एका वर्षाच्या आत १५०० च्या वर दहशतवादी मारले आहेत आणि ते त्यांच्या हातात असणार्या तलवारीने मारले आहेत.
ते सुधारित कुर्हाडीचा देखील वापरत करतात, सगळे दहशतवादी त्यांना घाबरून गेले आहेत, पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की, त्यांनी यासाठी कुठेही बॉम्बचा वापर केला नाही तर त्यांनी जुन्या युद्धनीतीचा वापर केला.
अगदी साध्या साध्या युद्धकौशल्यांचा वापर केलाय जे आपण शाळेतील भांडणातसुद्धा वापरतो. आणि यासाठी त्यांनी गमिनीकाव्याचाही वापर केला आहे.
१७ नोव्हेंबर २०१५ रोजी, अबू अजरेल ‘मृत्यूच्या मुख्य प्रांताचा पिता’ अशा नावाच्या लष्करी लढवय्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित झाली. त्यात असं दिलं होतं की, अबू अजरेल तलवार व कुर्हाड यांचा वापर करून ते दहशतवाद्यांना मृत्युमुखी पाडत आहेत.
आयएसच्या दहशतवाद्यांना त्यांनी ठार मारले आहे, पण त्याच्या या कामाबद्दल आधी खूपच गैरसमज झाला.
आधी इस्लामिक राज्याला हा कोणी हाहाकार माजवणारा शत्रू असावा असे वाटले असावे, कारण इस्लामिक राज्याने त्याच्या नावाचा उच्चार दुराग्रही शत्रू म्हणून केला होता.
त्याच्यावर टीका केली गेली, त्याच्या विरुद्धचे व्हिडिओ व्हायरल केले गेले, नंतर हळूहळू त्याच्या कामगिरीने त्याच्यावरील दुराग्रह कमी झाला आणि त्याच्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली आणि लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं.
१३ नोव्हेंबर २०१५ रोजी पॅरिसमध्ये आयएस दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कथा लोकप्रिय झाली. या काळात सुमारे 130 लोक मारले गेले. पॅरिस हल्ल्यांमुळे अबू अजरेलची कथा उदयाला आली.
‘कातिब अल इमाम अली’ पोर्टेट ऑफ इराकी मिलिटंट ग्रुप फायटिंग आयएस’ शीर्षक असलेल्या ५ जानेवारी २०१५ चा लेख म्हणजे त्याला इस्लामिक स्टेटशी लढत असलेल्या नवीन गटाने फील्ड कमांडर म्हणून घोषित केले.
अबू अजरेल यांनी एक घोषणा केली आहे ‘इल्लाह ताह’ म्हणजे धूळ वगळता काहीही राहत नाही. त्यांनी अशी शपथ घेतली आहे की, जोपर्यंत इराणमधील आयएस दहशतवाद्यांना ओढून बाहेर काढणार नाहीत तोपर्यंत आयएसच्या विरुद्ध लढतच राहणार.
केवढं शौर्य एकट्या माणसाची भीती दहशतवाद्यांना बसते म्हणजेच दहशतवादीसुद्धा स्वत:च्या मृत्यूला घाबरत आहेत, पण दुसर्यांच्या मात्र जिवावर उठतात. काय मिळत असेल त्यांना असा दहशतवाद पसरून? पण म्हणतात शेरास सव्वाशेर!
अबू अजरेल यांनी दहशतवाद्यांनाच घाबरवून सोडले आहे. याची चर्चा संपूर्ण जगभर चालू आहे.
फक्त इराणच नाही तर जगभरातील लोकांना अबू अजरेलच्या शौर्याची खात्री पटली आहे. सोशल मिडियामुळे अशा बातम्या झटकन पसरतात आणि त्यामुळे जनजागृती होऊन अशा चांगल्या कामासाठी लोकं ते कृत्यं करणार्या माणसाला लोक पाठिंबा देऊ शकतात.
अबू अजरेलचे ही असे अनेक चाहते आहेत. चाहत्यांनी त्याच्यासाठी अनेक क्लब, समुदाय आणि पृष्ठे तयार केली आहेत ज्यात त्याच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
अबू अजरेल केवळ गल्फ देशांतच नाही, तर इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकन वृत्तपत्रांच्या मथळ्यांमध्ये देखील आहे.
त्याच्या या कथेमुळे आपल्या देशातील लोकांनी त्यांना संतपदी नेऊन ठेवले आहे आणि त्यांचे फेसबुक पेजवरील फॅनमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत.
लोक त्याला ‘इराकी रॅम्बो’ म्हणून ओळखतात म्हणजेच ‘मृत्यूचा स्वर्गीय कर्मचारी’ असं वाटतं की ते एकटे वाटत असल्याचा पुरावा असूनही दहशतवाद्यांना त्यांची भीती बसली आहे. शियाच्या स्थानिक सैन्यात इमाम अली ब्रिगेड हा एक व्यक्ती आहे.
त्याने खूपच उघडपणे आयएसला सावध केले आहे. एका माणसाची भीती मोठ्या संघटनेला वाटते यातच त्यांचं यश दिसून येतं. त्यांची ही चळवळ यशस्वी होवो व दहशतवादाचा अंत होवो हीच सदिच्छा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.