Site icon InMarathi

पतीच्या बलिदानानंतर पत्नी झाली देशसेवेसाठी रुजू – प्रेरणादायी घटना!

samir abrol feature inmarathi

mynation

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सैन्यातील जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीशी आपण परिचित आहोतच. लाखो जवान आणि त्यांचे कुटुंबीय अहोरात्र आपल्या सेवेत जरी गुंतले असतील, तरी ते प्रकाशझोतात फक्त तेव्हाच येतात जेंव्हा काहीतरी ‘दिव्य’ घडते.

मग तो विजय असूदेत, विजयामागे आलेली शहादत किंवा हौतात्म्य.. आपण तेव्हाच त्यांच्या जखमा पाहू शकतो. इतकी वर्षे असणारी दुखरी नस तेंव्हा फुटून भळभळू लागते आणि आपल्या दृष्टीक्षेपात येते.

त्यावर तात्पुरती मलमपट्टी आपण सर्वच करतो, बायाबापड्या डोळ्याला पदर लावतात, पुरुष हळहळ व्यक्त करतात, शाळेत २ मिनिटांची आदरांजली दिली जाते, चौकचॊकात श्रद्धांजली चे बॅनर लावले जातात.

मीडिया वर उर फोडून फोडून गोष्टींचे खुलासे केले जातात, त्यांच्या विधवांना मदतीच्या आशा दाखविल्या जातात.. आणि २ दिवसांनी? बूम…. सगळं गायबच कि हो.

 

Alt News

 

या लोकांचं आयुष्य खूप खडतर आहे हे अमान्य करता येणंच शक्य नाही. विशेषतः त्यांच्या कुटुंबीयांचं. आपल्या घरातील कर्ता दोन दिवस घरात नसेल तर आपली पाच पन्नास काम अडून राहतात.

तुम्ही कितीही परिपूर्ण असलात तरी त्याच स्थान अढळ असत. ते प्रत्येक घरात सारखंच. यांच्यातही वेगळं काही नाही. त्यांनी फक्त त्यांच्या कर्त्याला देशसेवेसाठी अर्पण केलेलं असत.

त्या मनावरच्या दगडाखाली एक आशेचा दिवा सतत तेवत ठेवतात. स्वप्नातही त्यांच्या सतत भीती वाटत असावी जेंव्हा पती/मुलगा सीमेवर लढण्यासाठी किंवा जीवावर बेतणारी कामगिरी करण्यासाठी निघत असावा.

अशी एक लाट येते आणि तो दिवा विझून जातो, त्याचा सोबत त्याच्या प्रकाशात पाहिलेले स्वप्न, गोष्टी आणि आठवणी सर्व काही झाकोळून जाते.. आयुष्यातल्या त्या अंधारात मग उरतं वैधव्य, पोरकेपण आणि यातना..

आजवरच्या इतिहासात तर असे कित्येक दिवे विझले गेले. अनेक घरातील जवानांना हौतात्म्य आले..

फेब्रुवारी २०१९ मध्ये मिराज २००० ची एच ए एल च्या विमानतळावर चाचणी घेत असताना झालेल्या अपघातात आपण गमावलेल्या सर्व वैमानिकांपैकी त्यांचे प्रमुख समीर अब्रोल हे देखील होते.

 

Onmanorama – Manoramaonline

 

अपघातात सर्वांनाच हौतात्म्य प्राप्त झाले. नंतर झालेल्या इतर घटनांमध्ये हि बातमी आणि तिचे पडसाद हवेतच विरून गेले. परंतु त्यांची पत्नी सौ. गरिमा अब्रोल यांनी एक अतिशय कठोर निर्णय घेऊन या प्रसंगाला पुन्हा एकदा समोर आणले!

लेखक स्वप्नील पांडे यांनी एक पोस्ट केली होती ज्यात त्यांनी म्हटले आहे कि, सैन्यातील जवानांच्या पत्नी या अगदी वेगळ्या धातूच्या बनलेल्या असतात.

एक जवान घडण्यासाठी आणि घडविण्यासाठी किती दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत लागते पण ती त्याहूनही जास्ती या गणवेशधारी लोकांच्या पत्नी बनण्यासाठी लागत असावी.

सौ. गरिमा अब्रोल आठवतात का? स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल जे मिराज २००० च्या अपघातात हुतात्मा झाले होते, त्यांच्या पत्नी.

 

 

त्यांनी मध्यंतरी इंस्टाग्राम वरती असे नमूद केले होते की,

” माझे अश्रू अजून देखील सुकले नाहीत, मला नेहमीच माझ्या पतीला एक कप चहा देऊन अगदी ताठ मानेने देशसेवेसाठी पाठवायला आवडत होते “पुढे त्या म्हणतात की, “ते सोडून जात असताना कुटुंबीय सोडून अजून कोणीच रडत नसते.”

हे तुम्हाला प्रसिद्धी देत नाही किंवा सेलिब्रिटी बनवत नाही, मीडिया याला १ दिवसासाठी सनसनाटी बातमी बनवते पण हे त्यांना समजत नाही की एक लढाऊ वैमानिक बनवायला किती दशकांची मेहनत असते.”

या धाडसी महिलेने एएफएसबी वाराणसीकडून एएफएमध्ये सामील होण्यासाठी शिफारस केली होती आणि त्या २०२० च्या जानेवारी पासून आपल्या सेवेत रुजू होतील अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून मिळाली होती!

 

Times Now

 

मी त्यांना विचारले कि,

” इतकं सगळं झाल्यानंतर पुन्हा ‘वायुसेवाच का?” यावर त्या म्हणाल्या “त्यांच्या पावलाववर पाऊल ठेवून उभे राहिल्यावर काय वाटते हे मला पाहायचे आहे, त्यांच्या देशसेवेचे वारसा पुढे असाच चालत राहिला पाहिजे,

त्यांचा गणवेश परिधान केल्याने मला तो टिकवून ठेवण्याची आणि जगण्याची प्रेरणा मिळाली”

मी निशब्द होतो. आपल्यातले कित्त्येक जण झुरत राहतात जेंव्हा त्यांना वाटते कि आयुष्य जगण्याची प्रेरणा त्यांनी गमावली आहे आणि इथे हि महिला, त्या हुतात्म्यांची वीरपत्नी त्याचा गणवेश घालून, अश्रू पुसून त्याचाच वारसा चालविण्यासाठी सज्ज झालेली आहे.

मला खरंच असे वाटते कि महिलांनी, मुलींनी खोट्या जगात असणाऱ्या सेलिब्रिटी पेक्षा अश्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे. असा रस्ता निवडला पाहिजे जो बरोबर आहे आणि ज्यामुळे तुमची मान कायम ताठ राहील.

गरिमा त्यांच्या एका पोस्ट मध्ये म्हणतात कि, ” मी गरिमा अब्रोल,हुतात्मा झालेल्या स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांची पत्नी, माझे अश्रू अजून आटले नाहीत, तुम्ही सोडून गेले आहेत हे सत्य मलाजूनही पचवता आले नाही.

 

the quint

 

कोणाकडेच माझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. तुम्हीच का? माझे पती एक स्वाभिमानी भारतीय होते, त्यांना देशसेवेसाठी पाठवायला मला आवडत होते, मला त्याचा अभिमान होता.

प्रत्येक वीरपत्नीच्या मनात एक भीती असतेच, कि कधी तिच्या पतीला लढाईसाठी बोलावले जाईल आणि त्यांचे दर्शन पुन्हा होईल कि नाही, माझ्याही मनात हि भीती कायम असायची, कित्येकदा तरी मी आणि भीतीदायक स्वप्नांतून घाबरून उठायचे.

पण समीर मला जवळ घेऊन समजावत असत कि हेच त्यांचं कार्य आणि कर्तव्य आहे, देशाला गरज असताना जाणे त्यांना भाग आहे. मी एक निडर आणि धाडसी व्यक्तिमत्व असावं असा त्यांना वाटत असे, जे कि ते स्वतः देखील होतेच.

कितीतरी वैमानिकांना त्यांचे आयुष्य गमवावे लागले, यामुळे आमचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. आपल्या व्यवस्थेत काही त्रुटी आहेत का?

वैमानिक हा एका दिवसात बनत नाही त्यासाठी खूप दशके लागतात अतिशय कष्ट लागतात. आपला दुसरा दिवस उजडावा यासाठी ते लढतात.

अजून कोना बहिणीवर हि वेळ येऊ नये असे मला मनापासून वाटते. हे किती यतनादायक आहे याचे मी वर्णन करू शकत नाही. मला उत्तरे हवी आहेत. मी त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहीन. ”

 

DNA india

 

ज्या हत्याराने जखम झाली आहे तेच हत्यार उचलून पुन्हा लढणे अतिशय धोकादायक आणि अवघड असते पण जावे त्यांच्या वंशा…  ती धमक ती जिद्द जर या एका वर्दीने गरिमा यांना मिळाली असेल तर आपण अजूनही काही गमावलेले नाहीच.

आपण सोशल मेडिया वरती यावर ‘खूप छान, सुंदर’, ‘आगे बढो’, ‘अभिमान वाटतो’ वेगैरे प्रतिक्रया देण्यापेक्षा आहोत तिकडे जिद्दीने कार्य करणे आणि यश मिळवणे सार्थ ठरेल.

पदर आड लपून न बसता, कोणाकडून कसल्याच मदतीची किंवा सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता,  सर्व परीक्षांना अगदी सक्षमपणे पार पडत आपल्या ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलेल्या या वीरपत्नीला आमचा सलाम.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version