आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
९० च्या दशकातील हिरो म्हटलं की, तीन चेहरे आपोआपच डोळ्यांसमोर येतात. शाहरूख खान, सलमान खान आणि अमीर खान. या तीन खानांनी फिल्म इंडस्ट्रीत धमाल उडवून दिली. रोमँटिक हिरो अशी तिघांची इमेज होती.
त्यांची गाणी, त्यांचे पिक्चर आजही लोकं विसरू शकत नाहीत.
तर आज आपण शाहरूख खान या हिरोच्या पहिल्या पिक्चरमध्ये झालेल्या गंमतीजमती पाहुया. शाहरूख खान खरंतर गाजला तो त्याच्या टी.व्ही सिरीयल मुळे. सर्कस सिरीयलमधील त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
पण असा कोणता असा पिक्चर होता की जो काहींनी नाकारला आणि शाहरूखने स्वीकारला आणि तो स्टार झाला, तरुणींच्या हृदयाची धडकन बनला आणि मुलांचा स्टाईल आयकॉन बनला. पाहू त्याची कहाणी.
हे ही वाचा –
===
२६ जून १९९२ साली म्हणजेच २७ वर्षांपूर्वी शाहरूख खान ची पहिली फिल्म दिवाना रिलीज झाली. खरंतर हा पिक्चर शाहरूखला देण्याआधी खूप जणांनी नाकारला होता, त्यामुळे त्याच्या यशाचं श्रेय त्यांना दिलं तरी हरकत नाही.
हिंदी पिक्चरची ‘ड्रीम गर्ल’ टीव्ही सिरीयल ‘नूपुर’ च्या दिग्दर्शनानंतर एक पिक्चर तयार करण्याचे स्वप्न पुरं करण्याच्या विचारात होती. शूटींग पण चालू केलं होतं. पण पिक्चरसाठी हिरो मिळत नव्हता.
तिने त्याच वेळी टीवी सिरियलमधील शहारूख खानला पाहिलं होतं.
त्याला लगेच बोलावलं ऑडिशन घेतली गेली आणि अखेर शाहरूख खानला या पिक्चरचा हिरो म्हणून घेतलं, पण शूटींगला मात्र खूपच विलंब होत होता. त्यामुळे त्या पिक्चरच्या आधी दुसराच पिक्चर तयार झाला.
इकडे त्याच वेळी शाहरूख खानला एका पिक्चरसाठी घेतलं गेलं. पिक्चरचं नाव होतं ‘दिवाना’.
पहिल्यांदा सनी देओलला या पिक्चरसाठी ऑफर दिली गेली, पण त्याने ती नाकारली. मग ती फिल्म राजकुमार कोहलीचा मुलगा अरमान कोहलीला दिली होती.
शूटिंगचं थोडं काम पण सुरू झालं होतं, पण त्याचवेळी अरमान आणि प्रोड्युसरमध्ये काही वादविवाद झाले आणि त्याने तो पिक्चर सोडला.
त्याच्यानंतर धर्मेंद्रने त्याच्या भावाला म्हणजेच पिक्चरच्या प्रोड्युसरला शाहरूख खानचं नाव सुचवलं आणि त्याला दिवाना पिक्चरसाठी घेतलं.ज्यात शाहरूखची एंट्री मध्यंतरानंतर आहे. त्या पिक्चरमध्ये त्याच्याबरोबर ऋषीकपूर आणि दिव्या भारती काम करत होते. त्या पिक्चरचं शूटिंग भराभर केलं गेलं.
‘कोई न कोई चाहिए’ या सुंदर गाण्यावर शाहरूखची एंट्री होती आणि हेच गाणं त्याच्या करियरची सुरुवात आहे.
त्या दोघांनी ही फिल्म नाकारली याचा फायदा शाहरूख खानला झाला.
हे ही वाचा –
===
पुढेही असे किस्से शाहरूखच्या बाबतीत झाले. अमीर खानने ‘डर’ नाकारला, सलमान खानने ‘बाजीगर’ नाकारला आणि ते दोन्ही पिक्चर शाहरूखने केले आणि त्याच पिक्चरमुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की तो सुपरस्टार झाला.
तर दिवाना रिलीज झाला आणि तो हिट झाला. ही गोष्ट शाहरूख खानला कशी कळली याची एक गंमत आहे, शाहरूख खानने त्याच्या एका इंटरव्ह्यूच्या वेळी ही गोष्ट सांगितली.
त्याने सांगितलं, पिक्चर हिट झाला ही बातमी मला राकेश रोशन ने सांगितली, पण तो स्टार झालो ही बातमी मला सलीम-जावेद या जोडीतील सलीम खान कडून कळली.
सलीम खान म्हणजे सलमान खानचे वडील. शाहरूख खान ने सांगितलं की राकेश रोशनना भेटून तो सलमान खानच्या घरासमोरून जात होता, तेव्हा सलीम खाननी त्याला आपल्या बाल्कनीतून आवाज दिला आणि सांगितलं,
‘‘तुझा पिक्चर चांगला हिट झाला. मी आत्ता न्हाव्याकडून आलो, तर तिथे कोणी शाहरूख खान सारखे केस कापा असं सांगत होतं.’’
तेव्हा शाहरूख खानला कळलं की पिक्चर तर हिट झालाच आहे,पण आपणही स्टार झालो आहोत.
किती आनंदाचा क्षण असेल ना तो? कोणीतरी आपली कॉपी करतोय म्हणजे आपण प्रसिद्ध झालो आहोत हे नक्की. लोकांना आपली स्टाईल, आपलं काम आवडलं असणार हे नक्की.
एका हिरोच्या वडिलांकडून हि गोष्ट कळणे हीच एक मोठी गोष्ट होती.
तरीही दिवानाच्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे की जी ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही ती म्हणजे शाहरूख खानने आपला पहिला रिलीज झालेले पिक्चर ‘दिवाना’ अजूनही पाहिला नाही.
तो का नाही पाहिला असं त्याला एका मुलाखतीत विचारल्यावर तो म्हणाला, की ‘ज्या पिक्चरमधील काम करताना त्याला मनापासून आनंद होत नाही तो पिक्चर तो बघत नाही.
अगदी तो पिक्चर हिट झाला तरी. कारण एवढंच आहे की, जर तो तो पिक्चर बघायला बसला तर त्याला तो पिक्चर तयार होतानाचे प्रसंग आठवतील, जे त्याच्या दृष्टीने सुखकारक नव्हते.
दिवाना पिक्चर करताना त्या प्रोसेस मध्ये त्याला फारसा आनंद झाला नाही असे शाहरूख म्हणतो. कदाचित नवीन हिरो असल्याने त्याला फारसे चांगले अनुभव आले नसावे.
शाहरुखने आपल्या त्या बोलण्यावर पांघरूण घालण्यासाठी असेही सांगितले की तो त्याचा पहिला आणि शेवटचा पिक्चर बघणार नाही.
त्या पिक्चरला तो त्याचं करियर रूपी पुस्तकाचं कव्हर मानतो आणि बाकीचे सिनेमे ही आतली कहाणी आहे.’ असो त्याचं कारण काही असो पण या पिक्चरने त्याला स्टार बनवलं आणि लोकांना एक चांगला हिरो दिला हे नक्की.
२६ जून २०१९ ला या सिनेमला २७ वर्ष पूर्ण झाली. त्याचं औचित्य साधून शाहरूख ने एक व्हिडिओ तयार केला. त्यात तो स्लोमोशनमध्ये बाईक चालवत आहे आणि बॅकग्राऊंडला ‘कोई न कोई चाहिए’ हे त्याचं पहिलं गाणं वाजत आहे.
शाहरूख खानने ‘जिरो’ पिक्चरच्या अपयशानंतर सहा महिन्यात कोणताही पिक्चर साईन केला नाही. त्यामुळे त्याने बाइकवरचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केल्यावर लोकांचं म्हणणं असं आहे की तो ‘धूम ४ ’ मध्ये काम करण्याची हिंट देत आहे.
खरंतर असं काही नाहीये. हे लोकांच्या मनातले विचार आहेत असंच आपण म्हणू जोपर्यंत तो काही अनाऊंस करत नाही.
तर अशा या ९० च्या दशकातील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणार्या शाहरूख खानच्या करिअरची २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडे त्याचे चित्रपट फारसे चालले नाहीत तरी त्याने आधी केलेलं काम अप्रतिम आहे यात शंकाच नाही.
‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मोहब्बते’, ‘दिल तो पागल है’ हे आणि असे अनेक चित्रपट आजही लोक आवडीने बघतात यातच त्याची लोकप्रियता जाणवते.
आता त्याच्या सध्याच्या इमेजला साजेसे नवीन पिक्चर त्याला मिळोत आणि नवीन, चांगलं काहीतरी बघण्याची आपल्याला संधी मिळो हीच अपेक्षा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.