आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.
जिथे खाऱ्या पाण्यातील ताजे मासे मिळत नाहीत तिथे गोड्या पाण्यातील माश्यांवर लोक आपली भूक भागवतात. मासे हे जगातील करोडो लोकांचे प्रमुख अन्न आहे.
अगदी छोट्या तिसऱ्यांपासून तर अगदी मोठ्ठ्या डॉल्फिन आणि व्हेल माश्यापासून जवळजवळ सगळेच मासे जगभरातील लोकांच्या ताटात असतात.
असे म्हणतात की मासे हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक आहेत. मासे खाल्याने तुमच्या शरीराला आवश्यक ती सर्वच पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात मिळतात.
किंबहुना पौष्टीक घटक पोटात घालवण्याचा मासे हा सर्वात चविष्ट मार्ग आहे ह्यावर जगभरातील मासेप्रेमींचे एकमत होईल.
तुमच्या नियमित आहारात जर मासे असतील तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तसेच मासे जर आरोग्याला पोषक अश्या स्वरूपात खाल्ले तर तुमचे हृदय आणि मेंदू तंदुरुस्त राहते.
ज्यांना डोळे किंवा दृष्टीशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी तर मासे हे उत्तम औषध आहे. मासे खाल्ल्याने डोळे चांगले राहतात आणि त्यांची क्षमता वाढते.
माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.
मासे खाल्ले तर शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होऊन शरीराला ऊर्जा मिळते.
तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
हे ही वाचा –
===
मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे पुढच्या वेळेला कुणी तुम्हाला मासे खाण्यावरून टोकले तर त्यांना मासे खाण्याचे हे फायदे वाचून दाखवा.
१. मासे -महत्वाच्या पोषक घटकांचा उत्तम स्रोत
आपले रोजचे जेवण काही फार संतुलित असतेच असे नाही. त्यामुळे आपल्या शरीरात महत्वाच्या पोषक घटकांची कमतरता तयार होते.
उदाहरणार्थ उत्तम प्रतीचे प्रोटीन, आयोडीन तसेच विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ह्यांची कमतरता आपल्या शरीरात असू शकते. अशा वेळी साल्मन, ट्राउट, ट्यूना, मॅकरेल, सार्डीन असे मासे खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते.
कारण ह्या माश्यांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते.
बऱ्याच लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून येते. माश्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या मेंदूचे कार्य नीट चालण्यासाठी आवश्यक असते.
तसेच ह्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि अनेक गंभीर आजार नियंत्रणात राहतात.
हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्या रोजच्या जेवणातुन मिळत नाही,त्यासाठी सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. त्यापेक्षा हे मासे खाल्लेले काय वाईट?
२. हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत
जगात सगळीकडेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक ह्यामुळे अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पण अनेक अभ्यासांत असे सिद्ध झाले आहे की मासे हे हार्ट हेल्दी फूड आहे.
नियमित मासे खाणाऱ्यांना हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका तुलनेने कमी असतो.
ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे पोषण शरीराला नियमित मिळाल्यामुळे शरीराचे चक्र व्यवस्थित सुरु राहते. आणि सर्व अवयवांचे कार्य देखील सुरळीत चालते.
३. गरोदर स्त्रियांसाठी व अर्भकाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक
मासे खाणे गरोदर स्त्रियांच्या आरोग्यासाठी व अर्भकाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते.
अर्भक आईच्या गर्भात असताना omega-3 fat docosahexaenoic acid (DHA) हे त्याच्या मेंदू व डोळ्यांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.
म्हणूनच गरोदर स्त्रियांनी तसेच स्तनपान करणाऱ्या आयांनी त्यांच्या आहारात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
–
हे ही वाचा –
===
अर्थात काही माश्यांमध्ये मर्क्युरीचे प्रमाण जास्त असल्याने अर्भकाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच गरोदर स्त्रियांनी व स्तनपान करण्याऱ्यांनी असेच मासे खाल्ले पाहिजेत ज्यांच्यात मर्क्युरीचे प्रमाण खूप कमी असेल.
तसेच आवडतात आणि पचतात म्हणून अति जास्त प्रमाणात सुद्धा मासे खाऊ नयेत.
४. मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत
आपले वय वाढत जाते तसे आपल्या शरीराची गात्रे थकतात, कधी कधी त्यांचे कार्य सुरळीत चालत नाहीत.
कधी कधी काही अवयव निकामी होतात. मेंदूच्या पेशी अश्या असतात की ज्या नष्ट झाल्या तरी परत तयार होणे शक्य नसते.
म्हणूनच म्हातारपणी मेंदूच्या पेशी निकामी होत जातात आणि माणसाला साध्या साध्या गोष्टी करणे सुद्धा जड जाते. विस्मरण होते.
अल्झायमर्स डिसीज हा मेंदूचा आजार मेंदूच्या पेशी नष्ट झाल्यानेच होतो.
पण अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून असाच निष्कर्ष काढला आहे की जे लोक आहारात नियमितपणे मासे खातात त्यांच्या मेंदूच्या पेशी मृत किंवा नष्ट होण्याची प्रक्रिया मंदावते.
त्यांना अल्झायमर्स किंवा इतर न्यूरोडिजनरेटीव आजार होण्याचा धोका तुलनेने कमी असतो.
जे लोक नियमितपणे मासे खातात त्यांच्या मेंदूत ग्रे मॅटर जास्त प्रमाणात असते असे सिद्ध झाले आहे.
५. नैराश्यावर उपाय
नैराश्य ही सर्वत्र आढळणारी मानसिक अवस्था आहे. अनेक लोक नैराश्याशी झगडत असतात. सध्याच्या परिस्थितीत नैराश्य हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आजार आहे.
शास्त्रज्ञांच्या मते नियमित मासे खाणाऱ्या मंडळींना नैराश्य येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
ह्यातही परत ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचीच भूमिका महत्वाची आहे.
ओमेगा थ्री फॅटी ऍसिड नैराश्याशी दोन हात करण्यात महत्वाची भूमिका बजावते. तसेच शरीरात जर नियमितपणे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची मात्रा जात असेल तर अँटी डिप्रेसंट औषधांचा जास्त चांगला परिणाम होण्यास मदत होते.
शास्त्रज्ञ असेही सांगतात की मासे व ओमेगा थ्री फॅटी ऍसिड बायपोलर डिसॉर्डरवर सुद्धा परिणामकारक आहे.
–
हे ही वाचा – डायबेटीस असतानाही हे ८ पदार्थ खाल्ले, तर धोका अधिक वाढेल, वाचा…
–
आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी हे स्टिरॉइड हॉर्मोनचे काम करते. पण दुर्दैवाने अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त असतात. मासे आणि माश्यांच्या उत्पादनांतून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.
केवळ एक चमचा कॉड लिव्हर ऑइलमधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.
व्हिटॅमिन डी तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे लहान मुलांमधील टाईप वन डायबेटीससारख्या ऑटोइम्यून आजारांना प्रतिबंध करतात.
तसेच नियमितपणे मासे खाणाऱ्या लोकांना मल्टिपल स्क्लेरॉसीस आणि र्ह्युमॅटॉइड अर्थ्रायटिस सारख्या आजारांपासून सुद्धा कमी धोका असतो असे शास्त्रज्ञ म्हणतात.
लहान मुलांना नियमितपणे मासे खायला घातले तर त्यांना दमा होत नाही असेही एका अभ्यासात आढळून आले आहे.
मोठ्यांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास इतर त्रासांबरोबरच निद्रानाशाचाही त्रास जाणवतो. अश्या वेळी मासे मदतीला धावून येतात.
लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनीही खास करून स्त्रियांनी नियमितपणे मासे खाल्ले तर एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन कमी होते आणि दृष्टीवर परिणाम होत नाही असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कारण ओमेगा थ्री फॅटी ऍसिडमुळे ह्या अवस्थेला प्रतिबंध होण्यास मदत मिळते.
थोडक्यात काय तर लहान मुले, सर्व वयाचे स्त्री-पुरुष ह्यांना आहारात मासे असल्यास खूप फायदा होतो.
त्यामुळे आठवड्यातून किमान दोन वेळेला तरी मासे खाल्ले पाहिजेत असे आहारतज्ज्ञ सांगतात.
तर मग वाट कसली बघताय? इतके सगळे फायदे वाचल्यावर मासे खाण्यासाठी आणखी कुठलं कारणच शोधण्याची गरज नाही. बाजारात जा आणि आवडीचे मासे आणून त्यावर आडवा हात मारा!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.