Site icon InMarathi

वास्को द गामा याचे ऐतिहासिक जहाज तब्बल ५०० वर्षांनी सापडले…!!

ship of vasco da gama inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वास्को-द-गामा म्हणजे जगाच्या सफारीसाठी निघालेला एक महत्त्वाकांक्षी दर्यावदी! भारताच्या भूमीवर पाउल ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणून त्याची ओळख आहे. जगाच्या सफरीसाठी निघालेल्या या खलाश्याचा संपूर्ण प्रवास अगदी रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. अश्या या बिनधास्त दर्यावर्दीचं ५०० वर्षांपूर्वी एक जहाज समुद्रात बुडालं होतं आणि आता त्या जहाजाचा शोध लागला आहे.

 

१५०३ साली दुसऱ्या भारत दौऱ्यामध्ये वास्को द गामाच्या काकांनी वास्को द गामा जवळील एक जहाज सफारीसाठी बाहेर काढलं. पुढे मी महिन्यामध्ये हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे या जहाजाला जलसमाधी मिळाली होती.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – रोमन-अस्त, इस्लामी साम्राज्याचा उदय, वास्को-द-गामाचा भारतात प्रवेश, केवळ एका युद्धामुळे!

===

या दुर्घटनेमध्ये विसेन्ट सॉडरस या जहाजाच्या कमांडरसह जहाजावरील सर्वांचाच बुडून मृत्यू झाला होता.

सुमारे ५०० वर्षांपूर्वी बुडालेल्या याच जहाजाचे अवशेष अखेर ओमानच्या समुद्रामध्ये सापडले असून ते वास्को द गामाचंच जहाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

२०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली.

वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत.

 

विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. १४९९ मध्ये वास्को द गामाच्या च्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे.

 

या जहाजाच्या शोधामुळे एक ऐतिहासिक ठेवा जगाच्या हाती लागला. या जहाजाच्या संशोधनातून इतिहासातील काही नवीन रहस्ये उलगडतील आणि नवीन गोष्टी जगासमोर येतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version