Site icon InMarathi

युवराजने मैदानाबाहेर जोरदार फिल्डिंग लावल्यानंतर भज्जीचं सूत जुळलं होतं!

harbhjan and yuvraj inmarathi

dhakatribune.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

यारी, दोस्ती, फ्रेंडशिप अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी मैत्री आपल्या स्वतःमधेच एक वेगळे वैशिष्ट्य आहे नाही का? त्यात जर ती बालपणापासून असेल तर मग अशा दोस्तीचे उदाहरण दिले जाते.

आपल्या आयुष्यात भावनांचे अनेक रंग असतात. त्यातील मैत्री ही भावना मात्र चिरतरूण आणि सप्तरंगी आहे.

मैत्री..नुसता शब्द उच्चारला तरी नजरेसमोर अनेक दोस्तलोकांचे चेहरे तरळून जातात. या दोस्त लोकांबरोबर जपलेले क्षण आठवतात. त्यांच्यासोबत जगलेले दिवस, घडलेले धमाल किस्से आणि केलेली भांडण देखील आठवतात.

शाळेमधली मधली मैत्री हा तर भन्नाट अनुभव असतो. या वयातली मैत्रीच बरेचदा आयुष्याच्या शेवटापर्यंत सोबत करते. अशा दोस्तीचे अनेक किस्से आपण मित्रांच्या एखाद्या फक्कड जमलेल्या मैफलीत ऐकतोच ऐकतो.

कधीकधी आपणही अशा क्षणांचे, अनुभवांचे साक्षीदार असतो. अनेकदा मैत्रीच्या नात्याने केलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यातले अविस्मरणीय आठवणींचे थांबे बनून जातात.

पहिल्या कॉपीपासून ते पहिल्या प्रेमापर्यंतच्या आपल्या आयुष्यातील साऱ्या गोष्टींचे हे मित्र सोबती, खरंतर मित्र -तत्वज्ञ -वाटाड्या असतात.

 

student independent news

 

जगातल्या इतर कोणाहीपेक्षा आपला आपल्या मित्रांवर, मैत्रीवर जास्त विश्वास असतो. हा मैत्रीतल्या विश्वासाचाच एक किस्सा हरभजन आणि युवराज यांच्या मैत्रीतला.

त्यांची दोस्तीही अशीच खास. सोबतीने अधिकच गहिरी झालेली. आणि त्या दोघांच्याही आयुष्यात अविस्मरणीय असे क्षण देऊन गेलेली. दोघही क्रिकेट विश्वातले स्टार खेळाडू.

मैदानावर आणि मैदानाबाहेर आपली मैत्री जपणारे. जेवढी त्यांच्या मैदानावरच्या खेळाची चर्चा व्हायची तेवढेच मैदानाबाहेर त्यांच्या दोघांच्या मैत्रीचे किस्से रंगायचे.

 

 

दोघांचेही क्रिकेटमधले पदार्पण आगेमागेच आणि करीयरची सुरवातही. एक बिशनसिंग बेदी स्टाईलचा स्पिनर, भल्याभल्यांची गुगली उडवणारा पण तितकाच शांत तर दुसरा डावखुरा आक्रमक फलंदाज आणि बॉलर.

दोघेही पंजाबचे सुपुत्र. होय अगदी बरोबर. ते दोघे आहेत हरभजनसिंग आणि युवराज सिंग. आपल्या करीयरच्या सुरवातीपासूनच सर्वांच्या गळ्यातला ताईत बनलेले मनस्वी खेळाडू.

किस्सा यांच्या दोस्तीचाच आहे. ज्यात एकाची प्रेमकहाणी आणि दुसऱ्याची मैत्री यांचे एकत्रित उदाहरण दिले जाते.

 

t2online.com

 

किस्सा घडला असा की इंग्लंडमधे काउंटी क्रिकेट खेळत असताना हरभजनने एक व्हिडिओ साँग बघितले. त्यातील मॉडेल त्याला खूप आवडली. त्यावेळी हरभजनची चित्रपट क्षेत्रातील कोणाशीच फारशी ओळख नव्हती. इथे त्याच्या मदतीला आला तो युवराज सिंग.

‘वो अजनबी’ हे गाणे पाहिल्यावर हरभजनची अवस्था love at first sight अशी झाली होती. आपला मित्र युवी यांच्याकडे त्याने त्या मॉडेल ची माहिती काढण्याचा हट्टच धरला.” यार कौन है ये? मुझे इससे मिलादो.”

तेव्हा युवीने आपली बॉलिवूड मधली मैत्रीण किम शर्मा हिला कॉन्टॅक्ट केले व त्या मॉडेलची माहिती देण्याची रीक्वेस्ट केली.

किम ने दिलेल्या माहितीनुसार ती मॉडेल ही गीत बसरा असून बॉलिवूड मध्ये नवीनच आलेली होती. त्यानंतर युवीने गीतचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवून तो हरभजनला दिला.

 

newsbugs.com

 

साऊथ आफ्रिकेमध्ये T-20 Cricket World Cup Tournament चालू असताना हरभजनने गीत ला “मी हरभजनसिंग. इंडियन क्रिकेट टीम चा मेंबर असून आपण कॉफी साठी भेटायचे का?” असा मेसेज केला.

पण गीतकडून काहीच रिप्लाय आला नाही.

T-20 world cup जिंकून भारतात परत आल्यावर एक दिवस गीतचा “well done on winning T-20 world cup. we’re proud of you and all the best. keep making all Indians proud.” असा मेसेज आल्यावर हरभजनला आशेचा किरण दिसला.

 

Firstpostcom

 

त्याने पुन्हा आपला मित्र युवी याला रीक्वेस्ट केली. यावेळी ही रीक्वेस्ट गीत ला भेटवण्यासाठी होती. युवराजने पुन्हा एकदा आपले सोर्स वापरून त्यांची भेट घडवण्याचे प्रयत्न सुरू केले.

याच दरम्यान भारतात IPL ची पहिलीच स्पर्धा सुरू झाली होती. गीत ने यावेळी स्वतः हरभजनला मेसेज करून IPL च्या दोन तिकिटांची मागणी केली. याच स्पर्धेदरम्यान पहिल्यांदा ते दोघे एका कॉफीशॉप मध्ये भेटले.

 

 

याही वेळी त्यांची भेट घडवून आणण्यात युवीचा मोठा वाटा होता. पुढे गीत व हरभजन यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघांच्याही घरच्यांना कन्व्हिंन्स करण्यासाठीही युवराजने मदत केली.

मात्र सुरवातीला गीत या रीलेशनशीपबद्दल थोडी साशंक होती.

“आपल्यात आधी चांगली मैत्री होऊ दे मग पुढचा विचार करू” असे तिने हरभजनला सुचवले. त्यानंतर पुढील दहा महिने ते एकमेकांना भेटत राहिले.

याचदरम्यान हरभजन हा एक चांगला व्यक्ती आहे असा गीत ला अनुभव येत गेला. त्यानंतर तिने हरभजनच्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली.

त्यांच्या लव्हस्टोरी बाबत गीतला छेडले असता, “आजकाल चांगले लोक भेटणे दुर्मिळ असताना योगायोगाने हरभजन माझ्या आयुष्यात आला होता जो की एक प्रेमळ आणि सभ्य व्यक्ती होता हे मला समजले आणि मी याला होकार देण्याचे ठरवले” असे गीतने सांगितले.

त्यानंतर मात्र दोघांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रमंडळींच्या संमतीने दोघांनीही आपल्या वैवाहिक जीवनाला सुरवात करायची ठरवली व ते विवाहबंधनात अडकले.

 

Deccan Chronicle

 

Love-stories are built in heaven. असे म्हटले जात असले तरी त्या workout करण्यासाठी हे मित्र रुपातले ऐंजल्स मदत करतात हे ही तितकेच खरे.

हरभजनच्या लव्हस्टोरी मध्ये ऐंजलचे काम केले ते युवराज सिंग याने. असे म्हणतात की मैत्रीला कोणतीच परिसीमा नसते. कोणतेच बंधन नसते. मैत्री धर्म, जात, वंश, वय, विचार या साऱ्यांच्या पलीकडे असते.

युवराज आणि हरभजन यांचा मैत्रीचा हा किस्सा एका boundless मैत्रीचे आदर्श उदाहरण आहे. मैत्री कशी असावी तसेच ती कशी जपावी हे युवराजने आपल्या मित्राचे मन ओळखून केलेल्या कृतीतून दिसून येते.

 

missmalini

 

अशीच असते मैत्री. एकमेकांच्या भावनांचा आदर करणारी. विश्वास जपणारी. नवनवे आयाम तयार करणारी. दिवसेंदिवस लोणच्याप्रमाणे मुरून गाढ होत जाणारी.

फक्त खाणेपिणे गप्पा भटकंती यासाठी एकत्र असेल तरच मैत्री असते आणि इतरवेळी नसते ती मैत्री नाही होत. आपल्याकडे मैत्रीची अशी अनेक उदाहरणे आहेत जी असे आदर्श आपल्यासमोर ठेवतात.

तुमची आर्थिक सामाजिक स्थिती काय आहे, तुम्ही कोण आहात याहीपेक्षा तुमचे मित्र कोण आहेत यावर तुमचे समाजातले स्थान, दर्जा ठरत असतो. मित्र तो ही जीवाला जीव देणारा असेल तर ती मोठी मिळकत मानली जाते. अशी मैत्री चिरकाल टिकते.

दिवसेंदिवस बहरत जाते. अशा मैत्रीची अनेक उदाहरणे, कथा, किस्से आपण वाचतो, ऐकतो, बघतो तेव्हा या मैत्रीरूपी देणगीचा हेवा वाटतो.

अमिताभ व राजीव गांधी किंवा सचिन तेंडूलकर आणि शेन वॉर्न तसेच ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके अशी अनेक मैत्रीची उदाहरणे आणि त्यांचे किस्से प्रसिद्ध आहेत..

 

NDTV india

 

तेव्हा अपेक्षाविरहीत आणि निखळ मैत्री दुर्मिळ होत चालली असताना हरभजन व युवराज यांची मैत्री निश्चीतच दुर्मिळ आहे. त्यांच्यातील हा मैत्रीचा धागा अतूट राहिला आहे.

Hats off to their friendship.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version