Site icon InMarathi

“मोदी लाट” असो नसो – एक नवी “Modi” लाट नक्कीच येतीये, जी फारच सुखावह आहे!

akshay inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

‘अच्छे दिन’ आणि मोदीलाट यांची चर्चा नेहमीच सुरू असते. भारताला ‘अच्छे दिन’ मिळण्यासाठी किती वाट पाहावी लागणार आहे माहीत नाही, पण आणखीन एक लाट येत आहे तिला मात्र नक्कीच अच्छे दिन आले आहेत. पाहुया ही काय कथा आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती, मोडी लिपी.

महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६० ते १३०९ हेमाडपंत या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला, परंतु नंतर मुद्रणात प्रगती होत गेली.

छापाईसाठी ही लिपी अवघड होती. त्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला.

हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्यांनी केली. मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते.

असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते. अशा या मोडीलिपीची लाट पुन्हा येत आहे.

 

ancient.com

दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीचे अक्षय प्रभुदेसाई ज्यांचे वय 36 आहे आणि ते एका फार्मा फर्मचे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते एका व्हाटस्अॅपग्रूपचे सदस्य झाले. ज्याचे नाव होते Modi 11!

या ग्रुपमध्ये उस्मानाबादमधील पुजारी आणि मस्कतमधील एक पुरुष आणि महाराष्ट्रातील नऊ पुरुष व महिलांचा समावेश आहे.

या ग्रुपमध्ये मराठीची सख्खी चुलत बहिणीप्रमाणे दिसणार्या मोडी लिपीच्या वर्णांचे फोटो आहेत. मे महिन्यात प्रभुदेसायांनी ठरवले की त्यांना जो एक आवड, छंद आहे त्याचा पाठपुरावा करायचा.

त्यांची आवड होती मोडी लिपीचा अभ्यास करणे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. त्यांनी मोडी लिपीवर काही पुस्तके आहेत का हे ऑनलाइन शोधायला सुरुवात केली.

७०० वर्षांपूर्वीचं कर्स्यु, शॉर्टहँडमधील पेशव्यांनी वापरलेली ही लिपी त्यांना फोटो स्वरूपात पाहायला मिळाली, पण विरामचिन्हे, भाषेचे स्वरूप आणि शब्दांमधील अंतर यामुळे मराठी भाषा पुढे आली आणि मोडी लिपी मागे पडली.

अक्षय प्रभुदेसाई यांनी व्हाटस्अॅप क्लासचा आधार घेतला. प्राथमिक अभ्यासक्रमासाठी ७९९ रुपये फी आकारली गेली. गंमत म्हणजे आता त्याची मुलं त्याला होमवर्क करताना बघतात.

 

timesofindia.com

प्रत्येक दिवशी, अक्षय प्रभुदेसाई एक पेन घेऊन बसतात, एका पानावर एक ओळ काढतात. त्यांच्या शिक्षकाने व्हाटसअॅपवर पाठविलेल्या प्रतिमेतील अक्षरे कॉपी करतात, सर्व अक्षरे ध्वन्यात्मक फरकाने लिहितात आणि परत आपल्या शिक्षकांना पाठवतात.

त्यांची दोन मुले ९ वर्षांची अनन्या आणि ५ वर्षांचा अर्णव आपले बाबा अभ्यास करतायत त्यामुळे उत्सुकतेने हे पाहात असतात.

प्रभुदेसाई म्हणतात की, ‘‘आता मोडीमध्ये मी माझ्या नावाची स्वाक्षरी करू शकतो.’’ त्यांचे शिक्षक हे नाशिकमधील २४ वर्षांचे युवक आहेत. सोज्वल साली असे त्यांचे नाव आहे.

ते राज्य सरकार प्रमाणित ‘मोडी स्क्रिप्ट ट्रान्सक्प्टिर’ आहेत, त्यांच्या व्हाटसअॅप वर्गाचा आत्तापर्यंत २००० लोकांनी लाभ घेतला आहे. साली यांच्या व्हिजिटिंग कार्डवर “Modi Script Expert’ असं त्यांनी नमूद केलं आहे.

२०१६ साली साली एक्साइज ऑफिसमध्ये काही कामासाठी गेले असता त्यांनी ऑफिसरकडे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले.

तेव्हा त्या अधिकार्याला आश्चर्य वाटले की, दीड वर्षांच्या काळात मोदींनी म्हणजे सध्याचे जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी दीड वर्षांत आपली लिपीपण काढली?

या वक्तव्यावरून साली यांना कळले की, मोडी लिपी किती दुर्लक्षित आहे जी १२ व्या शतकातल्या एका पंतप्रधानानेच वापरात आणली होती.

 

mtculture.com

नावात साधर्म्य आहे, इंग्रजी भाषेमध्ये स्पेलिंग चेवळ हे सारखेच आहे, पण मराठीत मात्र त्याचे उच्चार भिन्न आहेत. ‘मोडी लिपी’ व मोदी हे आडनाव आहे जे सध्या सर्वश्रुत आहेच.

पौराणिक कथा अशी आहे की, यादव वंशाचे पंतप्रधान हेमाद्री पंडित यांनी १२६० मध्ये ही लिपी जाहीर केली आणि १९५० या दशकाच्या अखेरीस ही लिपी शिकवणं बंद करण्यात आलं.

आज मोदी ट्रांसक्रिप्टर्स म्हणतात की, पुणे आणि तंजौरसारख्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधी ऐतिहासिक कागदपत्रांपैकी काही कागदपत्रांचेच अचूक भाषांतर केले गेलेलेच नाही.

कारण महाराष्ट्रात १० टक्क्यापेक्षा कमी मोडी अनुवादक अचूक आहेत आणि सत्तरटक्यांपेक्षा जास्त अनुवादक चुकीचे आहेत, पण आत्ताच्या या डिजिटल युगामुळे काही नवीन प्रयत्न समोर येऊ लागलेत.

संशोधकांचे अॅप्स ‘मोडी लिपी शिका’ तसेच हे व्हाटस्अॅप ग्रुप. यामुळे मोडी लिपीकडे लोकांचे लक्ष वेधले जातेय.

‘मोडी लिपी शिका’ हे अॅप २०१६ पासून १०,००० लोकांनी डाऊनलोड केलंय. या अॅपमधून तुम्हाला मोडीतून अंक कसे लिहायचे किंवा कसे मोजायचे हे शिकवलं जातं.

 

timesofindia.com

विशेष म्हणजे हे अॅप वापरणार्या ४० टक्के महिलाच आहेत. सीडॅकचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांच्या मते,

‘सरकारच्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे कदाचित यामध्ये लोकांना स्वारस्य वाटू लागले आहे, पण यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.’ असेही त्यांनी सांगितले.

कारण ‘मोडी पुरातन दस्तावेज जतन प्रणाली’ या सीडॅकच्या सॉफ्टवेअरला मिळणार प्रतिसाद खूपच कमी आहे. हे सॉफ्टवेअर संशोधकांना विविध मोडीलिपीतील दस्तावेज उपलब्ध करून देते जे वेगवेगळ्या संस्थांद्वारे अपलोड केले जातात.

नुकताच अधिकृत फॉन्ट मिळूनसुद्धा ही लिपी अजूनही अडचणींनी भरलेली आहे. हात न उचलता ही लिपी लिहावी लागते.

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कालखंडात ही लिपी वेगवेगळी दिसते कारण लेखकांच्या वेगवेगळ्या साधनांवर अवलंबून होती. मुंबईमधील ७६ वर्षीय शिक्षक रामकृष्ण बुट्टेपाटील मोडी लिपी लिहिण्यासाठी शाळेत असताना ‘बोरू’ (लिखाणाचे लाकडी साधन) वापरायचे.

 

modilipitranslatoramitmusale.business.site

त्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांच्या काळात बोरू वापरला जात होता, त्याचप्रमाणे ‘टाक’ (लाकडी दांड्यामध्ये टोक) पेशव्यांच्या काळात वापरला जात होता. तर इंग्रजांच्या काळाने फाउंटन पेनाचा वाढता वापर पाहिला.

ज्यामुळे फाँट छोटा व वाचणे अधिक अवघड बनत गेले. त्याचप्रमाणे काही पर्शियन व उर्दू शब्द देखील शिवाजी महाराजांच्या काळात व त्याच्या आधीच्या काळात स्क्रिप्टमध्ये समाविष्ट झाल्याचे दिसून येते.

पीएचडी स्टुडंटस्, आर्किटेक्टस्, डॉक्टर्स, वकील, गृहिणी अशा लोकांना मोडी लिपी शिकवणारे बुट्टे पाटील सध्या पहिल्यांदाच मोडी लिपी मंत्रालयात शिकवत आहेत.

जेथील विद्यार्थ्यांमध्ये डेप्युटी सेक्रेटरी ऑफ कल्चरल अफेअर्स विलास थोरात यांचा समावेश आहे.

मोडी लिपी शिकण्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, ‘‘यामुळे इतिहास तर समजेलच, पण वैयक्तिक फायद्यांसाठीसुद्धा याचा उपयोग होईल कारण वडिलोपार्जित बरीचशी कागदपत्रे ही त्याच स्क्रिप्टमध्ये लिहिली आहेत.’’

 

HuffPost India

‘‘ही लिपी टिकण्यासाठी तरुण वर्गाने ही लिपी शिकली पाहिजे, पण अडचण अशी आहे की, लोकं फक्त आपलं नाव व सही इतक्याच गोष्टी लिहायला शिकून थांबतात हे विधान साली यांनी केलं आहे.

बुट्टेपाटील यांनी विविध कॉलेज, विद्यापीठं व शाळा यांच्यामध्ये ‘मोडी लिपी विभाग’ असणे किती आवश्यक आहे हे सांगणारी बरीचशी पत्रे शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधानांना लिहिली आहेत.

पंतप्रधानांच्या नावाशी साधर्म्य असणार्या या लिपीला चांगले दिवस यावेत हीच सदिच्छा. आणि ‘मोदी लाट’ प्रमाणे ‘मोडी लाट’ सुद्धा जोरात येऊ दे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version