आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सगळ्या प्रवासात सुखाचा प्रवास कोणता? तर रेल्वेचा!!! दूरचा प्रवासही कमी कटकटीचा ठरतो. ऐसपैस बसून जाता येतं. मुलं बाळं निवांतपणे बसू शकतात. काही वेळा इतर प्रवासाच्या साधनांपेक्षा रेल्वे सावकाश चालत असली तरी रेल्वे सुखकर आहे.
अरुंद सीट्स, कमी जागा हे असलं काही रेल्वेत नसतं. निवांतपणे बसून जाता येतं. पण आजकाल तिथंही गर्दीचं आक्रमण झालं आहे.
खूप लोक प्रवास करताना रेल्वेला प्राधान्य देतात त्यामुळे दोन दोन महिने आधी बुकिंग केलं तरी रिझर्व्हेशन मिळताना अनेक वेळा अडचणी येतात.
खासकरुन सणावाराचे दिवस जसं दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्टी, छटपूजा इ. प्रसंगी.. सुट्टीच्या दिवसात तर सगळ्या गाड्या दुथडी भरुन वाहत असतात.
आताशी पर्यटन हा प्रकार सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आला असल्याने कुटुंबवत्सल माणसं सर्रास ट्रीपला जातात. उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, नाताळची सुट्टी हे दिवस म्हणजे प्रवासाची पर्वणी.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पर्यटनासाठी लोंढे लागलेले असतात. बुक असलेल्या गाड्या रेल्वे, बसेस, पर्सनल कार हे सारं असलं तरीही रेल्वे जास्त आरामदायी आहे. त्यामुळं लोक रेल्वे प्रवासाला जास्त प्रमाणात प्राधान्य देतात.
खूप लोक बाहेरगावी जातात. त्यामुळे या दिवसांत रेल्वेला प्रचंड गर्दी असते. लोक त्यावेळी रिझर्व्हेशन करतात पण, जर बुकिंग कन्फर्म नाही झाले तर कित्येकदा उभ्याने प्रवास करायची वेळ येते.
–
- जगातल्या या अद्भुत रेल्वेतून प्रवास केलात, तर वा-याच्या वेगात पोहोचाल
- जगातील सर्वात महागड्या तसेच आशिया खंडातील सर्वाधिक लक्झरियस रेल्वेत बसल्यावर तुम्हाला `महाराजा’ असल्यासारखं वाटेल
–
शेवटच्या मिनीटाला तिकीट कन्फर्म होईल या आशेने लटकलेले लोक पाहीले आहेत का तुम्ही?
हौसेने कुटुंबाला घेऊन प्रवासाला निघालेल्या माणसाला शेवटच्या क्षणीही तिकीट कन्फर्म झालं नाही.. अजूनही आपण वेटिंग लिस्ट मध्ये आहोत हे समजलं तर काय अवस्था होईल बघा बरं!!!
लांब पल्ल्याचा प्रवास, तिकीटाविना करायचा.. किंवा उभं राहून करायचा.. येणारे जाणारे बाजूला व्हा…म्हणत आपल्याला ढकलत पार जातात.. जेवणा खाण्याची पंचाईत. हा सारा घोळ केवळ तिकीट कन्फर्म न झाल्याचा परिणाम!!!
गर्दीने गच्च भरलेल्या डब्यात कधी जर तिकीट कन्फर्म नाही झालं तर अनंत अडचणी येतात. एकटा जीव असेल तर काही कसंही करता येतं.
पण कुटुंब सोबत असेल तर? मुलांचे हाल .. तिकीट तपासणी साठी टीसी आल्यावर होणारी वादावादी, मनस्ताप हे कुणालाही असह्य होणारं असतं. हे होऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला तिकीट कन्फर्म मिळवण्याचे उपाय सांगणार आहोत.
रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळतो. त्याला PNR असं म्हणतात. PNR म्हणजे Passenger Name Record. हा १० अंकी नंबर आहे जो प्रत्येक बुक केलेल्या तिकीटावर येतोच. आणि हा नंबर बदलता येत नाही.
तो एकमेवाद्वितीय असतो. याचे स्टेटस तुम्ही आॅनलाईन पाहू शकता. तो जर कन्फर्म असेल तर CNR असा दाखवतो आणि हा PNR कन्फर्म नसेल तर WL म्हणजे वेटिंग लिस्ट वर असा स्टेटस दाखवतो.
तुमचा प्रवास विनात्रास व्हावा यासाठी रेल यात्री हे अॅप तयार केलं आहे. या अॅपचा फायदा असा की, आपण रिझर्व्हेशन केल्यानंतर मोबाईल वरुन स्टेटस तपासू शकतो. हा स्टेटस अपडेट करायचा एक खास अलगोरिदम दिला आहे.
बुकिंग कन्फर्म करण्यासाठी एक सोपा अलगोरिदम आहे तो जर योग्य रितीने पाहीला तर आपलं काम सोपं होतं. हा अलगोरिदम रेल यात्री या अॅपने प्रवाशांच्या सोयीसाठी व सेवेसाठी बनवला आहे.
यामुळे तुम्ही तुमचं रिझर्व्हेशन प्रतिक्षा यादीतून कन्फर्म आरामात करु शकता. हा अलगोरिदम सोप्या भाषेत सांगायचा तर खालील पायऱ्या आहेत.
यानुसार जर आपण टप्प्या टप्प्यांनी गेलो तर आपलं काम जास्त सुकर होतं आणि आपला बुकिंग स्टेटस अपडेट मिळवता येतो. त्यानुसार जर तुम्ही गेलात तर विनासायास तुमचं बुकींग कन्फर्म होतं..
१. PNR नंबर घ्या
२. रेल्वेचं टाइमटेबल चेक करा.
३. रेल्वेचा स्टेटस तपासा.
४. PNR & Waiting list स्टेटस पहा
५. रेल्वे स्टेशनच्या यादीत पहा.
सर्वसाधारणपणे सर्वांना आपल्याकडे असलेल्या रेल्वे माहिती आहेत असं वाटत असतं पण १०० ते १५० नव्या रेल्वे रोज धावत असतात. या विशेष गाड्यांबाबत लोक पूर्णपणे अनभिज्ञ असतात.
त्या विशेष मार्गावर ठराविक काळापुरत्याच धावत असतात. यासाठीच या अॅपमध्ये अॅलर्ट अॅण्ड स्पेशल ट्रेन हे फीचर जोडलं आहे.
यांचा डाटा शनिवारी आणि रविवारी प्रतिक्षा यादी अर्थात वेटिंग लिस्ट जास्त गच्च दाखवतो आणि सोमवारपासून ती यादी थोडी विरळ होऊ लागते. मग तुम्ही त्या दिवसातही ते बुकिंग पाहू शकता.
म्हणजेच तुम्ही दिवस किंवा आठवड्यानुसारही बुकिंग करु शकता.सोपं उदाहरण पहा… तुम्ही सिनेमा पहायला मल्टीप्लेक्स मध्ये जाता. तर कोणत्या शोची तिकिटे मिळणे अडचणीचे आहे किंवा कठीण आहे हे तुम्हाला माहीत असतेच.
तेंव्हा तुम्ही काय करता? तो शो टाळून दुसरा शो पहाता किंवा दुसरं थिएटर जवळ करता. तेच इथंही करायचं आहे.
–
- महाराष्ट्रात ‘ही’ ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे आजही देते ब्रिटीश कंपनीला भाडे!
- केवळ एका मुलीला शाळेत जाता यावं म्हणून इथे ट्रेन चालवली जाते !
–
असं स्टेशन निवडा जिथं गर्दी कमी असेल. इतर यात्री कुठं आणि कुठून जाणार आहेत हे आॅनलाईन डाटा दाखवत असतोच. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या प्रवासाचं स्टेशन निवडू शकता.
रेल्वे ही काही विमानासारखी नाही जिथं प्रवासी एकदा बसला की शेवटच्या ठिकाणी उतरणार. अधे मध्ये उतरणारे चढणारे प्रवासी असतातच. रेलयात्री अॅपला तुम्ही तुमच्या रेल्वेचा प्रवास मार्ग विचारु शकता. आणि त्यानुसार तुमचा प्लॅन बनवू शकता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.