भारतात चिक्कार पैसे कमावणाऱ्या ७ बॉलिवूड अभिनेत्यांचे नागरिकत्व “भारतीय” नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांबद्दल जाणून घ्यायला आपण नेहमीच उत्सुक असतो. चित्रपट हा भारतीय प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने अभिनेत्याची फक्त पडद्यावरची नव्हे तर वैयक्तिक जीवनातली सत्ये काय आहेत हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात.
पण त्यांच्याबाबतीतली काही सत्ये अशी असतात जी सामान्य भारतीय नागरिकांसाठी अप्रियही असू शकतात.
भारतामधील करोडो मानवार अधिराज्य करणारे बॉलीवूडमधील कलाकारांबद्दल ही माहिती तुम्हाला बुचकळ्यात पाडू शकते.
तुम्हला कदाचित हे वाचून धक्का बसेल, की बॉलीवूड कलाकार भारतीय नाहीत.
१) कैटरिना कैफ
बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक कैटरिना ही एक आहे. कैटरिनाचा जन्म हा हाँगकाँग मध्ये झाला असून तिच्याकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे.
कैटरिनाची आई इंग्लंड मधील आहे तर वडील भारतीय आहेत. मुंबईमध्ये स्थापित होण्याच्या पूर्वी कैटरीना लंडन मध्ये राहत होती.
तिच्या भारत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. भारत ने आता पर्यंत २०० करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे.
२) इम्रान खान
“जाने तू या जाने ना” या चित्रपटामुळे प्रकाशझोतात अभिनेता इम्रान खान आला. इम्रान सुपरस्टार अमीर खानचा भाचा आहे.
त्याच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तो भारतामध्ये स्थायिक झाला. चित्रपट सृष्टीतून सध्या तो गायब झाला आहे.
३) अक्षय कुमार
अक्षय कुमार बॉलीवूड मधील सुपरस्टार आहे. अक्षयचा जन्म हा पंजाबमध्ये झाला असून तो दिल्लीमध्ये वाढला आहे.
तो नेहमीच आपल्या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेलच.
अक्षयकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यामुळे तो भारतामध्ये मतदान करू शकत नाही.
३) एमी जॅक्सन
एमी जॅक्सन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्याकडे इंग्लंडच नागरिकत्व आहे. तिने तिचे करियरचे सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.
तिने फक्त हिंदीमध्येच नव्हे तर तामिळ आणि तेलगू भाषीक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे.
४) जॅकलीन फ़र्नांडीझ
जॅकलीन फ़र्नांडीझने २००६ साली मिस श्रीलंका किताब मिळवला आहे. जॅकलीनकडे श्रीलंकेच नागरिकत्व आहे.
तिला अजूनही भारतीय नागरिकत्व मिळालं नाही. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत.
जॅकलीन ड्राईव्ह हा तिच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.
५) कल्की कोचलीन
कल्की कोचलीन बॉलीवूडमधील आकर्षक अभिनेत्रीपैकी एक आहे. कल्कीला भारतीय नागरिकत्व मिळालं नाही. तिचा जन्म गोवा येथे झाला होता.
तिच्याकडे फ्रेंच नागरिकत्व आहे. कल्की ये जवानी है दिवाणी यासारख्या अनेक चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे. अमॅझॉन प्राईमच्या मेड इन हेवन या वेब सरीजमध्ये सुद्धा दिसली आहे.
६)आलीय भट
बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट यांची ती मुलगी आहे. आलियाचे वडील हे भारतीय आहेत तर आई ही इंग्लंड मधील आहे.
आलियाने “student of the year” या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. सध्याच्या सर्वोत्तम अभिनेत्रीपैकी एक आहे.
आलियाने आत्तापर्यंत अनेक एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आलियाचा कलंक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. आलियाकडे इंग्लंडचे नागरिकत्व आहे.
त्यामुळे अजूनही तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. ती म्हणते तिने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे.
७) दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणकडे डेन्मार्कचे नागरिकत्व आहे. असे आरोप दीपिकावर सतत झाले. दीपिकाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करून त्याचा फोटो इंस्टाग्राम वरती पोस्ट केला.
आपण भारतीय नागरिक आहोत हे लोकांना दाखवून दिलं.
असे हे बॉलीवूड मधील सुपरस्टार भारतामध्ये जरी राहत असले आणि काम करत असले तरी भारतीय नागरिक नाहीत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.