Site icon InMarathi

जीम लेकर, कुंबळे आणि आता एजाज पटेल – १० विकेट्स घेणारे धडाकेबाज गोलंदाज!

ajaz patel featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच एजाज पटेल या न्यूझीलंडच्या खेळाडूने कसोटी सामन्यात १० विकेट्स घेऊन स्वतःच्या नावावर एक नवा विश्वविक्रम रचला आहे. मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने वयाच्या ८व्या वर्षीच देश सोडला आणि तो न्यूझीलँडमध्ये कायमचा स्थायिक झाला!

आत्ता वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात एका भारतीयानेच भारतीय संघाच्या विकेट्स घेत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. ते म्हणतात ना क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात काहीही होऊ शकतं, ते अगदी खरं आहे याची प्रचिती आत्ता आपल्याला आली असेल!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

क्रिकेटमधील विविध फॉरमॅटपैकी टेस्ट क्रिकेट हा एक फॉरमॅट आहे. वन डे, टी ट्वेंटी यापूर्वी हा खेळ टेस्ट क्रिकेट या एकाच फॉरमॅटमध्ये खेळला जायचा.

टेस्ट क्रिकेटमध्ये चार दिवस एक सामना खेळला जातो आणि अशावेळी कधीकधी फलंदाजीपेक्षा गोलंदाजीच निर्णायक ठरते.

जास्तीतजास्त बळी मिळवणे व समोरच्या संघाला लवकरात लवकर रवाना करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि गोलंदाजांचे खरे कसब पणाला लागते.

 

 

अन्य खेळांप्रमाणे क्रिकेट हासुद्धा एक असा खेळ आहे की कधीही काहीही होऊ शकते.

मॅच हातातून गेलीच असे वाटत असताना पुढच्याच ओव्हरला मॅच फिरणे किंवा अगदी जिंकत आलेली मॅच अचानकपणे हरणे यासारख्या गोष्टी सातत्याने घडतच असतात, परंतु खेळामध्ये काही अशा घटना घडतात ज्या विसरणे क्रिकेटप्रेमींना शक्यच नाही.

अशीच घटना जिम लेकर यांची.. पाहुया काय कामगिरी केली या खेळाडूने.

क्रिकेट टीममधील अकरा खेळाडू असतात. आता विचार करा की यातले दहा खेळाडू जर आउट झाले तर मॅचच संपली. अशीच काहीशी घटना घडली जेव्हा इंग्लंडचे जिम लेकरने विरुद्ध पक्षाच्या टीममधील खेळाडूंना एकट्यानेच आउट करून टाकलं.

ही १९५६ सालातील गोष्ट आहे. त्या वर्षी ३१ जुलैला जिम लेकरने ही अपूर्व कामगिरी केली.

विचार करा एकाच बॉलरने सगळा डावच संपवून टाकला. म्हणजे त्याच्या एकट्याच्या जिवावर पूर्ण मॅच जिंकली. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर धुवाधार कामगिरी केली.

 

जर तुम्हाला वाटत असेल की, हे रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या नशिबामुळे मिळवलं तर ते चूक आहे. कारण याच बॉलरने अप्रतिम कामगिरी केल्यामुळे १९ कसोटीत १९ विकेट घेतल्या. म्हणजेच प्रत्येक खेळातच ते फार उत्कृष्ट कामगिरी करत होते.

पण एका खेळात त्यांनी कमालच केली. एकट्यानेच सर्व डाव संपवण्याची कामगिरी जिम लेकरने इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये केले होते.

ही एैतिहासिक मॅच मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सिरीज च्या चौथ्या टेस्टमध्ये झाली होती. त्या टेस्ट मॅचच्या पहिल्या डावात  ३७ रन आणि ९ विकेट त्याने घेतल्या होत्या.

 

ESPNcricinfo.com

 

तेव्हा जिम लेकर सगळ्या १० च्या १० विकेट घेऊ शकले नाहीत कारण एक विकेट टॉनी लॉकने घेतली होती. ३१ जुलैला टेस्टच्या शेवटच्या दिवशी खेळताना दुसर्‍या डावात ८४/२ स्कोरवरून परत खेळायला सुरुवात केली.

जिम लेकरने विकेट घेणं सुरूच ठेवलं. त्यांना ऑस्ट्रेलियाचा कोणताही खेळाडू थांबवू शकत नव्हता, लेन मेडॉक्स ची शेवटची विकेट एलबीडब्ल्यू झाला आणि त्याच बराबेर ५३ रन देऊन संघाचे १० च्या १० विकेट जिम लेकरच्या खात्यामध्ये गेले.

त्या टेस्ट मॅचमधील एकूण २० मधील १९ विकेट त्यांनी एकट्यांनी घेतले आणि इंग्लंडने एक डाव आणि १७० धावांनी विजय मिळवला.

हा सामना ३१ जुलै १९५६ रोजी संपला आणि त्यांचं रेकॉर्ड झालं. एकाच माणसाने ऑल आउट म्हणजे सर्व खेळाडूंची विकेट घेतली. तर जिम लेकर प्रमाणेच रेकॉर्ड एक नाही दोन नाही तर तब्बल ४३ वर्षांनंतर लेगस्पिनर अनिल कुंबळेने १९९९ साली केले.

एका भारतीय खेळाडूने. या रेकॉर्डमुळे त्या खेळाडूचं नाव जगभरातील तमाम क्रिकेटपटूंच्या हृदयावर कायमचे कोरले गेले.

खरेतर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे अर्थातच जबाबदारी सर्वांवर असते, पण कधीकधी संघातला एकच खेळाडू अशी काही कामगिरी करतो की, त्यामुळे पूर्ण संघ यशस्वी होतो.

ती घटना होती टेस्ट क्रिकेटच्या एका डावात दहा बळी घेण्याची.

 

YouTube

 

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या कसोटीत दिल्लीमध्ये एका डावात १० बळी घेण्याची नोंद केली. पाकिस्तानला ४२० धावा करायच्या होत्या. पाकिस्तान १०१ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली होती, कुंबळेने त्यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले.

अनिल कुंबळेने दहाच्या दहा विकेट घेतल्या आणि त्याने ७४ रनसुद्धा केल्या होत्या. अनिल कुंबळेने असामान्य गोलंदाजी केली.

अशा १० च्या १० विकेट घेणारा अनिल कुंबळे हा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याच्या या यशाचे सर्वत्र खूप कौतुक झाले व त्याच्या नावावर हे रेकॉर्ड नोंदवलं गेलं.

पण तरीही जिम लेकरचं रेकॉर्ड तसंच राहिलं कारण त्यांनी एकाच खेळामध्ये १९ विकेट घेतल्या. आज २८ वर्षांनी जीम लेकर, अनिल कुंबळे यांच्या यादीत आणखीन एका खेळाडूचं नाव सामील झालं ते म्हणजे एजाज पटेल.

 

CricketCountry.com

क्रिकेट किंवा कोणताही खेळ हा सांघिक असतो. दोन खेळाडूंच्या एकमेकांवरील विश्‍वासावर किंवा त्यांच्यातील अंडरस्टँडिंगवर खेळ अवलंबून असतो, पण कधीतरी एकच खेळाडू आपलं सारं कौशल्य पणाला लावतो व सर्व मॅचचा विजय आपल्याच खिशात घालतो आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version