एके ४७ या घटक बंदुकीचा शोध लावल्यानंतर तो म्हणतो.. “माझी खूप मोठी चूक झाली.”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नोबेल पारितोषिक चालू केलं त्याचा इतिहास माहीत आहे का तुम्हाला?
अल्फ्रेड नोबेल यांनी एक दिवस पेपरमध्ये बातमी पाहिली, चुकून त्यांची निधन वार्ता छापली होती आणि खूप जणांनी त्यावर ‘बरं झालं मेला’ अशी प्रतिक्रिया देऊन साजरं केलं होतं. कारण त्यांनी सुरुंगाचा शोध लावला होता.
त्यानं खूप हानी झाली होती, तेंव्हा नोबेल यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि आपल्या प्रचंड संपत्तीचा त्यांनी ट्रस्ट केला आणि शांततेसाठी नोबेल पारितोषिक चालू केलं.
हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर बाॅम्ब टाकल्यानंतर जी अपरिमित हानी झाली होती त्यामुळे अणुबाँब तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना सुद्धा पश्चाताप झाला होता. ‘का हा अणुबाँब तयार केला ?’
थोडक्यात काय तर जगातील बहुतेक शोध मानवी कल्याणासाठी लावले जातात पण त्याचा वापर माणूस नेहमी वाईटासाठीच करतो आणि तो मानवी विनाशाला कारण ठरतो.
जी हानी होते त्यामुळं युध्द नको मज बुध्द हवा हे अखिल मानव जातीचे मागणे होते.
आज आपण अशाच एका माणसाची माहिती घेणार आहोत..मिखाईल काल्श्नीकोव्ह.. हाच तो रशियन ज्यानं AK47 बनवली. आणि त्यालाही उपरती झाली. त्यासाठी त्यानं चर्चला पत्र लिहून क्षमा मागितली होती.
कोण होता हा मिखाईल काल्श्नीकोव्ह-
मिखाईल काल्श्नीकोव्ह हा रशियातील एक नामचीन आसामी होता. त्याचा जन्म सैबेरीयामध्ये एका अतिशय गरीब घरात झाला.त्याला कवितांची फार आवड होती.
१९३० साली रशियाने सर्व शेती सरकारी करायचा जो सामुहीकरणाचा नवा संक्रांतीचा नियम केला त्यात जबरदस्तीने त्यांची शेती सरकारी जमा करुन टाकली. १९३२ साली स्टॅलिनने त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने सैबेरीयात पाठवले.
हाडं फोडणाऱ्या तिथल्या थंडीमुळे मिखाईलचे वडील जगूच शकले नाहीत. तिथला पहीलाच हिवाळा त्यांना इतका बाधला की त्यांच्या कुटुंबीयांना अनाथच करुन गेला.
वडील नसल्यामुळे मिखाईल वयाच्या तेराव्या वर्षी कामासाठी बाहेर पडला. घरापासून सहाशे मैलांवर एक ट्रॅक्टर स्टेशन होतं तिथं त्यानं कामाला सुरुवात केली. आणि मशिनरीच्या आवडीला सुरुवात झाली.
पुढं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मिखाईलनं रेड आर्मीत प्रवेश घेतला आणि जर्मन सैन्याविरुध्द लढाईत उतरला. त्याच्या इंजिनीअरिंग- मशिनरीच्या पार्श्वभूमीवर त्याला टॅन्क मेकॅनिक म्हणून काम करावं लागलं.
नंतर त्याला टॅन्क कमांडर म्हणून त्याला बढती मिळाली. या युध्दाच्या दरम्यान त्याला AK 47 बनवण्याची कल्पना सुचली.
१९४१ मध्ये जर्मनी कडून झालेल्या हल्ल्यात मिखाईल काल्श्नीकोव्ह जखमी झाला. बाॅम्बच्या तुकड्यांनी त्याला इजा झाली होती.
तो दवाखान्यात उपचार घेत असताना त्याच्या शेजारी असलेल्या एका सैनिकाने विचारलं, आपल्या सैनिकांना जी रायफल आहे ती साधी आहे पण जर्मन सैनिकांना अॉटोमेटीक कशी काय मिळाली आहे?
त्यावरुन मिखाईलने मशिनगनचं डिझाईन बनवलं. त्याला अॅव्हटोमॅट काल्श्नीकोव्ह असं संबोधलं जातं आणि हे डिझाईन मूर्त स्वरूपात यायला १९४७ साल उजाडलं. या दोन्ही गोष्टींचा ठसा म्हणून AK47 चा जन्म झाला. काहीजण ही दंतकथा आहे असंही सांगतात.
१९४३ साली सोविएत युनियनने स्वबळावर स्वयंचलित रायफल्स निर्मिती चालू केली. त्याचबरोबर काडतूस बनवायचे तंत्रज्ञान विकसित केले. आणि हे मिखाईल काल्श्नीकोव्हकडे पाठवून दिले.
–
- आपल्यासमोर ५ लाख लोक मारले गेलेत, पण आपण तिकडे बघायला तयार नाही
- बुलेट प्रूफ जॅकेट घालूनसुद्धा भारतीय जवान शत्रूची गोळी लागून हुतात्मा का होतात? जाणून घ्या
–
त्यात बरीचशी सुधारणा करून त्याचे आकारमान, वजन कमी केले,थोडी हलकी बनवली आणि ती मान्यतेसाठी क्रेमलिनला पाठवली. क्रेमलिनकडून त्याला मान्यता मिळाली पण त्याचे माॅडेल बनवून देण्याची मागणी केली.
मिखाईल काल्श्नीकोव्हने एक टीम हाताखाली घेऊन अतिशय कष्टानं हवं होतं तसं टिकाऊ आणि कमी वजनाचं माॅडेल बनवून दिलं. १९४९ साली सोविएत युनियनने त्याच्या डिझाईनला मान्यता दिली आणि हे हत्यार व्हिएतनामच्या युध्दात वापरलं.
युध्द कथा रम्य हे ऐकायला कितीही छान वाटत असलं तरी एकंदरीत युध्दात होणारी जिवीतहानी, पैशाची हानी, दूरगामी परिणाम, जनजीवनावर होणारे दुष्परिणाम हे ‘जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे’ असंच काहीसं असतं.
पिढ्या बरबाद होतात. जैविक परिणाम होतात ते वेगळेच. सैनिकांचे मृत्यू, जायबंदी होतं, बेपत्ता होणं हे इतकं हेलावून टाकणारं असतं की युद्ध का झाले असं वाटावं.
स्वतः मिखाईल काल्श्नीकोव्हने ते अनुभवलं होतं. पण सरकारी आदेशाचं पालन करणे यासाठी त्याने ती स्वयंचलित रायफल बनवली होती. पण एकंदरीत युध्दात झालेल्या जिवीतहानीमुळं हा आपला शोध त्याच्या जिव्हारी लागला.
त्याने २०१३ मध्ये मुख्य रशियन चर्चला पत्र लिहून क्षमा मागितली, या सर्व जिवीतहानीसाठी माझा शोध म्हणजे पर्यायाने मी जबाबदार आहे का? सनातनी ख्रिस्ती धर्म यांसाठी मला जबाबदार धरेल का?
–
- भारतातील सर्वात सक्षम सुरक्षा यंत्रणा वापरतात ही अद्वितीय हत्यारे
- भारतातील या ८ सर्वात भयंकर सिरीयल किलर्सच्या थरारक कथा अंगावर काटा आणतात
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.