आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पाकिस्तानला कानफाट्या नाव पडूनही एक मोठा काळ उलटला. त्यानंतर स्वतःचा शिक्का पुसण्यासाठी पाकिस्तानी प्रयत्न तर काहीच केले नाहीत. आणि आपल्या भौगोलिक राजकीय स्थानामुळे पाकिस्तानने कायमच अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून स्वतःचे लाड पुरवून घेतले.
आजही ही आपल्याला पाकिस्तानची असणारी गरज पूर्णपणे संपलेली नाही हे ते देश मान्य करतात. या अनुषंगाने तिथला आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदला झालेली अटक अभ्यासावी लागेल.
सईद याला अटक झाल्यावर भारतामध्ये साधारणतः दोन प्रतिक्रिया उमटल्या.
एक, अनेकांना यात काहीच विशेष वाटलं नाही. दुसरं, अनेकांना यात फार मोठी घडामोड दिसून आली. दोन्ही अभिनिवेश बाजूला ठेवून हाफिस ससईदच्या अटकेकडे नीट पहावे लागेल.
पाकिस्तान सध्या आर्थिक अवर्षणाच्या पल्याड पोहोचला आहे. १९८० च्या दशकात पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताची स्पर्धा करत असे. मात्र राजकारणात धर्माला अधिकृत स्थान देऊन, त्या धर्माच्या वाढीसाठी अधिकृत प्रयत्न करून, सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकायचा हव्यास पाकिस्तानला नडला.
सौदीकडे किमान तेलाच्या विहिरी तरी होत्या. पाकिस्तानकडे तेही नव्हतं त्यामुळे राष्ट्र उभारणीसाठी आर्थिक पायाभरणीसाठी झिया उल हक यांच्या काळापासून प्रयत्न ठार संपले.
आजची पाकिस्तानची अवस्था हा त्याचा परिणाम आहे. दहशतवाद विरोधात लढ्याच्या नावाखाली पाकिस्तानने पाश्चात्य देशांकडून अव्वाच्या सव्वा मदत नेहमीच उकळली. परंतु स्वतःच्या देशांमध्ये अतिरेकी तयार करणे, त्यांना पूर्ण प्रोत्साहन देणे, हे काही थांबवलं नाही.
परिणामी वार लावून जेवणाऱ्या व्यक्तीपेक्षाही या देशाची अवस्था खराब झालेली दिसून येते.
चीनची पाकिस्तान मधली गुंतवणूक हा एक अतिशय मोठा अध्याय आहे. ज्या ज्या देशांमध्ये चिमणी गुंतवणूक केली तेथे देश चीनचे आर्थिकदृष्ट्या मांडलिक झाले. कारण गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली. परंतु गुंतवणूक ही कर्जाचा रूपातच होती.
या कर्जाच्या परतफेडीसाठी देण्याचे पैसे या देशांकडे नव्हते, म्हणून हे दोष कर्जबाजारी होऊन बसले.
साध्या शब्दात सांगायचं तर वर्षाला काही ही लाख रुपये उत्पन्न असणार्या माणसाला एखाद्या सावकाराने मर्सिडीजसाठी कर्ज द्यावे, आणि त्या माणसाला मर्सिडीजमधून उभे राहणाऱ्या एखाद्या बिझनेस मोडेलचे स्वप्न दाखवून भुरळ घालावी.
प्रत्यक्षात त्या मॉडेल मधून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्या सामान्य माणसाकडे पैसेच नाहीत.
बदल्यात सावकाराने त्या सामान्य माणसाच्या प्रिय वस्तूवर किंवा व्यक्तीवर डोळा ठेवावा, अशा स्वरूपाचं वर्तन चीन हा देश करतो हेच चीनने श्रीलंकेबरोबर हबनटोटा भाग विकसित करताना केलं.
हा त्या देशाचा आर्थिक आणि तदनुषंगाने भौगोलिक विस्तारवादच आहे. वन बेल्ट वन रोड या चीनच्या महत्वाकांक्षी योजनेला हवा तसा प्रतिसाद का मिळत नाही हे यावरून समजेल.
म्यानमारमध्येही चीनने हेच केलं. परंतु हुशारीने दोन्ही प्रसंगी ही गुंतवणूक भारताने वापरली, आणि ह्या भागांच्या वापराची व्यावसायिक किंमत त्या त्या देशांना दिली. परिणामी या देशांकडे चीनच्या पैशाची परतफेड करायला रक्कम शिल्लक राहिली.
भारताबरोबर स्वतःच्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासून वैर पत्करलेल्या पाकिस्तानने असं पाऊल उचलणं हा त्या देशाचा राष्ट्रीय अपमान होता.
जे चीनने म्यानमार आणि श्रीलंकेमध्ये केलं तेच त्यांनी बलुचिस्तानमध्ये केलं. भौगोलिक दृष्ट्या बलुचिस्तान भारताचा पाकिस्तानचा चाळीस टक्के भाग व्यापतो. लोकसंख्या मात्र फक्त पाच टक्के.
त्यामुळे बलुचिस्तानमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं आश्वासन तर मिळतं, परंतु त्यातून हाती काहीच लागत नाही, ही पाकिस्तानची शोकांतिका.
बलुचिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्रात तेलाचे मोठे साठी हाती लागतील. या आशेवर पाकिस्तान जगत होता. परंतु याही शोधामध्ये खर्च प्रचंड झाला आणि हाती मात्र मोठा भोपळा.
परिणामी निव्वळ चीनच्या गुंतवणुकीची परतफेड करायला पाकिस्तानला एका भल्यामोठ्या बेल आऊट पॅकेज ची गरज होती. हा एवढी मोठी पार्श्वभूमी हाफिज सईदच्या अटके मागे आहे.
२६/११ च्या हल्ल्यानंतर भारताने सबळ पुरावे दिले, आणि पाकिस्तानच्या हल्ल्यातला सहभाग जगासमोर आणला हाफिज शहीद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे जगाला मान्य करावे लागेल हे तत्कालीन भारत सरकारचे यश.
परंतु राष्ट्र म्हणून आपल्या सार्वभौमत्वाचा मान, तसेच भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण असल्याने पाश्चात्य प्रदेशांना मदत, याच्या जोरावर पाकिस्तानने सरळ कानावर हात ठेवले. आणि हाफिज सईद हा पाकिस्तानात मोकाट फिरत राहिला
आता काळ बदलला आहे. पाकिस्तानला चिनी कर्जाची परतफेड करायला मोठ्या रकमेची गरज आहे.
सहा अब्ज डॉलरचा पहिला हप्ता देण्याचं ठरलं खरं, परंतु अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यात मोडता घालून दहशतवादाची नांगी ठेवण्याच्या बाबतीत पाकिस्तान प्रामाणिक असावा असा धोशा लावला.
त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून पाकिस्तानला मदत देण्याचा घाट घातला गेला, त्यावेळी फायनान्शिअल ॲक्शन टास्क हॉर्सने त्याला विरोध केला.
या FATF च्या मागे भारताचा मोठा हात आहे. कारण पाकिस्तानच्या वाईट वागणुकीची झळ थेट भारताला भेट लागते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मेरिकेच्या दौर्यावर जात आहेत. एकूणच अर्थव्यवस्था आणि आणि पाकिस्तानला मिळणारी रक्कम यावर खल होईल, आणि किमान तोंडदेखल्या दहशतवाद विरोधी लढ्यापुरता पुरता हाफिज सईद आत गेला आहे हे पाकिस्तान दाखवेल, यात शंका घेण्याजोगी परिस्थिती नाही.
किमान तीन दशके असंच वागून स्वतःच्या अर्थव्यवस्थेची, समाजकारणाची आणि देश म्हणून प्रतिमेची पाकिस्तानने अशीच वाताहत केली आहे. त्या मालिकेतला हा पुढचा अंक.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.