आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणतीही सांघिक गोष्ट म्हटली की त्यात सर्वांचंच योगदान अतिशय महत्त्वाचं असतं. कुणा एकाच्या प्रयत्नावर किंवा एकट्याच्या हिंमतीवर सांघिक यश अवलंबून नसतं, तर सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांना त्यात महत्त्व असतं.
त्यापैकीच एक सांघिक गोष्ट म्हणजे मैदानी खेळ. यात कामगिरी करणार्या लोकांवर खूपच मोठी जबाबदारी असते कारण त्यांच्या खेळावर पूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून असतं.
सर्व देशांतील लोक त्यांच्या खेळाकडे लक्ष लावून बसलेले असतात. अशातच जर खेळाडूंपैकी कोणावर काही दुर्घटना ओढवली तर मात्र कठीण अवस्था होते.
पण काही असेही शूरवीर आहेत की ज्यांनी अशा परिस्थितीतही लढत दिली. ते रडत बसले नाहीत.
क्रिकेटच्या मैदानात वडिलांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कपचं मैदान गाजवलं होतं. वडिलांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर विराट कोहलीने रणजी सामन्यात लक्षवेधी खेळी केली होती.
कधी कधी नाटकातील कलाकारांच्या बाबतीत पण अशी घटना घडते की त्यांच्या अगदी जवळची व्यक्तीचे निधन होते, पण इकडे खेळ सुरू असतो.
मग कलाकार आपलं दु:ख मागे सारून प्रेक्षकांच्यात मिसळून जातात.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
सांघिक गोष्टीत एखादी व्यक्ती जर काही कारणाने अनुपस्थितीत राहिली तर त्याचा संपूर्ण टीमवर परिणाम होतो व टीमचं लक्ष विचलित होऊ शकतं किंवा पूर्ण टीमच ढासळू शकते.
अगदी अशाच प्रकारची घटना हल्लीच जपानमध्ये घडली. भारताची स्टार हॉकीपटू लालरेमसियामी हिच्याबाबतीत.
लालरेमसियामी ही भारतीय महिला संघातील हॉकीपटू आहे. तिचा जन्म ३० मार्च २००० साली झाला. मिझोराम कोलासिब जिल्ह्यामधील ती पहिली रौप्य पदक मिळवणारी खेळाडू आहे. तेथील भाषा मिझो ही आहे.
जेव्हा ती या हॉकी महिला संघात सामील झाली होती, तेव्हा तिला इंग्रजी किंवा हिंदी भाषा बोलता येत नव्हती.
तिने आपल्या सहकार्यांच्या मदतीने आणि पुस्तकांद्वारे या भाषा शिकून घेतल्या. जेव्हा तिला भाषा येत नव्हती तेव्हा ती खुणांद्वारे आपल्या सहकार्यांशी संवाद साधत होती.
लहान वयातील तिची धाडसी वृत्ती यातून दिसून येतेच.
रविवारी २३ जूनला हिरोशिमाच्या मैदानात झालेल्या एचएफआय महिला हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी मॅच जपानला ३-१ असा स्कोर करत हरवले.
भारतीय संघाला विजयी करण्यात लालरेमसियामीची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
सेमीफाइनलमध्ये चिनला पराभूत केल्यानंतर एफएचआय ऑलिंपिक क्वालिफायर्ससाठी पात्र ठरले होते, पण या महिला मॅच खेळण्या आधीच जिंकल्या होत्या. याचं कारण ऐकाल तर थक्क होऊन जाल.
२१ जूनला एक अशी बातमी आली की त्यामुळे खरं तर मिझोरामची ही १९ वर्षीय कन्या लालरेमसियामी संघ सोडून घरी पळत गेली असती तरी कोणी काही म्हटलं नसतं.
शुक्रवारी लालरेमसियामीच्या वडिलांचे म्हणजेच लोथानसंगा झोटे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं.
–
- फक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे!
- ३ बालकांना वाचवण्यासाठी, अवघ्या २२व्या वर्षी प्राणांची आहुति देणारी शूर कन्या!
–
टीमचे मुख्य प्रशिक्षक स्झेरर्ड मारिजने तिला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी परतण्याची संधी दिली होती. ती काय करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं असताना तिने निर्णय दिला की, ती संघाबरोबर राहू इच्छिते.
उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात खेळून ती वडिलांना श्रद्धांजली देऊ इच्छिते असे तिने प्रशिक्षकांना सांगितलं होतं.
इकडे वडिलांची अंत्ययात्रा निघत होती आणि तिकडे ही कन्या आपल्या टीमसाठी खेळत होती. मनात किती काहूर माजले असतील? केवढासा लहानगा जीव, पण मन मात्र आभाळाएवढं केलं तिनं.
लहान वयात एवढ्या मोठ्या आपल्या देशाचा विचार करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. केवढं धाडस लागतं या गोष्टीला?
हिला वीरबालाच म्हटलं पाहिजे. जी रडत न बसता देशासाठी लढत म्हणजेच खेळत राहिली. सामना संपल्यानंतर प्रत्येक खेळाडूने तिचे सांत्वन केले आणि तिच्या या अभूतपूर्ण निर्णयाचं स्वागतही केलं.
ही खरोखरीच खूप मोठी गोष्ट होती की इतक्या लहान वयात तिच्यावर खूप मोठं संकट आलं होतं, पण तिने मोठ्या ताकदीने मनावर विजय मिळवला होता.
जरी तिने खेळात खूप स्कोर केला नाही, तरी तिने तिच्या संघासाठी खूप काही केलं होतं. अशा खेळाडूबद्दल भारताला अभिमान वाटला पाहिजे.
तर अशी ही लालरेमसियामी जी भारताच्या महिलांचं प्रतिनिधित्व करते की त्या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.
लालरेमसियामीच्या या महिला हॉकीसंघाने २०१६ साली रियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली होती. हे यश त्यांना जवळजवळ ३६ वर्षांच्या अंतराने मिळाले होते.
याच संघाने आशिया कप २०१७ मध्ये रौप्यपदक आणि २०१८ मध्ये एशियन गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते.
–
- भारतीय फुटबॉल विश्वातला एक दुर्लक्षित तारा – जो चायनीज वॉल ह्या नावाने ओळखला जायचा!
- भारताला गवसलेली नवी “वेटलिफ्टिंग विनर” : मीराबाई चानू
–
जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी ७ व्या क्रमांकावर स्पेनचा पराभव केला, तर दौर्यादरम्यान ५-२ मार्जीन नोंदवून आयर्लंडसारख्या अन्य लक्षणीय संघांना पराभूत केले.
मॅच संपल्यानंतर जेव्हा ती आपल्या घरी गेली तेव्हा मात्र ती आपल्या भावना थोपवू शकली नाही. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिने सांगितले की,
‘‘सामन्याच्या थोडं आधी मला अशी बातमी मिळाली की, माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. तरीही आम्ही खेळलो आणि जिंकलो. मला विश्वास वाटतो की, माझे वडील जिथे असतील तिथे ते माझ्याबद्दल अभिमान बाळगतील.’’
धन्य ती कन्या आणि धन्य तिचे मातापिता ज्यांनी अशा पराक्रमी मुलीला जन्म दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा या भारतीय हॉकी महिला संघाची विशेष दखल घेतली आणि संघाच्या विलक्षण विजयाची देखील प्रशंसा केली. भारतीय संघाच्या अशी विशेष कामगिरी करणार्या संघाला पुढील त्यांच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा.
लालरेमसियामीच्या पुढील वाटचालीसाठी तिलाही शुभेच्छा.
वडिलांचं छत्रं हरवणे ही फार दु:खद घटना तिच्या बाबतीत घडली आहे, पण त्यातून ती लवकरच सावरेल आणि पुढील स्पर्धांमध्ये यश मिळवून आपल्या वडिलांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करेल, आणि त्याच स्वरूपात त्यांना श्रद्धांजली देईल यात शंकाच नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.