Site icon InMarathi

फेसबूक, व्हाटस्अ‍ॅपच्या माध्यमातून झाली नवजात बालकांसाठी “स्तनपान दानाची” क्रांती!

breast feed featured inmarathi

india.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

नवजात शिशू म्हटलं की कोवळं बाळ नजरेसमोर येतं की जे फक्त आणि फक्त आईच्या दुधावरच पोसलं जातं. आईचं दूध हे बाळासाठी सर्वांत उत्तम असतं हे तर आपल्या सर्वाना माहितच आहे.

कमीत कमी सहा महिन्यापर्यंत तरी बाळाने स्तनपान करावं म्हणजे बाळाची तब्येत चांगली राहाते, प्रतिकारशक्ती उत्तम राहाते, हे आपण फार पूर्वीपासून ऐकत आलोय.

पण काही बाळं अशीही आहेत की ज्यांना आईचं दूध मिळत नाही, कारण एकतर आई आजारी असते किंवा तिला पुरेसं दूध नसतं,

किंवा काही प्रकारात आईचं निधन किंवा विचार करवत नाही असा प्रकार म्हणजे आई जन्मलेल्या बाळाला सोडून निघून जाते.

तर कारण काही असो, जर अशा बाळाला दूध मिळालं नाही तर त्या बाळाला त्रास होऊ शकतो, कारण म्हशीचे, गायीचे दूध पचायला जड असते.

त्यातल्या त्यात अशा प्रकारात गाईचे दूधच मुलांना दिले जाते. पण तरीही ते मुलांना पचायला त्रास होऊ शकतो.

हे ही वाचा –

===

 

Scroll.in

 

अशा एका समस्येवर उपाय म्हणून तामिळनाडूतील एका महिलेने केलेले कार्य अतिशय उत्तम आहे. तिच्या या कार्याला सलाम.

आपण फेसबूक किंवा व्हाटस्अ‍ॅपला नावं ठेवत असतो, पण त्या आधारेच या महिलेने केलेलं कार्य पाहू.

तामिळनाडूत एका महिलेने ‘स्तनपानाचे दान’ असे शिबिर चालू करून शेकडो मुलांचे जीवन वाचवले व सुखकारक केले. किती सुंदर विचार आहे ना हा?

बर्‍याच वेळा हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडू शकते की, जन्मलेल्या बाळाला आईचे दूध मिळणे अशक्य होते, त्यासाठी वरील कारणे सांगितलेलीच आहेत!

अशा वेळी दवाखाने, डॉक्टर्स अन्य पालकांना बाळाला स्तनपान देण्यास सांगतात.

अशाच स्वरूपाची एक घटना फेसबुकवर पोस्ट झाली होती. ती तामिळनाडूतील घटना होती. ती पोस्ट बेबी श्री करण नावाच्या तामिळनाडूतील एका तरुण आईने वाचली.

त्या पोस्टवर आले की, आजारी बाळासाठी फक्त आईच्याच दुधाची गरज आहे. तिने ते वाचले आणि दुसरा कसलाही विचार न करता ती दवाखान्यात पोहोचली आणि बाळाला २० मिली दूध तिने दिले.

तेव्हापासून तिने तो ध्यासच घेतला. ती स्तनपान करून आजारी बाळांना मदत करू लागली. तसेच ती स्तनपान सल्लागार म्हणून काम करू लागली.

 

india.com

 

आपण जे कार्य करतोय ते आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता तिने त्यात लोकांचा सहभाग कसा वाढेल याचाही विचार केला. त्यासाठी आपल्या मित्रपरिवाराला बरोबर घेतले.

कौशल्या जगदीश आणि रमैय्या शंकरनारायण. तामिळनाडूच्या बाल आरोग्य संस्थान (आईसीएच) च्या नवजात इंटेसिंव्ह केअर युनिटमध्ये दर रविवारी दुधाच्या दानाचे शिबिर सुरू केले!

आणि मुख्य म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद लाभला. श्री करण यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितले,

‘‘आमच्याकडे मोमी टॉक नावाचे फेसबूक पेज आहे ज्यामध्ये तामिळनाडूतील २००० माता सदस्य आहेत . पालकांचं प्रबोधन करण्यासाठी हे पेज चालू केलं होतं.

आईसीएचमध्ये बाळांसाठी स्तनपान करण्याची गरज पाहून आम्ही शिबिरे ठेवू लागलो.

बर्‍याच दूध दान करणार्‍या स्त्रिया नोकरीवाल्या असल्यामुळे आम्ही हे शिबिर रविवारी ठेवतो. जर १० अशा स्त्रिया आल्या तर आम्ही एक लीटर दूध गोळा करू शकतो.’’

Nano-technology विभागाच्या डॉ. सी. एन. कमलथनम यांनी टीनआयईला सांगितले की,

“दररोज सरासरी १५०० ते १८०० मिली दुधाची आवश्यकता असते, परंतु १२०० मिलीच दूध जमा होते. आणि प्रयत्न करूनही कधी कधी दुधाची टंचाई पडते.”

 

dairy.com

हे ही वाचा –

===

 

परंतु हे दूध देताना पण त्या महिलांसाठी काही नियम असतात. शक्यतो अशा महिलांना निवडले जाते की ज्यांनी तीन किंवा सहा महिन्यांच्या आधी बाळाला जन्म दिला आहे. तसेच त्यांची तपासणीही केली जाते.

दूध डोनेट करणार्‍या महिलांना कोणता आजार नाही ना? याची पडताळणी केली जाते. त्यांची एचआयव्ही टेस्ट केलेली आहे ना? याची खात्री केली जाते.

म्हणजेच या दुधामुळे बाळाला कोणत्याही प्रकारच्या रोगाला बळी पडावे लागणार नाही याची काळजी घेतली जाते.

स्तनपान करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी एक गट दुधाचे संकलन करण्यासाठी घरी पण जातो.

जेणे करून ज्या महिलांना जाऊन दूध देणे शक्य होत नाही त्यांच्याकडून ते घरी जाऊन आणले जाते.

 

 

एम. अशोककुमार हा असा एक स्वयंसेवक आहे त्याने टीएनआयईला सांगितले की,

‘‘तो जेव्हा जाऊ शकत नाही तेव्हा तो सोशल मिडियावर असं जाहीर करतो आणि ज्यांना वेळ असेल तो मित्र जाऊन ते संकलन करतो.

पण अजून ‘स्तन दुधाचे दान’ याबद्दल जास्त जागरूकता नाही. ती निर्माण झाली पाहिजे.’’ असं तो म्हणतो.

निशा राजगोपालन यांनी टीएनआयईला सांगितले की, ‘मी स्तन दूध दान’ कार्यक्रमाविषयी रोज वाचते. मलापण गरज असलेल्या बाळाला दूध दान करायचं आहे.

म्हणून मी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला.

 

iStockphoto

डॉक्टरांनी मला सरकारी रुग्णालयात पाठवले, पण माझे बाळ तीन महिन्याचे आहे म्हणून मी देणगीसाठी दवाखान्यात जाऊ शकत नाही. तर त्याचं संकलन करण्यासाठी मी स्वयंसेवकाची मागणी केली.’’

खरंच सलाम अशा आयांना आणि ही संकल्पना राबवणार्‍या बेबी श्री करन यांना.

मातेचं आणि बाळाचं नातं हे सगळ्यात गोड, प्रेमाचं नातं असतं. आईचा पान्हा हे आईच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

जेव्हा एखादी बाळंतीण बर्‍याच वेळाने आपल्या बाळाला भेटते तेव्हा तिच्या स्तनातून दूध आपोआप ओघळू लागते. हे असतं तिचं वात्सल्य.

त्या प्रेमाची भरती कुणी सांगून किंवा जबरदस्तीने येत नाही. तर ती निसर्गाची देणगी असते.

पण काही मुलं अशी असू शकतात त्यांना हे आईचं दूध मिळत नाही. तर अशा मुलांना जी आई आपल्या दुधाचं दान देते ती आई खरोखरच धन्य.

आपल्या बालकासाठी कोणीही हे करेल, पण दुसर्‍या बालकासाठी करणं हे खरोखरीच अनन्यसाधारण आहे.

त्यासाठी मनाची प्रगल्भता असावी लागते आणि मायेचा झरा हृदयात असावा लागतो तरच अशा कल्पना प्रत्यक्षात साकारतात.

 

ndtv.com

 

अशी कल्पना मनात आली आणि नुसती मनात येऊन न थांबता ती प्रत्यक्षात राबवण्यासाठी लोकांचं प्रबोधन करणार्‍या बेबी श्री करन यांना त्या निष्पाप अर्भकांचं खूप खूप धन्यवाद नक्कीच लाभतीलच.

पण त्याच बरोबर ज्या माता आपल्या मुलांना हे सुख देऊ शकत नाहीत.

दुधाचे दान करणार्‍या मातांकरवी आपल्या मुलांना हे दान मिळतं त्यांचे ही आशीर्वाद त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर काम करणार्‍या मातांच्या पाठीशी राहतील.

 

 

त्या सर्व मातांना कोटी कोटी प्रणाम आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version