आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देशप्रेम म्हटलं की, सीमेवरचे सैनिक आठवतात. देशासाठी ते आपला जीव धोक्यात घालतात, आपल्या जिवाची सुद्धा ते फिकीर करत नाहीत. असेच आणखीनही काही लोक असतात जे देशप्रेमासाठी वाट्टेल ते करत असतात.
त्यापैकीच एक म्हणजे पंजाबचे गुप्तचर काश्मीर सिंह. याने एक नाही दोन नाही तर तब्बल ३५ वर्षे पाकिस्तानचा अत्याचार सहन केला, पण देशाबद्दल अवाक्षर सुद्धा पाकिस्तानला सांगितले नाही. किती सहनशीलता ही. बघू तर त्यांच्याबाबतीत नक्की काय घडले?
===
हे ही वाचा – देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ सुंदर पण खतरनाक ललना…
===
काश्मीर सिंह हा साधासुधा माणूस नव्हता, तर भारताचा गुप्तहेर होता. सुमारे ३५ वर्षे त्यांनी पाकिस्तानमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली होती.
पाकिस्तानी जेलमध्ये त्यांच्यावर अत्याचार केले गेले, पण एकदाही श्री सिंह यांनी कबूल केले नाही की ते गुप्तहेर आहेत आणि भारत सरकारनेही कधीही ते देशासाठी हेरगिरी करत असल्याचं कबूल केलं नाही किंवा कुठेही त्याची वाच्यता केली नाही.
१९७३ साली पाकिस्तानने त्यांना अटक केल्यावर सरकारने त्यांच्या कुटुंबाला मदत करावी अशी त्यांना आशा नव्हती, पण जेव्हा त्यांच्या पत्नीने सरकारकडे अशी मागणी केली तेव्हा सरकारने हात वर केले व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
आश्चर्याची गोष्ट ही की श्री सिंह यांच्या कुटुंबाला त्यांच्या कामाबद्दल जास्त माहिती नव्हती कारण त्यांनी घरी त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं.
पंजाब उच्च न्यायालयात त्यांच्या पत्नीने दावा केल्यावर आर्मी हेडक्वार्टरकडून असा दावा केला गेला की, ‘श्री. काश्मीर सिंह यांनी १९६८ ते १९७० पर्यंत सरकारची सेवा केली आहे.’
परमजीत (सिंहची पत्नी) म्हणतात, ‘‘की त्यांनी आम्हाला एवढेच सांगितले होते की ते लष्करासाठी काम करत आहेत, आणि जर ते परत आले नाहीत तर सैन्य तुमची काळजी घेईल असे आश्वासन ते नेहमी देत असत.’’
श्री सिंह म्हणतात की, त्यांनी बहुतेक सर्व कामं सीमेबाहेरच केली आहेत. आणि जेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे सैन्यात भरती करणार्या अधिकार्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि ते पाकिस्तानला जायला तयार आहे का विचारले गेले आणि ते लगेचच तयार झाले.
त्यानंतर त्यांना जालंधर मध्ये तीन महिने प्रशिक्षण देण्यात आले मुख्यत्वे फोटोग्राफीचे. ते म्हणतात, ‘माझ्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून मी जालंधर छावणीच्या आसपासचे आणि अमृतसर मधील युद्धछावण्यांच्या जागेचे फोटो काढले.’’
त्यांना उर्दू येत होते त्यामुळे त्या ज्ञानाचा त्यांना निश्चित फायदा होता. लष्करी वाहने आणि युद्धस्थाने ओळख होण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
ते म्हणतात, ‘माझ्या कामगिरीवर खूष होऊन मला पाकिस्तानला जाण्यासाठी निवडण्यात आले.’’ त्यांना मोहम्मद इब्राहिम हे एक मुस्लीम उपनाव देण्यात आले. आणि एमआय ने त्यांची सुंता देखील केली होती.
एमआय ने त्यांना दरमहा रुपये ४८० पगाराची नोकरी दिली होती, आणि पाकिस्तानात जाताना तर त्यांना दरमहा रु. १५० दैनिक भत्ता देखील देण्यात आला होता. ते प्रथम पाकिस्तानात गेले तेव्हा त्यांना २२ (रील) फ्रेम परदेशी कॅमेरा दिला गेला.
भरती करणार्या अधिकार्याने त्यांना सांगितले की, तुमचं महत्त्वाचं काम म्हणजे पाकिस्तान बॉर्डरजवळ असलेल्या स्थानिक सैन्याची माहिती गोळा करणे, त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घेणे आणि त्या छावणीचे फोटो काढणे. १९६९ मध्ये ते पाकिस्तानला रवाना झाले.
===
हे ही वाचा – RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…
===
हे ऑपरेशन कोण नियंत्रित करत होते याबद्दल अधिक तपशील देण्यास सिंह यांनी नकार दिला. लाहोरमधील कन्नना कच्छ येथे त्यांची पहिली यशस्वी मोहीम पार पडली आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला.
या मोहिमेत त्यांना लाहोर, मुलतान, भावलपूर आणि साहवाल येते रणनीतिक स्थापनेचे फोटो घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला ५० पेक्षा जास्त वेळा प्रवास केला. ते पाकिस्तानला जात, फोटो काढीत आणि सात ते दहा दिवसांत परत असत.
एकदा त्यांनी टी-५९ टँकचे चित्र काढले होते जे पाकिस्तानमधून चीनने विकत घेतले होते. त्यांच्या कामाचे स्वरूप त्यांनी सांगितले ते असे होते.
ते लाहोरमध्ये गेस्ट हाउस मध्ये रूम भाड्याने घेत असत आणि तिथून लाहोर आणि इतर ठिकाणी बसने प्रवास करत असत. त्यांना त्यांची बोलीभाषा, रीतीरिवाजांची चांगली समज होती. म्हणूनच त्यांना जोपर्यंत अटक झाली नव्हती तोपर्यंत कधीही त्रास झाला नाही.
पण शेवटी त्यांना अटक करण्यात आली. पेशावर-रावळपिंडी रोडवरील २२ व्या मैलावर त्यांना अटक करण्यात आली. पेशावर येथील काही फोटो घेतल्यावर ते लाहोरला जात होते. खरं तर दुसर्या दिवशी ते भारतात जाणार होते.
३५ वर्षांनंतर ते घरी जाणार होते. ते एका बसमध्ये बसले. त्यांच्याबरोबर असा माणूस होता जो खरं तर त्यांचा मार्गदर्शक असायला हवा होता, पण थोड्याच वेळात त्यांना त्या सह प्रवाशाबद्दल काहीतरी वेगळे वाटले.
नंतर बसचा वेग कमी झाला आणि २२ व्या मैलाच्या दगडाजवळ पाकिस्तानी गुप्तचर अधिकार्यांनी बस थांबविली. ते थेट काश्मीर सिंह आणि त्याच्या सहकार्याकडे आले आणि त्यांना घेऊन गेले.
त्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले नाहीत. त्यांच्या सहकार्याने पाकिस्तानी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली. नंतर 35 वर्षं त्यांनी पाकिस्तानी तुरुंगात काढली. खूप अत्याचार सहन केले, पण एकदाही कबूल केलं नाही की ते भारतीय गुप्तहेर आहेत.
मार्च २००८ मध्ये मानवीय अधिकारावर त्यांची मुक्तता केली गेली. श्री जे सी. भारद्वाज हे श्री सिंह यांचे जवळचे कौटुंबिक मित्र होते. त्यांनी भारतीय आणि पाकिस्तानी सरकारसह त्यांच्या सुटकेचा खटला सुरू केला.
त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दया याचिका स्वीकारली आणि त्यांनी त्यांची मुक्तता करण्यास सांगितले.
परंतु दुर्दैव असे की, ३५ वर्षं देशासाठी काम करणार्या या माणसाला भारत सरकारने मात्र दुर्लक्षित केले.
जेव्हा सिंह यांना अटक करण्यात आले तेव्हा त्यांची पत्नी परमजीत कौर, त्यांच्या तीन मुलांसह एकटी राहिली. एक मुलगा आट वर्षांचा, एक चौदा वर्षांचा आणि दीड वर्षांची मुलगी.
सरकारकडून दोन वर्षं थोडीशी रक्कम मिळाली ती वगळता सरकारकडून काही पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना कठोर परिश्रम करून आपला उदरनिर्वाह करावा लागला. बरेच वर्ष त्यांच्या पत्नीने मुलांचे पोषण करण्यासाठी मोलकरीण म्हणून काम केले.
‘जेव्हा आम्हाला सर्वांत जास्त गरज होती तेव्हा भारत सरकारने आम्हाला सोडले.’ असं त्यांची पत्नी म्हणते.
नंतर मात्र पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी २००८- २००९ मध्ये त्यांच्या कुटुंबास १०,००० मासिक पेंशन मंजूर केले आणि मुलाला सहानुभूती म्हणून नोकरी दिली.
अशा या निधड्या छातीच्या काश्मीर सिंहचा पोशाख अगदी साधा म्हणजे कुर्ता पायजमा आणि हिरवी पगडी. सर्वांत विशेष म्हणजे १९७३ ते २००८ अशी शिक्षा भोगून ते परत आले तेव्हा ते ७७ वर्षांचे होते.परत आल्यावर त्यांचे स्वागत केले गेले.
===
हे ही वाचा – पाकिस्तानात मुस्लिम बनून राहिलेला, भारताची सुरक्षा अभेद्य ठेवणारा सुपर-स्पाय
===
तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मी अजूनही मातृभूमीची सेवा करण्यास तयार आहे. जरी त्यांनी (भारत सरकारने) मी त्यांच्यासाठी काम केले हे मान्य केले नाही तरीसुद्धा मला काही फरक पडत नाही. मला माझ्या देशाची सेवा करण्याबद्दल कधीच खंत वाटली नाही.’’
खरंच किती असामान्य आहे हे देशप्रेम. त्यांच्या देशभक्तीला सलाम. जय हिंद!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.