' आता अॅमेझॉनवरही जुन्या वस्तू विकता येणार! – InMarathi

आता अॅमेझॉनवरही जुन्या वस्तू विकता येणार!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जुन्या वस्तू ऑनलाईन विकणे-खरेदी करणे आता काही नवीन राहिले नाही. अश्या असंख्य वेबसाईट्स इंटरनेटच्या महाजालावर जुन्या वस्तू विकण्याच्या-खरेदी करण्याच्या सेवा पुरवतात. या वेबसाईट्समुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे घर बसल्या, कोठेही न जाता व्यवहार करता येऊ लागला. त्यामुळे या सेवांना ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आता याच संदर्भात आनंदाची गोष्ट ऐका! विश्वसनीय सेवेमुळे ग्राहकांच्या मनामनात घर करून बसलेल्या अॅमेझॉनने देखील जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या ऑनलाईन बाजारात पाउल ठेवले आहे.

amazon-sign-martahipizza

स्रोत

अॅमेझॉनने भारतामध्ये ‘पिक-पॅक अँड पे’ सेवा सुरु करत ऑनलाईन बाजारात आपला विस्तार वाढविला आहे. अॅमेझॉनने ऑगस्ट २०१६ मध्ये जुनी पुस्तकं विकण्याची सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर आता इतर वस्तूही विकता येणार आहेत. सध्या जुना मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, गॅजेट, व्हिडिओ गेम्स, म्यूझिक सीडी विकता येतील आणि नव्या वस्तूही खरेदी करता येतील. सध्या ही सेवा केवळ बंगळुरुमध्ये सुरु असून लवकरच काही मोठ्या शहरांमध्ये सुरु होऊ शकते.

मुख्य म्हणजे ग्राहकांना वस्तू विकायची असल्यास कुठेही जाण्याची गरज नाही. अॅमेझॉनकडून तुमच्या दारात येऊन वस्तू नेली जाईल आणि त्याची किंमत ठरवण्याचाही अधिकार ग्राहकाला असेल.

amazon-service-marathipizza

स्रोत

अॅमेझॉनने ही सेवा Junglee या वेबसाईटसोबत सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना विक्रेता म्हणून नोंदणी करण्यासाठी Junglee वर जाऊन registaration करावे लागेल. Junglee वेबसाईट देखील अॅमेझॉनच्या मालकीचीच आहे. ही वेबसाईट एक हजार रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर १० रुपये चार्ज घेईल, तर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या वस्तूंवर १०० रुपये चार्ज घेणार आहे.

जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री सेवा देणाऱ्या इतर वेबसाईट या जास्त विश्वसनीय नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. परंतु दुसरीकडे अॅमेझॉन मात्र ग्राहकांचा विश्वास न तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अॅमेझॉनने जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या ऑनलाईन मार्केट मध्ये आपला दबदबा निर्माण केला तर नवल वाटायला नको !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?