Site icon InMarathi

पुण्यात, तुम्ही कधीही बघितलं नसेल अश्या सौंदर्याचा उत्सव रंगणार आहे – तयार आहात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपण नेहमी म्हणतो की सगळे सुंदर आहेत. परंतु खरंतर आपण आपल्यातले दोष, कमतरता, नेगेटिव्ह पॉईंट कधीच स्वीकारत नाही. आपण नेहमीच गोरागोमटा रंग, बारीक बांधा, लांब केस आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो.

आपण प्लास्टिक सर्जरी करतो. वेगवेगळ्या ट्रेंटमेन्ट करतो फक्त सुंदर दिसण्यासाठी परंतु आपण विसरतोय की सौंदर्यला कोणत्याही मर्यादा नसतात. सौंदर्याची व्याख्या नसते.

सौंदर्य सगळीकडे आहे आणि ते अपरिपूर्णतेमध्ये देखील आहे.

 

 

आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला सौंदर्याच्या मापदंडात बसायचं असतं. सौंदर्याला मापदंड नाहीत आणि व्याख्याही नाही. हे मापदंड आणि व्याख्या या मानवनिर्मित आहेत.

हे गैरसमज सौंदर्याबद्दलचे मुख्यतः फसव्या जाहिराती, बातम्या, समाजमाध्यमे, मॉडालिंग आणि फॅशन इंडस्ट्रिज यामुळे होत आहेत.

आपण रोज ख्यातनाम (famous) कलाकार मॉडेल बघतो. ज्यांमध्ये काहीही दोष आणि कमतरता नसतात. आपण विसरतो की कॅमेऱ्यासमोरचं आणि कॅमेऱ्यामागील जग आणि सत्य वेगळ असतं.

काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर पुढे आली आणि तिने जगाला सांगितले की सगळ्यामध्ये कमतरता आणि दोष आहेत.

 

 

तिने सांगितले तिच्या मेकअपसाठी ती रोज तीन तास वेळ देते. त्याचप्रमाणे आपण रोज फेयरनेस क्रीमच्या जाहिराती बघतो.

ज्यात ते सांगतात की या क्रीमच्या वापरामुळे तुमचा रंग / वर्ण हा गोरागोमटा होईल पण खरंतर वर्ण कधीच बदलत नाही आणि आपल्याला आपल्या रंगाबद्दल किंवा दिसण्याबद्दल आत्मविश्वास बाळगायला हवा.

सुप्रसिद्ध फेयरनेस कंपनीने आपली जाहिरात करण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑफर साई पल्लवी या अभिनेत्री समोर ठेवली होती.

साई पल्लवीने ही ऑफर नाकारली फक्त एवढेच नव्हे तर ती कधीच मेकअप करत नाही. ती म्हणते,

“मी सौंदर्य प्रसाधनांना महत्व देत नाही. तुमचा स्वतःवर आणि तुमच्या वर्णावर आत्मविश्वास असावा.”

फॅशन इंडस्ट्रीजमध्ये अशा अनेक मॉडेल आहेत, ज्यांनी आपल्या दोषालाच आपली शक्ती बनवली आहे.

 

त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे Chantelle Brown! ती म्हणते

“No matter who you are, you have quirks. I highlight the fact that being different is okay, which speaks to everyone”

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपले दोष स्वीकारले आहेत आणि त्याला आपली शक्ती बनवलेली आहे. आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे आणि सौंदर्याच्या ठरवलेल्या मापदंडांना तोडून टाकलं पाहिजे.

आज फॅशन इंडस्ट्रीजमध्ये जाऊ इच्छिणारी खूप मोठी तरुण पिढी आहे. काही असेही लोक आहेत ज्यांच्यात प्रचंड टॅलेंट आहे, परंतु काही कमतरतेमुळे ते मागे राहतात.

उदाहरणार्थ, मिस इंडियसाठी फक्त त्याच मुली प्रवेश प्रक्रियेत पात्र आहेत. ज्यांची उंची किमान ५ फुट ५ इंच आहे. परंतु बऱ्याच मुली अश्या आहेत ज्यांची उंची कमी आहे. पण त्या इतर मापदंडामध्ये इतर लोकांपेक्षा सरस आहेत.

 

youtube.com

आम्हाला वाटतं आज सौंदर्याची व्याख्या एकाच एक नाही हे सांगण्यासाठी फॅशन इंडस्ट्री किंवा मॉडेलिंग ही सगळ्यात अचूक जागा ठरू शकते.

आम्ही Breaking Stereotypes multivercity pvt. lmt. घेवून येत आहोत “Mr / Miss /Mrs Unconventional 2019”!

ज्यात आम्ही तुम्हाला संधी देतोय हे सांगायची, की प्रयेक जण सुंदर आहे. हे सांगण्याची की अपरिपूर्णतेत सौंदर्य आहे. तुमच्यात कमतरता असेल तरीही तुम्ही सुंदर आहात.

ही फक्त सौंदर्याची स्पर्धा नसून हा सौंदर्याचा उत्सव आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मापदंड नाहीत. अगदी Plus Size मॉडेल पासून लहान उंची असणारी व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्ती यात सहभागी होऊ शकते.

 

 

weunconventional.com या वेबसाइट ला भेट द्या किंवा ७२६३०३६३१२ या क्रमांकावर संपर्क करा.

ही स्पर्धा सौंदर्याची परिभाषा बदलण्यासाठी आहे. या सामाजिक कारणावर काम करण्याची कोणाला इच्छा असेल अथवा मदत स्पॉन्सरशिप द्यायची इच्छा असले तर त्यांनी वरील नंबरवर संपर्क करावा ही विनंती.
===

संपादकीय भूमिका :

सौंदर्याची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी भारतीय समाजमनात सुंदरतेबद्दल काही ठोकताळे आहेत. रंग, शरीराची ठेवण, बांधा इत्यादी घटकांवर ती आधारित आहे. वैयक्तिक भावना किंवा पूर्वग्रह यावर सौंदर्याविषयक मत ठरते.

जी संकल्पना एका विशिष्ट निकषात बसवता येत नाही तिचे झालेले बंदिस्तीकरण थांबवणे आणि सुंदरतेच्या कक्षेत ‘गोरी त्वचा, शरीराची विशिष्ट ठेवण’ नसलेल्या लोकांनाही सामावून घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे.

ती ओळखून त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे ही इनमराठी टीमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे डिजिटल पार्टनर म्हणून इनमराठी सहभागी होत आहे. मराठी वाचकांचाही या आणि अशा अनेक उपक्रमांना प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version