भारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
तुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय? ज्यामध्ये अनिल कपूरला एका दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून वावरायची संधी मिळते. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार मिळतात आणि त्या एका दिवसात तो आपल्याने जेवढं शक्य आहे तेवढं करून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतो. नायक चित्रपट पाहिल्यावर असा मुख्यमंत्री सर्व राज्यांना मिळाला तर आपला देश अगदी सहज प्रगतीचे शिखर गाठू शकतो असा विचार आपल्या मनात सहज तरळून जातो. पण शेवटी चित्रपट तो चित्रपट! अशी गोष्ट प्रत्यक्षात घडणे तसं मुश्कील! असा जर तुमचा देखील विचार असेल तर तुम्ही चुकताय, कारण अहो कॅनडा मध्ये अशी घटना घडली आहे आणि गंमतीची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला मुख्यमंत्री वगैरे नाही तर एका दिवसासाठी थेट पंतप्रधानपद बहाल करण्यात आले. अजून अभिमानस्पद बाब म्हणजे हा व्यक्ती भारतीय वंशाचा होता.
कॅनडास्थित भारतीय वंशाचा १९ वर्षीय तरुण प्रभजोत लखनपाल याला एका दिवसासाठी कॅनडा देशाचे पंतप्रधानपाद भूषवण्याचा मान मिळाला. कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची त्याने एका दिवसासाठी जागा घेतली.
प्रभजोत हा कॅन्सरने ग्रस्त होता. जवळपास अडीच वर्षांपासून तो हा त्रास सहन करत होता. लहानपणापासूनच कॅनडाचा पंतप्रधान होण्याची त्याची इच्छा होती, परंतु कॅन्सरच्या व्याधीमुळे आपली ही इच्छा अपुरीचं राहणार असे त्याने गृहीत धरले. परंतु जगप्रसिद्ध ‘मेक अ विश’ संस्थेला त्याची ही इच्छा माहित होती. त्यांनी स्वत: प्रयत्न करून त्याची ही इच्छा पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना यासंबंधी विनंती केली. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी देखील मोठ्या मनाने या विनंतीला मान दिला आणि प्रभजोतची इच्छा पूर्ण केली.
कॅनडाचा एक दिवसाचा पंतप्रधान झाल्यानंतर प्रभजोतने पंतप्रधानांप्रामाणे प्रेसिडेंन्शियल हाऊसमध्ये मुक्काम केला. पंतप्रधान म्हणून रीतीप्रमाणे कॅनडाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन्सटन यांनी प्रभजोतचं स्वागत केलं. देशाच्या विकासासंबंधी प्रभजोतचे विचार पार्लमेंटने ऐकून घेतले. देशाच्या सुधारणेसाठी कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणता येतील यावर देखील त्याला आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली.
एका दिवसासाठी कॅनडाचा पंतप्रधान बनलेल्या प्रभजोतचा आनंद या सुखद धक्क्यामुळे गगनात मावत नव्हता. त्याने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की,
ओटावाच्या पार्लमेंट हिलवर जाणं हा माझ्या आयुष्यातला सुवर्णक्षण होता. इतर कोणत्याही देशामध्ये ही गोष्ट इतक्या सहज होणे शक्य नाही. हे कुठल्या इतर देशात शक्य नाही. मला कॅनडाचा पंतप्रधान बनता येईल हे माझे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते.
प्रभजोतच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण पहा ह्या व्हिडियोच्या माध्यमातून
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi