पाण्यात पडलेल्या फोनवर हे प्रयोग चुकूनही करू नका, फार महागात पडेल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मोबाईल फोन सध्या अन्न ,वस्त्र आणि निवारा ह्यासारखीच जीवनावश्यक वस्तू झाली आहे. त्यामुळे बहुतेक लोक कुठेही गेले सतत त्यांचा मोबाईल फोन त्यांच्या जवळच ठेवतात.
अगदी टॉयलेट-बाथरूम मध्येही फोन बरोबर नेणारी मंडळी भरपूर आहेत.
स्विमिंग पूलवर किंवा समुद्रावर मजा म्हणून गेले तरी फोन बरोबर असतोच.
मस्त धबधब्याच्या ठिकाणी आपण जातो, तिथेही सेल्फी काढायला किंवा निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी फोन बरोबर असतो.
ह्या सगळ्यात आपण शक्यतोवर आपल्या फोनची काळजी घेतोच. पण चुकून कधी फोन पाण्यात पडला तर मग अवघड होते. कारण फोन ही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने तो पाण्यात पडल्यावर हमखास खराबच होतो.
फोन जर उघडता येऊन त्याची बॅटरी बाहेर काढता येण्यासारखी असेल तर लोक लगेच बॅटरी बाहेर काढून सुकवत ठेवतात. एकदा फोन पाण्यात पडल्यावर तो बाहेर काढून दुरुस्तीला टाकणे ह्यापलीकडे आपण काहीही करू नये.
त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी तज्ज्ञ लोकांवर टाकावी आणि आपण पैसे देण्यास तयार राहावे. बाकी फोन कायमचा निकामी व्हायला नको असेल तर इकडचे तिकडचे व्हिडीओ बघून स्वतःच टेक्निशियनगिरी करायला जाऊ नये.
मोबाईलला स्प्लॅश प्रूफ कोटिंग केले म्हणजे मोबाईल वॉटरप्रूफ झाला असे होत नाही. त्यामुळे चुकून पावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर पुढील १० गोष्टी चुकूनही करू नका.
१. हेअर ड्रायरने सुकवणे
बऱ्याच व्हिडीओज मध्ये असे दाखवतात की फोन चुकून पाण्यात पडला तर तो हेअर ड्रायरच्या मदतीने सुकवता येऊ शकतो. पण असे करणे चुकीचे आहे. तुमचा फोन बाहेरून-आतून सगळीकडून ओला झाला असेल तर तो चुकूनही हेअर ड्रायर वापरून सुकवण्याचा प्रयत्न करू नका.
हेअर ड्रायर मधून भरपूर उष्णता बाहेर पडते. आपण तो आपल्या केसांच्या जास्त जवळ नेला तर आपल्याला चटका बसतो. तर मोबाईलमधील आतले सर्किट आणि इतर पार्टस नाजूक असतात.
ते कुठल्या मटेरियलचे बनवलेले असतात हे आपल्याला माहिती नसते. हेअर ड्रायरच्या उष्णतेने आतील सर्किट वितळण्याची शक्यता असते. तसेच ते निकामी होण्याची शक्यता असते. म्हणून हेअर ड्रायरने मोबाईल सुकवण्याचा प्रयत्न करू नये.
२. बॅटरी चार्ज करणे
पाणी आणि वीज एकत्र आले तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आपण शक्यतोवर ओल्या हातांनी विजेची उपकरणे हाताळत नाही. तसेच विजेची उपकरणे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे पाण्याच्या संपर्कात येऊ देत नाही.
तसेच मोबाईल भिजला असेल तर चुकूनही तो चार्ज करू नका.
त्यामुळे त्यातील आतले सर्किट किंवा काही पार्टस कायमचे निकामी होऊ शकतात. तुम्हाला फोन चार्ज होतोय की नाही हे बघायचे असेल तर एकवेळ पावर बँकला फोन कनेक्ट करून बघा पण डायरेक्ट भिंतीवरच्या सॉकेटला फोन चार्जिंगला लावू नका.
३. हेडफोन ३.५ mm जॅकला कनेक्ट करू नका
तुमचा फोन पूर्णपणे भिजला असेल तर तुमचे हेडफोन वापरू नका. आणि ३.५ mm जॅकला तर कधीच कनेक्ट करू नका. लक्षात घ्या. तुमच्या फोनमध्ये बॅटरी आहे, आणि तिच्यात वीज साठवलेली आहे.
सध्या तुमच्या फोनमध्ये पाणी शिरलेले आहे. वीज आणि पाणी एकत्र आले तर शॉक बसतो हे आपण शाळेतच शिकलो आहोत. त्यामुळे भिजलेल्या फोनला शक्यतोवर हेडफोन कनेक्ट करूच नका.
त्यातल्या त्यात ३.५ mm च्या जॅकमध्ये तर कधीच कनेक्ट करू नका. हेडफोनमधून वीज पास होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला शॉक बसू शकतो.
४. सिम कार्ड बाहेर काढू नका
तुमचा फोन भिजला असेल आणि सुरु होत नसेल तरी चुकूनही घरच्या घरी सिम कार्ड काढण्याच्या भानगडीत पडू नका. सिम कार्डचा ट्रे बाहेर काढताना त्यात असेलेले पाणी मोबाईलमध्ये आणखी आजपर्यंत जाण्याची शक्यता असते.
फोन दुरुस्तीला देताना ते लोक काळजीपूर्वक सिम कार्डचा ट्रे काढू शकतात. त्यांना त्यातील माहिती असते. आपण त्यातील तज्ज्ञ नसल्यामुळे आपण आपल्याच मनाने किंवा नेटवरचे व्हिडीओ बघून काहीही करायला जाऊ नये.
५. भिजलेला स्मार्टफोन सुरु ठेवू नका
तुमचा फोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडून सुद्धा चमत्कारिकरित्या अजूनही सुरु राहिला असेल तर तो ताबडतोब बंद करा. भिजलेला फोन तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे खराब होऊ शकेल.
कारण पाणी विजेच्या उपकरणांचा शत्रू आहे.त्यामुळे तो सुरु ठेवू नका आणि लगेच बंद करा आणि कुठल्याही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उघडायला जाऊ नका. तांदळाच्या पिशवीत फोन ठेवला तर तो सुरु होतो ही एक अंधश्रद्धा आहे.
६. पाणी बाहेर काढण्यासाठी फोन हलवू नका
फोन पाण्यात पडून त्याच्या आतपर्यंत पाणी गेले असेल तर चुकूनही फोन जोरात हलवू नका किंवा झटकू नका. ह्याने पाणी आणखीनच आतपर्यंत जाऊन तुमच्या मोबाईल फोनच्या आतील सर्किट खराब होऊ शकेल.
७. फोन स्वतःच उघडू नका
वर म्हटल्याप्रमाणे फोन बंद पडला असेल तर आपल्या मनाने किंवा डू इट युअरसेल्फ टाईपचे व्हिडीओ बघून मोबाईल घरच्या घरी उघडू नका.किंवा बॅटरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. ह्या प्रयत्नात मोबाईलचा कुठलाही नाजूक पार्ट खराब होऊ शकतो.
८. फोन दुरुस्तीला देताना खरं सांगा
आपण फोन दुरुस्तीला देताना खरं काय घडलं ते सांगणे गरजेचे आहे. जसे डॉक्टरपासून काहीही लपवून ठेवू नये तसेच मोबाईलच्या डॉक्टरांना म्हणजेच टेक्निशियनला सुद्धा ऍक्सीडेन्ट कसा झाला आणि किती वॉटर डॅमेज असू शकेल ह्याची कल्पना द्या.
म्हणजेच मोबाईल पावसात भिजला कि पाण्याने भरलेल्या बादलीत पडला हे खरं खरं सांगा. म्हणजे टेक्निशियन सुद्धा योग्य ती काळजी घेऊन मोबाईल उघडतील.
त्यांना आपण खोटे सांगितले तर त्यांच्याकडून मोबाईल उघडताना अनावधानाने हवी ती काळजी घेतली जाणार नाही आणि मोबाईल खराब होऊ शकेल.
९. कुठलीही बटणे दाबू नका
मोबाईल पाण्यात पडून बंद पडला असेल तर एकदा तो चालू करून बघा. पण तो सुरु होत नसेल तर उगाच सतत व्हॉल्युम आणि पावर ची बटणे दाबू नका. ह्याने त्या बटणांच्या गॅप मधून आत शिरलेले पाणी अधिक आतपर्यंत जाण्याची शक्यता असते.
१०. मोबाईलमध्ये फुंकर मारू नका
आपल्या तोंडातील हवेमध्ये वाफेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोबाईल भिजला असेल तर त्यात फुंकर मारू नका. ह्याने फोन सुकणार तर नाहीच उलट त्यातील आर्द्रतेचे प्रमाण अधिक वाढेल.
फोन पाण्यात पडल्यावर तो ताबडतोब बंद करून शक्यतोवर लगेच दुरुस्तीला द्या. त्याने फोन कायमचा निकामी होण्यापासून वाचवता येईल.
—
- मोबाइल हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती आहे? या काही टिप्स वाचा!
- टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या ४ वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.