Site icon InMarathi

‘फाडफाड इंग्लिश’ बोलणारे असतात संभाषणात कच्चे, कसे ते एकदा वाचाच!

English Vinglish inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक भाषेची आपली स्वतंत्र लिपी देखील असते. फार पूर्वी भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा चित्रलिपी अस्तित्वात आली. चित्रांद्वारे संदेश दिले घेतले जाऊ लागले.

पुढे कधीतरी शब्द एकत्र जुळवून त्याची भाषा तयार झाली. पुढे कधीतरी त्या भाषेला नियम लावले गेले. ते नियम पाळून भाषा बोलू लागली.

अर्थात त्यासाठी हजारों वर्षांचा काळ जावा लागला. प्रत्येक ठिकाणी मानवाच्या विकासाबरोबर भाषेचा विकास होत गेला.

पण गम्मत अशी की जगाच्या ज्या ज्या भागात मानवी वस्ती होत गेली त्या त्या भागात वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात येत गेल्या.

 

 

याचा परिणाम असा झाला की जेव्हा एक वस्तीतील माणसे दुसऱ्या वस्तीतील माणसांना भेटू लागली तेव्हा संवाद कसा साधायचा हेच कळेनासे झाले. मग त्यावर एक उपाय निघाला की समोरच्या व्यक्तीची भाषा समजून घेणे.

जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात.

मानवी प्रगतीबरोबर भाषेची प्रगती होत गेली आणि दुसरी भाषा संवादासाठी शिकताना त्यातील शब्द आपल्या भाषेत सामावले गेले आणि प्रत्येक भाषा समृद्ध होत गेली.

डच,फ्रेंच आणि इंग्रज यांनी व्यापारानिमित्याने आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात प्रवेश केला आणि हळूहळू आपले बस्तान बसवीत सत्ता हातात घेतली.

 

 

इंग्रजांनी आपल्या व्यापारी आणि युद्धकौशल्याच्या जोरावर जगात पन्नास टक्यांपेक्ष्या जास्त भूभागावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि साहजिकच इंग्रजी भाषेचा सर्वत्र प्रसार झाला.

भारतासह अनेक देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली आल्याने इंग्रजी ही क्रमांक दोनची भाषा म्हणून मान्य पावली आणि हळूहळू जगभरातच ही भाषा संवादाचे माध्यम म्हणून वापरली जाऊ लागली.

लोकसंख्या वाढू लागली तशी संवादाची गरज देखील वाढली.कमी वेळेत जास्त संवाद साधता यावा किंवा लिखित स्वरूपात संदेश पाठवताना मोठे शब्द छोटे करण्याची प्रथा नव्याने निर्माण झाली.

 

Youth Incorporated Magazine

शब्दांचे लघुरुप अस्तित्वात आले. मोठे संदेश एक वाक्यात म्हणींच्या स्वरूपात अवतीर्ण झाले.असेच वाक्प्रचार निर्माण झाले.त्याचा फायदा असा झाला की खूप मोठ्या गोष्टी केवळ एक म्हण किंवा वाक्प्रचारात सांगता येऊ लागली.

भाषा वाकवावी तशी वाकते असे म्हणतात. इंग्रजीत तर एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. आता ब्रिटिश किंवा अमेरिकन दोघेही इंग्रजीतच बोलतात पण एखादा शब्द ते वेगळ्या अर्थाने घेऊ शकतात.

समजा एखादा ब्रिटिश नागरिक एखाद्या प्रोजेक्ट बद्दल “इट्स इंटरेस्टिंग”. म्हणाला तर त्याच्या उच्चार करायच्या पद्धतीवरून दुसरा ब्रिटिश त्याचा अर्थ “इट्स रब्बीश” असा घेऊ शकतो तर अमेरिकन त्याचा अर्थ काहीतरी ‘वेगळं आश्चर्यकारक’ असा घेऊ शकतो.

इंग्रजांनी इंग्लिश भाषा जगासमोर आणली आणि त्यामुळेच त्यांना वाटू लागले की आपली भाषा सगळ्यांना समजू लागलीय.

आपण बोललेलं सर्वच यांना समजतंय म्हणून ते आपल्या भाषेतच संवाद करू लागले. या पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे इंग्रजी भाषेत देखील शब्दांची लघुरूपे किंवा म्हणी व वाक्प्रचार हे इंग्रजी ज्यांची प्रथम भाषा नाहीय त्यांना कळण्यास अवघड जाऊ लागले.

परंतु इंग्रजांना याची दखल घ्यावीशी वाटत नाही.

खरंतर संवाद तेव्हाच चांगला होता जेव्हा समोरच्याला तुम्ही काय म्हणता हे व्यवस्थित कळते आणि तो काय म्हणतो हे तुम्हाला कळते.

 

पण ब्रिटिश मंडळी अतिशय तोऱ्यातच वावरत असतात. चांगले इंग्लिश येणे म्हणजेच चांगले संवाद कौशल्य मिळाले असे नाही.

ज्याला इंग्लिश मध्ये स्लॅन्ग लँग्वेज म्हणतात म्हणजेच अशी भाषा ज्यात शिव्या असतात, ग्राम्य भाषा असते किंवा जी फक्त आपापल्या गटातील लोकांनाच कळेल अशी भाषा, याचा वापर करून ब्रिटिश बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतच नाही तो काय बोलतो ते.

मिटिंग मध्ये भराभर बोलणे, म्हणींचा वापर करणे, आपल्या भागातील संदर्भ देणे, किंवा सांस्कृतिक संदर्भ देत बोलणे या मुळे ज्यांची दुय्यम भाषा इंग्रजी आहे त्यांना एकतर हे इंग्लिश कळत नाही किंवा ते त्याचा दुसराच अर्थ घेतात.

बीबीसी कॅपिटलने याचा एक किस्सा सांगितला होता. एका कंपनीचा एक खूप मोठा प्रोजेक्ट चालू होता.

ब्रिटिश साहेबांनी एक इंग्लिश भाषेत इ मेल आपल्या सहकाऱ्याला पाठवला .सहकारी इंग्रजी दुय्यम भाषा शिकलेला दुसऱ्या राष्ट्रातील होता, त्याला त्याचा अर्थ समजला नाही म्हणून त्याने शब्दकोश उघडून अर्थ बघितला.

त्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ दिसले, त्याने नेमका चुकीचा अर्थ घेतला आणि पुढे जाऊन कंपनीला करोडोंचे नुकसान झाले.

 

 

कंपनीकडून चौकशी सुरू झाल्यावर त्यात ही गोष्ट उघड झाली. बीबीसी कॅपिटलने तो शब्द कोणता होता हे उघड केले नाही पण घडले ते अशा अति उच्च इंग्लिशमुळे.

इंग्रजांना प्रत्येक शब्दाचे लघुरुप करायची जणू खोडच जडलीय. या विषयीचा एक किस्सा सांगितला जातो तो असा की एका इंग्रजाने आपल्या सहकाऱ्याला मेल केली,त्यात फक्त तीन ओ लिहिले होते. (“OOO”) आता तो सहकारी नेटिव्ह नसल्याने त्याला काहीच कळले नाही.

तुम्हाला माहितीय त्या मेलचा अर्थ काय असेल?? त्या मेलचा अर्थ होता..Out Of Office.

आता हे सरळ लिहिले असते तर काय बिघडणार होते?

असाच एक शब्द आहे ETA… एका नेटिव्हने आपल्या येण्याची वेळ कळवली होती ETA 16 .45 सहकारी जो ब्रिटिश नव्हता त्याला नीटसे उमगले नाही म्हणून त्याने दुसऱ्याकडे चौकशी करून समजावून घेतले.

ETA म्हणजे एस्टीमेटेड टाईम ऑफ अरायव्हल.

नॉन नेटिव्ह म्हणजे जे मूळ इंग्रज नाहीत आणि ज्यांची दुय्यम भाषा इंग्रजी आहेत ते जागतिक स्तरावर मिटिंग किंवा अन्य ठिकाणी इंग्रजीत बोलताना अतिशय जबाबदारीने विचारपूर्वक बोलतात तसेच वाईट शब्द कटाक्षाने टाळतात. कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी टाळतात.

आपण मांडत असलेला विषय समोरच्यांपर्यंत व्यवस्थित कसा पोचेल याची काळजी घेतात. त्यामुळेच ते यशस्वी होतात.

 

Printstop Blog

ब्रिटिशांनी या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. उगाचच म्हणी वाक्प्रचार वापरून भाषा कठीण करणे टाळले पाहिजे.

शेवटी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जिंकायचे असेल तर भाषा सोपी सुटसुटीत व समोरच्या व्यक्तीला समजेल अशीच हवी ,तरच तुमचा संवाद चांगला होऊ शकेल.

संवाद चांगला होण्यासाठी तुम्ही चांगले श्रोते असणंही महत्वाचे आहे. समोरच्याचे विचार ऐकून घेणे, त्याला योग्य ते उत्तर देणे, त्याच्या मागण्या किंवा विनंती याचा योग्य तो मान ठेवता येणे, त्याच्या प्रति आदर व्यक्त करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

 

 

नाहीतर तुम्ही अस्खलित इंग्लिश बोलणारे असूनही संवाद कौशल्यात खूपच मागे पडाल हे निश्चित. शेवटी संवाद म्हणजे काय तर दोघांमधील विचारांचे योग्य ते आदानप्रदान.

त्यासाठी भाषा हे माध्यम जपून वापरणे म्हणजे संवादकौशल्य हे कायम लक्षात ठेवलं तर यश तुमच्या हातात असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version