' विमानाच्या काचा गोल असण्यामागचं ‘शास्त्रीय’ कारण तुम्हाला ठाऊक नसेल! – InMarathi

विमानाच्या काचा गोल असण्यामागचं ‘शास्त्रीय’ कारण तुम्हाला ठाऊक नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुकराम महाराज पुष्पक विमानावर बसून वैकुंठी गेले होते अशा गोष्टी आपल्या पुराणात आपल्या ऐकल्या आहेत, आणि विमान या गोष्टीचं कुतूहल अगदी त्या प्रसंगापासून लोकांच्या मनात आहे!

आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. विमानाचा प्रवास असं नुसतं म्हंटल तरी सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो भला मोठा खर्च!

 

pushpak viman 2 inmarathi

 

अमेरिकेतले Wright Brothers यांनी जगातले पहिले ऑटोमेटेड विमान बनवून त्याचं यशस्वी उड्डाण केले! तसेच जगातल्या पहिल्या विमानाचे मॉडेल बनवणारे हे दुसरे तिसरे कुणी नसून एक भारतीय आहेत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शिवकर तळपदे या भारतीयाने १८९५ मध्ये पहिल्या विमानाचं मॉडेल जगासमोर आणलं! ते मुंबईतले असून त्यांचा संस्कृत आणि वेदांचा फार दांडगा होता!

तर ह्या अशा विमानातून आज सगळं जग सर्रास प्रवास करतं! अगदी आपल्याइथे देशातल्या देशात सुद्धा लाखो लोकं विमानाने प्रवास करतात!

 

wright brothers inmarathi

 

याचं कारण एकच सर्वात जास्त अंतर काही किरकोळ वेळेत विमान कापते आणि त्यामुळे वेळेची प्रचंड बचत होते!

अगदी लहान मुलांसपासून वृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला विमानात एकदातरी बसायची इच्छा असतेच, त्यात मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा, तो आरामदायी प्रवास प्रत्येकाला एकदातरी अनुभवायचा असतो!

पण हे विमान कसं चालतं, त्यासाठी नेमकं काय इंधन लागतं अगदी इथपासून कित्येक विचित्र प्रश्न सुद्धा आपल्या मनात येतात!

 

emirates inmarathi

या विमान नावाच्या यंत्राने जगात जन्म घेतल्यापासून सामान्य मनुष्याच्या समोर अनेक प्रश्नांचं जाळं उभं केलंय. लहाना पासून थोरांपर्यंत प्रत्येकजण विमानाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतो.

आपल्या इथे कुणी विमानाने प्रवास करणार असेल तर त्याला मुद्दाम चिडवायला एक सूचना कायम दिली जाते, ती म्हणजे “खिडकीतून हात बाहेर काढू नकोस” अशी!

गंमतीचा भाग बाजूला ठेवून तुम्ही कधी विचार केला आहेत का विमानातल्या खिडक्यांना उघडण्याची सोय का नसते किंवा त्यांचा आकार असा का असतो?

असाच बुचकळ्यात टाकणारा प्रश्न  तुम्हाला कधीच पडला नाही का? म्हणजे विमानाच्या काचा गोल का असतात?

ज्यांनी विमानातून प्रवास केला आहेत त्यांना देखील विमानात बसल्यावर हा प्रश्न नक्की पडला असणारं. चला तर मग आज जाणून घेऊ या विचित्र प्रश्नामागचं शास्त्रीय उत्तर!

 

aeroplane inside inmarathi

 

तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की विमानाच्या काचा या काही पहिल्यापासून गोल नाहीत. पूर्वी या काचा चौकोनी आकाराच्या होत्या.

परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.

‘हेवीलँड कॉमेट’ या प्रसिद्ध विमानाचा १९५० मध्ये शोध लागला. त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या विमानाचा नावलौकिक होता. प्रवाशी क्षमतेबाबतही हे विमान इतर विमानांच्या तुलनेने सरस होते.

विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते पण त्यांच्याकडून एकच चूक झाली, ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की,

१९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.

 

de-havilland-comet-marathipizza

 

तपासा अंती असे निष्पन्न झाले की, विमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला.

हवेच्या अति दाबासमोर काचा तग धरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या परिणामी विमान खाली कोसळले. या घटनेनंतर होणारे अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला.

या गोल काचांना कोपरे नसल्याकारणाने काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसते.

 

round window inmarathi

आता तुम्हाला कळलंय या गोल काचांमागचं ‘गोल’ गुपित!

तर ही आहे खरी गोम विमानाच्या खिडक्या अशा गोल आकाराच्या असण्यामागे, तुम्हालाही ही माहिती नव्हती ना? मग ही माहिती तुमच्या महितीतल्या लोकांना सुद्धा सांगा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?