' आपल्या आवडत्या सॉफ्ट अँड क्यूट “टेडी बेअर”च्या जन्माची कथा – InMarathi

आपल्या आवडत्या सॉफ्ट अँड क्यूट “टेडी बेअर”च्या जन्माची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या प्रेयसीचा किंवा प्रियकराचा वाढदिवस असला की त्याला भेट म्हणून सर्वाधिक काय दिलं जातं? तर टेडी बेअर!

आपल्याकडे या गुबगुबीत बाहुल्याला प्रेमाचं प्रतिक समजलं जातं ही वस्तुस्थिती आहे.

पण असंच काही नाही की टेडी बेअर केवळ प्रेमात पडलेलेचं एकमेकांना देतात, तर लहान मुलांना देखील टेडी बेअर तितकाच आवडतो. त्यामुळे ते देखील तो हक्काने मागून घेतात.

 

teddy im 2

 

लहान असताना एकदा का टेडी बेअरवर जीव जडला की मरेपर्यंत त्याचा मोह सुटणे कठीण! त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हा टेडी बेअर लाडका.

त्याचं मऊ आणि लोभसवाणं स्वरूप मनाला इतकं भुरळ घालतं की त्याला अगदी मिठी मारूनच रहावेसे वाटते.

 

teddy im 1

 

बरं तर तुम्ही कधी विचार केलाय का की हा टेडी बेअर नेमका आला कुठून? तो बनवला कसा गेला? ही कोणाची कल्पना होती? तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर तुम्ही ही टेडी बेअरच्या जन्माची गोष्ट नक्कीच वाचली पाहिजे.

अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट एकदा शिकारीला गेले होते. त्यांच्या सेवकांनी जंगलात एक अस्वल पकडलं, ते झाडाला बांधलं, आणि राष्ट्राध्यक्षांना त्या अस्वलाला गोळी मारण्यासाठी बोलावण्यात आलं.

रुजवेल्ट आले, पण बांधलेलं अस्वल त्यांनी काही मारलं नाही. त्या अस्वलाला नंतर सोडून देण्यात आलं.

 

Theodore-Roosevelt_-marathipizza

 

या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली आणि १९०२ साली मॉरिस मिचटम यांनी पहिल्यांदा एक कापडी अस्वल तयार केलं. त्या अस्वलाला त्यांनी नाव दिलं- Teddy’s Bear. या नावाचं कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्षांचं टोपण नाव टेडी होतं.

 

richard_steiff-teddy bear-marathipizza

 

नंतर मॉरिस मिचटम यांनी स्वतः राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून त्यांचं नाव वापरण्याची परवानगी मागितली आणि त्यांना ती मिळाली सुद्धा ! आणि तेव्हापासून टेडी बेअर बाजारात आले.

१९०३ साली पहिला टेडी विक्रीसाठी ठेवण्यात आला. पुढे टेडी बेअरची क्रेझ वाढली आणि जगात सगळीकडेच टेडी बेअरची विक्रमी विक्री सुरु झाली जी आजतागायत सुरु आहे.

काळानुसार त्याच्या आकारापासून रंगसंगतीपर्यंत अनेक बदल होत गेले.

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत… हा टेडी बेअर प्रत्येकाच्याच मनातील ताईत आहे. अगदी चित्रपटांमध्येही त्याचा वारंवार सहभाग दिसतो.

मुलींमध्ये त्याची लोकप्रियता अधिक असली तरी मुलांनाही तो भुरळ घालतो हे यापुर्वी अनेकदा सिद्ध झालंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?