आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
कर्करोग म्हटलं की ‘अरे बापरे’ हे शब्द आपल्या तोंडातून निघतातच. मग तो कोणत्याही अवयवाचा कर्करोग असुदे. या रोगाची भीती आपल्या मनात बसलेलीच आहे आणि ती खरीही आहे.
जरी आता कर्करोगावर उपचार निघाले असले तरी ते उपायही त्रासदायक आहेत. त्याच्यामुळे माणसाच्या सर्व शरीरावर परिणाम होत जातो.
आता खूप ठिकाणी कर्करोग कसा ओळखावा याबद्दल प्राथमिक माहिती दिली जाते, परंतु कधीकधी काही लक्षणं अशी असतात की ज्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही.
आज आपण ‘फुफ्फुसाचा कर्करोग’ याबद्दल थोडी माहिती घेऊ आणि अशी काही लक्षणं बघू जी बघताना आपल्याला सामान्य वाटतील, पण ती कर्करोगाची लक्षणंसुद्धा असू शकतील.
फुप्फुसाचा कर्करोग प्राथमिक स्तरावर लक्षात येत नाही, पण सामान्यत: फुफ्फुसाचा कर्करोग म्हटलं की, खोकला, छातीत दुखणे, कफ अशी त्याची लक्षणं असू शकतात.
पण या रोगामध्ये वेगळी लक्षणंसुद्धा आहेत की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.
१. जाड बोटं
काही फुफ्फुसातील ट्यूमर हार्मोनसारखी रसायने बनवतात. त्या रसायनांमुळे हातांच्या बोटांत जास्त रक्तप्रवाह होतो त्यामुळे बोटं नेहमीपेक्षा जाड आणि मोठी दिसू शकतात.
नखांपुढील त्वचा चमकदार वाटू लागते किंवा जेव्हा आपण त्यांच्या बाजूला पाहतो तेव्हा नखे नेहमीपेक्षा जास्त गोलाकार दिसतात. हे लक्षण सगळ्याच रोग्यांच्यात दिसेल असे नाही, पण सुमारे ८०% लोक, ज्यांना हा फुफ्फुसांचा कर्करोग आहे त्यांच्यात हे लक्षण दिसून येतं.
२. पोटात दुखणे
दहा लोकांना जर कॅन्सर असेल तर त्यातील एक किंवा दोघांच्यात कॅल्शिअम लेव्हल जास्त झाल्यामुळे हा रोग झाल्याचं दिसून येतं. तुमच्या रक्तात जर जास्त कॅल्शिअम जास्त झालं असेल त्याला हायपरकॅल्सेमिया म्हणतात.
त्याच्यामुळे पोटदुखी किंवा पोट दब्ब वाटणे असं वाटू शकतं. तुम्हाला काही खावसं वाटत नाही, पण तहान मात्र जास्त लागते.
कॅल्शिअम हा एक हार्मोनसारखाच प्रकार आहे ज्यामुळे गाठी तयार होऊ शकतात त्यामुळे किडणीलाही त्रास होतो आणि पायात गोळा येणे, सगळ्याचा कंटाळा येणे, आळस येणे असा प्रकार देखील होऊ शकतो.
३. मानसिक आरोग्य समस्या
डेन्मार्कच्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षी प्रथमच व्यावसायिकांना चिंता, निराशा आणि डिमेंशिया सारख्या आजारामुळे त्यांचे मानसिक आरोग्य तपासले गेले तर त्यामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले.
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे हार्मोनवर किंवा मेंदूवर परिणाम होण्याचे प्रकार फार क्वचित घडतात, पण होऊ शकतो. या कर्करोगाशी संबंधित असलेल्या कॅल्शिअम वाढीमुळे मन चलबिचल होते त्यामुळे नैराश्य येते व असा प्रकार होऊ शकतो.
४. पाठ किंवा खांदेदुखी
पॅनकॉस्ट ट्यूमर हा फुफ्फुसाचा कर्करोग आहे जो आपल्या फुफ्फुसांच्या वरच्या भागामध्ये वाढतो आणि आपल्या रक्तवाहिन्या पसरतो.
कधीकधी त्यामुळे श्वसनावर पण परिणाम होतो, पण बर्याच वेळा यामध्ये खांदा, पाठीचा वरचा भाग हे दुखणे सुरू होते म्हणजे हेही एक लक्षण आहे की, पाठदुखी किंवा खांदादुखी.
५. थकवा
हिमोग्लोबीन कमी होणे हे या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण जास्त करून दिसून येते.
हिमोग्लोबीनची पातळी कमी होणे याला अॅनिमिया म्हणतात, त्यामुळे थकवा येतो कारण आपल्या शरीरातील पेशींना आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तुमच्या अंगात ताकद राहात नाही.
६. तोल जाणे
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो ती कमी होते. आपले स्नायू कसे कार्य करतात त्यावर परिणाम होऊ शकतो.
बसल्यावर उभे राहणे कठीण होते किंवा उभे राहिल्यावर बसणे कठीण होते. शरीराचा तोल जातो. सगळ्यात मोठी नस जी हृदयापासून डोक्यापर्यंत जाते ती दबली जाते त्यामुळे असे प्रकार होतात.
७. वजन वाढणे
या कर्करोगामुळे शरीरातील हार्मोनमध्ये बदल होतात आणि त्यामुळे वजन वाढते. तुम्ही काहीही जास्त खाल्लं नाही तरी वजन वाढतच जाते आणि दुसरीकडे हायपरकलेसीमया मुळे मूत्रपिंडावर परिणाम होतो.
तसेच अॅनिमियामुळे भूकही कमी झालेली असते तरी वजन वाढतच असते.
८. डोळ्यांची समस्या
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे डोळ्यांचे विकारसुद्धा होतात. आपल्या चेहर्यावरील आणि डोळ्यांच्या नसांवरदेखील परिणाम होतो याला हार्नर सिंड्रोम म्हणतात.
याच्यामध्ये असेही परिणाम दिसतात की एका बाजूची पापणी खाली झुकल्यासारखी दिसते आणि त्या बाजूच्या चेहर्याला घामसुद्धा येत नाही.
९. पुरुषांमध्ये छातीला सूज येणे
फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये हे प्रमाण फार कमी आहे, पण हार्मोन्सवर हा कॅन्सर परिणाम करत असल्यामुळे पुरुषांमध्ये कधीकधी त्यांचं स्तन स्त्रियांसारखे मोठे दिसू लागतात.
१०. डोकेदुखी
रक्तवाहिनीतील बिघाड, कॅल्शिअमची वाढ यामुळे कधीकधी डोकेदुखी सुद्धा वाढू शकते.
जर आपल्याला डोकेदुखीची समस्या नव्यानेच चालू झाली असेल किंवा वेगळ्या स्वरूपातील डोकेदुखी असेल तर ते या रोगाचं सुद्धा लक्षण असू शकतं.
११. हृदय समस्या
हायपरक्लेसेमिया आणि अॅनिमिया या दोन्हींमुळे हृदयावर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा कोमामध्येही माणूस जाऊ शकतो.
१२. सूजमट मान, चेहरा, खांदे
जेव्हा तुमच्या नसा या फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे चोकअप होतात तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताला दुसरीकडे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही.
मग ते शरीराच्या वरच्या भागात साठते आणि चेहरा, मान, खांदे फुगीर दिसू लागतात. त्या भागाचा रंगही लालसर दिसू शकतो.
१३. रक्ताच्या गुठळ्या
या फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे घशात जळजळ होऊ शकते. पायात आणि खांद्याच्या इथे रक्ताच्या गुठळ्या पण होऊ शकतात.
तर मंडळी अशी ही कारणे आहेत जी फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
ही लक्षणं कर्करोगाची असतील याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही कारण ही अगदीच वेगळी लक्षणं आहेत जी सहजासहजी आपल्या लक्षातही येणार नाहीत.
हा फुफ्फुसाचा कर्करोग कशामुळे होतो हा एक महत्त्वाचा प्रश्न राहतोच. तर हा कर्करोग मुख्यत: तंबाखु खाणे किंवा धूम्रपान यामुळे होतो.
कधीकधी आपल्याबरोबरीचा सतत धूम्रपान करत असेल तरी त्याच्या धुराच्या त्रासामुळेसुद्धा दुसर्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो.
म्हणजेच काय तंबाखू, धूम्रपान किंवा कोणतेही व्यसन आपल्याला घातक आहेच पण आपल्या बरोबरीच्या माणसांसाठी पण ते घातक आहे. व्यसनामुळे आपल्या शरीराची, कुटुंबाची वाताहत होते.
कोणत्याही रोगामुळे स्वत:ला तर त्रास होतोच, पण आपलं कुटुंब पण त्यात दु:खी होऊन जातं. तेव्हा स्वत:चा आणि बरोबरीने सर्वांचा विचार करा आणि आपले जीवन सुखी व निरामय करायचे असेल तर व्यसनांपासून सावधान राहा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.