Site icon InMarathi

थेट माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात तिने स्वतःचं मेडिकल स्टोर उघडण्याचं असामान्य धाडस केलंय

tribal-girl InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जिद्द मनात असली की, ती पूर्ण करण्यासाठी माणूस कितीही कष्ट करू शकतो. फक्त आपलं उद्दिष्ट ठरलेलं असलं पाहिजे. मग ती स्त्री असो वा पुरुष. हे सिद्ध केलंय एका आदिवासी २३ वर्षीय मुलीने. पाहुया काय आहे तिची कथा.

नक्षलवाद म्हणजे भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ.

गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहेे.

असाच एक नक्षलवाद्यांचा परिसर आहे छत्तीसगडमध्ये. अबूझमाड जंगल हे छत्तीसगडमधील एक असा भाग आहे की तो अज्ञात आहे आणि ज्याचा अजूनही जगाशी पूर्ण संपर्क नाही.

 

 

स्वातंत्र्यानंतरही त्याचा महसूल नकाशा किंवा नागरी प्रशासन नाही. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीमुळे सरकार त्या भागावर नियंत्रण करू शकत नाही.

भारतात अजूनही काही असे भाग आहेत की जिथे सोई-सुविधा पोहोचू शकत नाहीत. तिथली लोकं प्रतिभावान आणि कलात्मक आहेत पण ती अजूनही यशासाठी संघर्ष करत आहेत.

कारण हे डोंगराळ प्रदेश आहेत. गोंड, मुरिया, अबुज मारिया आणि हलबास इथे आदिवासींचे घर आहे. नारायणपूर, बीजापूर आणि दांतेवाडा जिल्ह्यांचा समावेश आहे.

या भागात आवश्यक सुविधांचा सुद्धा अभाव आहे. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, ६६ किलोमीटर शिवाय मूलभूत गरजांची दुकानं नाहीत.

दिवसातून ठरावीक वेळी चार बसशिवाय कोणतंही सार्वजनिक वाहन नाही. तिथे फोनची सोय अगदी काही भागातच आहे, पण जंगल भाग असल्यामुळे ती सेवाही कधी खंडित होईल सांगता येत नाही.

 

thehindu.com

 

पण अलीकडच्या काळात राज्य सरकारने मओवादी क्षेत्रात पोलीस अधिकार्‍यांची संख्या वाढवली आहे त्यामुळे थोडं संरक्षण मिळालं आहे. इतर क्षेत्रांच्या तुलनेत ओर्च कमी धोकादायक आहे इथे बुधवारी बाजार भरतो.

तिथे बरेचसे लोक चालत बाजार नेण्यासाठी येतात, पण माओवाद्यांच्या बंडखोरीमुळे ऑर्चमधील स्वस्त किंमतीत औषधं देणारं जनसुधा केंद्र काही महिन्यांपूर्वी बंद पडले. त्यामुळे लोकांना औषधं घेण्यासाठी ७० किलोमीटर प्रवास करावा लागत असे.

मेडिकल सेवा ही अत्यावश्यक सेवा असते. जिथे शहरातून २४ तास मेडिकल उघडे असते तर तिकडे या आदिवासी भागात काही तास प्रवास केल्याशिवाय औषधं मिळत नव्हती.

किती भयानक वास्तव आहे हे? एखाद्याला अचानक काही त्रास होऊ लागला तर औषध आणण्यासाठी जाणं-येणं करण्याचा वेळ 5-6 तास लागू शकतात. त्यातून काही ठरावीकच वेळी गाड्या आहेत.

हे सर्व पाहून नारायणपूर तेथील २३ वर्षीय मुलीने एक धाडसी निर्णय घेतला. औषधं, इतर दैनंदिन वस्तू जसे की टूथपेस्ट आणि सेनिटरी नॅपकीन्स याचे दुकान म्हणजेच मेडिकल स्टोअर काढण्याचे ठरविले.

 

 

१३ एप्रिल रोजी मुरिया जमातीच्या किर्ता दुर्पाने एक मेडिकल स्टोअर उघडलं त्यामुळे ओर्खा आणि शेजारच्या गावातील कुटुंबाना खूप मदत झाली. २०१४ मध्ये युनिसेफच्या कार्यशाळेमुळे तिला धैर्य मिळाले.

१२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला आर्थिक अडचणींमुळे शाळेतून बाहेर पडावे लागले.

त्याच काळात युनिसेफ स्वयंसेवक या क्षेत्रातील कुपोषणाबद्दल जागरूकता पसरवत होते.  स्वयंसेवकांसाठी कीर्ता दुभाषी बनली आणि ७० पेक्षा जास्त गावांमध्ये तिने मोठ्या प्रमाणावर प्रवास केला.

किर्ता म्हणते,

‘‘मी जेव्हा गावांना भेट दिली, तेव्हा कुपोषण, गरिबी याबरोबरच मूलभूत गरजांची कमी होती. त्यामुळे आरोग्य आणि पालनपोषण या समस्या लक्षात आल्या. जे लोक चौरस आहार घेऊ शकत नव्हते म्हणजे तेवढी त्यांची परिस्थिती नव्हती, पण खरेदी करण्यासाठी २० किलोमीटर प्रवास नाइलाजास्तव करत होते.’’

तेव्हा तिने या परिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी करावे असा विचार केला आणि मेडिकल स्टोअर उघडण्याचा विचार आपल्या कुटुंबीयांना बोलून दाखवला.

जेव्हा ती हे बोलली तेव्हा तिचा भाऊ डॉ. सुखराम दोरप्पा यांनी तिला प्रोत्साहन दिले. आणि गावातील अधिकार्‍यांसमोर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

सरपंच आणि स्थानिक लोक या गोष्टीने खूश झाले आणि तिने जर दुकान उघडले तर ते नक्की तिकडेच खरेदी करतील असं आश्‍वासन दिलं.

 

The Better India

तिचा भाऊ जो क्लिनिकमध्ये काम करतो, त्याने तिच्या प्रकल्पाला आर्थिक मदत केली आणि रायपूरमधील फार्मासीस्टशी संपर्क साधण्यास मदत केली.

गरजांनुसार दर महिन्याला ती स्टॉकची माहिती घेते आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात औषधं मागवते. दुकान १२ तास चालू असते आणि १५-२० ग्राहक या सेवेचा लाभ घेतात. जी कीर्ता कॉलेजमध्ये गेली नाही, पण आता दर महिन्याला २००० रुपये मिळवत आहे.

२००० ही किंमत त्या भागात खूपच जास्त आहे. त्यामुळे ती कुटुंबाला आर्थिक मदत देत आहे म्हणून पालकांना तिचा अभिमान आहे, आणि स्थानिक लोकांना ती सुविधा देत आहे म्हणून ती आनंदी आहे.

तसंच इथलं वातावरण माओवाद्यांचं असलं तरी तिच्या व्यवसायामुळे आत्तापर्यंत तिला कधीही प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागलं नाहीये. त्यामुळे ती इतर लोकांना विश्‍वास देऊ शकते की, ते दुसर्‍या भागात मेडिकल स्टोअर उघडू शकतात किंवा तिचा व्यवसायही आणखीन वाढू शकतो.

तिने उचललेले हे पाऊल खरोखरच धाडसी आहे.

 

Livemint

 

नारायणपूर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद राम गोता या तरुण महिलेची स्तुती करत आहे. ते म्हणतात,

‘जे कोणी करू शकलं नाही, ते या तरुणीने केलं. ज्या भागात कधीही हिंसाचार होऊ शकतो. अशा भागात एक मेडिकल स्टोअर उघडणं हे खरंच खूप धैर्याचं काम आहे.

अबुजमादमध्ये मलेरिया, अतिसार आणि त्वचेचे संक्रमण खूपच सामान्य आहेत आणि त्यांच्यासाठी वेळेवर औषध घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ती आमच्यासाठी आणि ग्रामीण लोकांसाठी प्रेरणादायी आहे.’

खरंच म्हणतात ना मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. भारताचा इतिहासात झाशीची राणी, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई अशा आणखीन खूप थोर वीरांगना होऊन गेल्या. त्यांचीच गादी आत्ताच्या मुली चालवत आहे.

जरी शस्त्र वेगळी असली तरी युद्ध तेच आहे आणि खरंच त्या ते जिंकत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम.

तिच्या या कार्याला अधिक यश मिळो. तिला आणखीन प्रेरणा मिळो आणि या आदिवासी भागाचं रूपांतर एका विकसित भागात होवो. कीर्ताच्या प्रयत्नांमुळे लोकांचे प्रचंड कष्ट, पैसा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जीव वाचायलाही नक्की मदत होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version