पूर्ण शहरात पाण्याची वानवा असताना या बहाद्दराकडे ६ महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतातील इतर शहरे आणि गावांप्रमाणेच चेन्नई शहराला पाणी टंचाई भेडसावत आहे, मात्र या शहरात असा एक अवलिया आहे ज्याच्याकडे अशा पाणी टंचाईतही ६ महिने पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे.
चेन्नई शहरातील राजकीलपक्कम येथील वासुकी रस्त्यावर ४८ वर्षीय व्ही के रविराजा नावाचे विमा सल्लागार, पत्नी आणि २ मुलांसह राहतात.
गेल्या वर्षी त्यांनी हजारो लिटर पावसाचे पाणी जमा केले. जेव्हा ९ वर्षांपूर्वी रविराजा यांनी १००० स्के फुट चे घर बांधले तेव्हाच छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग(पावसाचे पाणी जतन करणे) ची उभारणी केली.
परंतु २०१४-१५ मध्ये त्यांनी पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली मजबूत करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी एक दोन नव्हे तर चार प्रकारच्या रेन रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभारल्या आहेत. ते सांगतात त्यांच्याकडे घराच्या छतावर ४५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे तिचे त्यांनी ज्यात १५०० लिटर आणि २००० लिटर असे २ कप्पे केले आहेत.
संपूर्ण पावसाळ्यात १५०० लिटर पावसाचे पाणी एका कप्प्यात गोळा होते आणि रोज १० ते २० लिटर याप्रमाणे पुढील पावसाळ्यापर्यंत सहज पुरते.
उरलेला ३ हजार लिटर चा कप्पा हा बोअरवेल आणि महापालिकेचे पाणी यातून भरला जातो.
सर्वात प्रथम त्यांनी छतावर ६६ स्क्वे फुट चा ओव्हरहेड बांधला आणि अशाप्रकारे उतार दिला कि त्याच्या छतावर पडणारे सर्व पाणी छिद्रातून त्या टाकीत जमा होईल.
टाकीला ड्रील करून हे छिद्र तयार केले, या छिद्रातून घाण टाकीत जाऊ नये यासाठी त्याला पांढरे कापड लावले आणि नळांना फिल्टर बसवले आहेत.
रविराजा सांगतात त्यांच्या चौकोनी कुटुंबाला रोज ८ ते १० लिटर पिण्याचे पाणी लागते, ती सर्व गरज या प्रकल्पातून भागवली जाते.

६ जुलै २०१७ रोजी शहरात ४७.३ मिमी पाऊस झाला तेव्हा टाकीत ३०० लिटर पाणी जमा झाले , २ दिवसापूर्वी जेव्हा (२३ जून २०१९) ४० मिनिटे पाऊस झाला तेव्हा २० लिटर पाणी जमा झाले.
जून २०१९ पर्यत १५०० लिटर पाणी जमा झाले आहे, पुढील वर्षापर्यंत छतावरील ओव्हरहेड टाकीची क्षमता १५०० वरून ३००० लिटर करणार आहेत.
हे सर्व करताना कोणत्याही विजे वर चालणा-या अथवा महागड्या मेकॅनिकल उपकरणांचा वापर केलेला नाही केवळ गुरुत्वाकर्षण आणि उतार याचा वापर केला आहे.
पाणी टाकीवर केलेल्या छिद्रातून आत जोडलेल्या पाईप मधून टाकीत प्रवेश करते धूळ आणि घाण फिल्टर करण्यासाठी दोन ते तीन पदरी पांढ-या कापडाचा उपयोग केला आहे.
रविराजा यांनी सांगितले धूळ-घाण साठून राहून पाईप चोक अप होउ नये म्हणून वेळोवेळी ते कापड बदलतात. सदरचे जमा झालेले पाणी तसेच शुद्ध राहावे याचीही ते पूर्ण काळजी घेतात.
टाकीला त्यांनी घट्ट झाकण लावले आहे जेणेकरून घाण आत जाऊ नये. सूर्यप्रकाश आत जाऊन पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये तसेच पाण्यात शेवाळ तयार होऊ नये.

कोरड्या ऋतूमध्ये म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्यात ओव्हरहेड टाकी वर पॉलीथिन च्या शिट्स अंथरल्या जातात जेणेकरून धूळ टाकीत जाऊ नये. पावसळ्यात या शिट्स काढून टाकल्या जातात.
रविराजा पुढे सांगतात इथे बोअरवेल चे पाणी (भूजल) क्षारयुक्त आहे, यातील क्षार टाकीच्या तळाशी जमा होते आणि पाण्याचे पाईप चोक अप होतात बऱ्याचदा आणि पाण्याचा प्रवाह हळू होतो किंवा खंडित होतो.
<script async src=”https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”></script>
<ins class=”adsbygoogle”
style=”display:block; text-align:center;”
data-ad-layout=”in-article”
data-ad-format=”fluid”
data-ad-client=”ca-pub-7898017800141414″
data-ad-slot=”7686851932″></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
भूजलाचा टी डी एस हा २००० मिली/लिटर च्या आसपास आहे आणि आर ओ फिल्टर ने हे पाणी शुद्ध करून देखील १०० ते २०० मिली/लिटर पर्यंत राहतो.
मात्र रेन रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे जमा केलेल्या पाण्याचा टी डी एस हा १० मिली/लिटर एवढाच आहे. यामुळे आर ओ फिल्टर ची गरज राहिली नाही व त्या खर्चातही बचत झाली.
शिवाय त्यांना आर ओ फिल्टर आवडत नाही, कारण यामध्ये केमिकल वापरली जातात शिवाय, मशीन चा देखभाल- दुरुस्ती खर्च आणि शुद्धीकरण प्रक्रियेत बरेच पाणी वाया जाते.

आणि आर ओ ने शुद्ध केलेले पाणी पिल्यास आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात या सर्व समस्यातून सुटका झाली. ओव्हरहेड टाकीची ते नियमित पणे सफाई करतात खासकरून पावसाळ्यात.
या छतावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यतिरिक्त घराच्या कपौंड मध्ये पडणारे पावसाचे पाणी १० फुट खोलीच्या १३ हजार लिटर क्षमतेच्या हौदात जमा करतात.
पाणी हौदात पडण्यासाठी त्यांनी उताराचा वापर केला आहे जेणेकरून पाणी इतरत्र साठून न राहता थेट हौदात पडावे. हौदाचे छिद्राच्या वर (पाणी जमा होण्यासाठी केलेले) नायलॉन जाळी लावली आहे जेणेकरून घाण जाऊ नये.
या व्यतिरिक्त बोअरवेल चे पुनर्भरण करण्यासाठी (बोअरवेल रिचार्ज) बोअर च्या पाईप भोवती २ फुट खोलीचा खड्डा घेतला आहे आणि पाईपला बरेचसे छिद्र पाडले. घाण आत जाऊ नये म्हणून पाईप भोवती नायलॉन ची जाळी लावली.
घराच्या अंगणात त्यांनी फारशी ऐवजी पेव्हिंग ब्लॉक टाकले आहेत कुठेही सिमेंट चा वापर केलेला नाही जेणेकरून पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरेल.
रविराजा यांनी स्वयंपाक घरातील खरकटे अन्न व मानवी विष्ठा याचा वापर करून बायो गॅस प्रकल्प उभारला आहे ज्यातून रोज दोन तास इंधन त्यांना मिळते.

याशिवाय २ किलो वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्पही उभारला आहे. त्यातून रोज ८ युनिट विजेची निर्मिती होते. सर्वात महत्वाचे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग चा खर्च हा एकदाच आणि अतिशय कमी आहे.
पाणी टंचाई आहे म्हणून हातावर हात ठेवून नुसते बसून न राहता मार्ग कसा काढायचा हे रविराजा यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
विशेष म्हणजे २००१ साली तामिळनाडू राज्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग हे नवीन इमारत बांधणी करताना बंधनकारक करण्यात आले होते त्याचा अनुकूल परिणाम काही वर्ष दिसला.
भूजल पातळीत वाढही झाली मात्र नंतर खराब अंमलबजावणी मुळे हि परिस्थिती ओढवली.
रविराजा सांगतात, आपण जर शहाणपणाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर खराब भूजलावरचे आपले अवलंबित्व आपण कमी करू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.