' धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल! – InMarathi

धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

“महेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. तो मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र तो त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. तो ज्या कंपन्यांच्या बॅट्स वापरत होता त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो ही कृती करत आहे”.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याचे व्यवस्थापक अरुण पांडे एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगत होते.

 

m.s dhoni using different bat logos InMarathi

 

सामन्याच्या सुरवातीला त्याच्या हातात एका कंपनीचा लोगो असलेली बॅट असते तर उत्तरार्धात दुसऱ्याच कंपनीचा लोगो असलेली बॅट त्याच्या हातात असते.

आता खेळपट्टीवर तसेच सर्वत्र इतके कॅमेरे बसवलेले असतात की खेळाडूंच्या अंगावरील जर्सी वर कोणकोणत्या कंपन्यांचे लोगो लावलेले असतात किंवा एखाद्या क्रिकेटपटूची हेअर स्टाईल कोणती आहे? त्याने हातावर कोणता टॅटू गोंदवून घेतला आहे इत्यादी माहिती प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर सहजरित्या बघायला मिळतेय. याचीच लगेच चर्चा सुरू होते.

 

M.S-Dhoni using different bat logos 5 InMarathi

 

मध्यंतरी धोनीने त्याच्या गल्व्हजवर भारतीय सैन्याचे बलिदानाचे प्रतीक मानले गेलेले त्रिशूल हे चिन्ह वापरले होते.

त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघाने बराच गदारोळ उठवला होता व “कोणीही क्रिकेटपटू राजकीय अथवा धार्मिक चिन्ह सामना चालू असताना वापरू शकत नाही”. असे विधान केले होते. यावर सोशल मीडियात बरीच उलटसुलट चर्चा चालू झाली.

 

ms dhoni inmarathi

 

मात्र धोनीने हे चिन्ह उतरवण्यास साफ नकार दिला होता. धोनीला भारतीय सैन्य दलात कर्नल हे अधिकाराचे व मानाचे पद देऊन त्याचा गौरव केला होता.

सध्या धोनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेला आहे आणि त्याला सैन्याची पेन्शन मिळत आहे, त्यामुळेच तो त्रिशूलचा बॅज वापरू शकतो असे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितल्यावर चर्चा थांबल्या.

 

M.S-Dhoni using different bat logos 1 InMarathi

 

इंग्लंड विरुद्धच्या एका सामन्यात धोनी संथ खेळला असा त्याच्यावर टीकेचा भडिमार होत असतानाच आणखी एक गोष्ट नव्यानेच समोर आली ती म्हणजे धोनी सामन्यात आपली बॅट बदलताना दिसतोय.

काय असेल या मागील कारण?

शोध घेताना लक्षात आले की प्रत्येकवेळी बॅटवरील लोगो बदललेला असतो. धोनी अगदी क्रिकेटमध्ये नवखा होता तेव्हापासूनच BAS कंपनीच्या बॅट्स वापरत होता.

Beat All Sports या कंपनीच्या बॅट्स दर्जेदार समजल्या जातात आणि धोनी अगदी सुरवातीच्या काळापासून याच कंपनीच्या बॅट्स वापरून धावा काढत आहे.

धोनीच्या सुरवातीच्या संघर्षाच्या काळात BAS कंपनीने त्याला खूप मदत केलेली आहे. धोनी अजून दोन कंपन्यांच्या बॅट्स वापरतो त्या आहेत SS आणि SG. या दोन्ही कंपन्यांच्या बॅट्स त्याने अनेक सामन्यांच्या दरम्यान वापरलेल्या आहेत.

धोनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅट्स का वापरत असावा या चर्चेला उत्तर देताना त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे म्हणाले होते की, केवळ कृतज्ञता एवढीच भावना धोनीच्या मनात आहे. बाकी काही नाही.

 

ms dhoni bat 2 inmarathi

 

ज्या कंपन्यांशी खेळाडूचा करार होतो त्या कंपन्यांची जाहिरात खेळाडू करत असतो व खेळ चालू असताना त्या कंपनीचा लोगो खेळाडूने वापरणे बंधनकारक असते. हा लोगो वापरण्यासाठी कंपनी वार्षिक दीड दोन करोड ते आठ किंवा नऊ करोड रुपये खेळाडूला देत असते.

धोनी SS म्हणजेच सरीन स्पोर्ट्स या क्रिकेटचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीशी बराच मोठा काळ जोडला गेलेला होता. तसेच SG या क्रिकेट साहित्य बनवणाऱ्या कंपनीशी देखील करारबद्ध होता.

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढउतार चालू असताना SS, SG, आणि BAS या कंपन्यांनी त्याच्या सोबतचे करार रद्द न करता चालू ठेवले तसेच नवीन करार देखील केले.

 

M.S-Dhoni using different bat logos 2 InMarathi

 

बऱ्याचदा खेळाडू जखमी झाल्याने खेळू शकत नाहीत किंवा बॅड पॅच म्हणजे वाईट काळ सुरू असताना बऱ्याच कंपन्या आपले करार मोडतात किंवा नवीन करार करत नाहीत. अशावेळेस खेळाडू आर्थिक संकटात सापडू शकतो.

ऐन उमेदीच्या काळात खेळाडू फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करू शकतात. इतर गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो.

तसेच काही वेळेस गंभीर दुखापती झाल्यास उपचारांसाठी येणारा खर्च अफाट असतो. काही दुखापती जन्मभराच्या असतात. निवृत्तीचे वय ३२ ते ३५ इतके म्हणजे अगदी तारुण्यातील असते.

त्या नंतर नोकरीच्या संधी कमी होतात. तेव्हा खेळ चालू असतानाच त्यांना पैसा जमवून गुंतवणूक करून साठवून ठेवायचा असतो. यासाठी जाहिरातीत काम करणे हा मोठा आधार असतो.

 

ms dhoni bat 3 inmarathi

 

धोनीच्या पडत्या काळात वरील कंपन्या त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यामुळेच धोनी आर्थिक आघाडीवर मजबूत राहू शकला. धोनने याच कंपन्यांच्या बॅट्स बदलून वापरल्या आणि त्यांचे आभार मानले.

पैशांची कमतरता नाही अशी स्थिती निर्माण झल्यावर त्याने कोणतेही शुल्क न आकारता अशा वेगळ्या पद्धतीने त्यांचे आभार मानायला सुरुवात केली.

M.S-Dhoni using different bat logos 4 InMarathi

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडल्यावर देखील आयपीएलसारख्या क्रिकेट लीगमधून तो आपल्याला भेटत राहिला आहे.

आजही त्याचे चाहते कमी झालेले नाहीत. माहीची महती सांगण्यासाठी एवढी गोष्ट पुरेशी आहे.

महेंद्रसिंह धोनी याने आपल्या उत्तम स्वभावाचे सुद्धा नेहमीच दर्शन दिले आहे. त्याच्या पडत्या काळात त्याच्यासह उभ्या राहणाऱ्या कंपन्यांप्रति त्याने व्यक्त केलेले आभार, हा याचाच एक नमुना म्हणता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?