Site icon InMarathi

३००० कोटींच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीत घुसलंय पावसाचं पाणी! ट्विटरवर सरकार होतंय भन्नाट ट्रोल!

harbhajan

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखाद्या महान व्यक्तीला आदरांजली वाहायची असेल तर, तसेच पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या व्यक्तीची कायम आठवण राहावी म्हणून त्याचा पुतळा उभारण्याची पद्धत जगात सगळीकडे आहे.

तसेच शक्य होईल तितका उंच पुतळा बनवला तर ते जगातल्या सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतं आणि त्या व्यक्तीची जगात सगळ्यांना आठवण राहते.

प्रत्येक देशात असे काही प्रसिद्ध स्मारकं किंवा पुतळे आहेत आणि ते बघायला देशोदेशीचे पर्यटक जातात. हल्ली तर काय एकापेक्षा एक उंच स्मारके बनवण्याची स्पर्धाच लागली आहे.

भारतात गेल्या वर्षीच सरदार सरोवर येथे असाच एक महाकाय पुतळा उभारण्यात आला.

 

indiatoday.inmarathi

सरदार वल्लभभाई पटेल यांचा. जगातला सर्वात मोठा पुतळा म्हणून सरदार सरोवरच्या या पुतळ्याची नोंद घेतली गेली. ही अवाढव्य आणि डोळ्यात भरणारी रचना पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत.

पण हे ठिकाण चर्चेत येण्यामागे नुकताच घडलेला प्रकार म्हणजे एक व्हायरल व्हिडीओ..

 

 

या व्हिडिओत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या गॅलरीत पावसाचे पाणी साचल्याचे दिसत आहे. याच कारणाने लोक प्रकल्प प्रशासनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करत आहेत.

ट्विटरवर या संदर्भात अनेक प्रतिक्रिया दिसून आल्या..

राकेश रामय्या यांनी ट्विट करत, सरदार सरोवर प्रकल्प प्रशासनाने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेतला आहे.

 

 

मंजू जाधव यांनीही ट्विट करत इतक्या भव्य प्रकल्पात हा निष्काळजीपणा होणे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.

 

 

इतक्या किमती आणि मौल्यवान पुतळ्याच्या ठिकाणी मूलभूत गोष्टींची वानवा असणे, एका पावसात पाणी तुंबणे आणि या व्यवस्थापानात कमतरता असल्याचे चित्तरंजन नथावत यांनी नोंदवले आहे,

 

दिव्यभास्कर या वाहिनीने तर सरदार पटेल यांच्या पुतळ्याला अतरेनकोट घातला गेल्याची बातमी दिली आहे.

 

 

 

 

 

 

अनेक नागरिकांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केल्यानंतर सरदार सरोवर प्रकल्प प्रशासनाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून प्रतिक्रिया दिली आहे.

 

जोराचा वर आणि पाऊस असल्यामुळे पुतळ्या पाहण्याच्या गॅलरीत पाणी भरले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दुरुस्ती पथक लवकरच यावर तोडगा काढेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु ही बातमी आल्यांनतर प्रकल्प व्यवस्थापन आणि सरकार यांच्यावर ताशेरे ओढण्यात आणि भन्नाट ट्रोलिंग करण्यात नागरिकांनी कुठलीही कसर ठेवली नाही असेच म्हणावे लागेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version