Site icon InMarathi

हि १० क्रिकेट स्टेडियम्स एका वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहेत!

TripAdvisor.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण.

कोणतीही मॅच असो, क्रिकेट प्रेमींचे लक्ष त्याकडे लागलेलेच असते.

केवळ आणि केवळ क्रिकेट हाच धर्म मानणारी मंडळी प्रत्येक अपडेट कानात प्राण आणून ऐकतात, त्यांना जळी स्थळी कष्टी पाषाणी केवळ आणि केवळ क्रिकेटच दिसतय.

त्यातच क्रिकेटचं स्टेडियम हा तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय.

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जगभरातील प्रसिद्ध अशा दहा क्रिकेट स्टेडीयमची माहिती आजच्या ह्या लेखात.

१. लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम, लंडन

लंडन मधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम म्हणजे क्रिकेटर्सची पंढरीच जणू, हे स्टेडियम अतिशय जुने भव्य आणि सुंदर आहे. २०१४ साली ह्या स्टेडियमला तब्बल २०० वर्षे पूर्ण झाली.

 

CricTracker.com

 

येथे २००० पेक्षाही जास्त कसोटी सामने येथे खेळले गेले आहेत. स्टेडियमच्या जवळूनच वॉर्सेस्टर नदी वाहते, स्टेडीयम मधून ह्या नदीचे असे काही मोहक दृश्य दिसते की बघणारा विस्मयाने क्षणभर स्तब्ध होतो.

लॉर्ड्स मैदान अगदी वाईन सारखे आहे जे वाढत्या वयाबरोबर अधिकाधिक दर्जेदार बनत चाललं आहे.

ह्या स्टेडियम ची बैठक क्षमता आहे सुमारे ३०,०००. आणि २०१४ च्या सामन्यात सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वोर्न असा रंगलेला सामना हा येथील सर्वात प्रतिष्ठित सामना मानला जातो.

३. क्वीन्स टाउन इवेंट सेंटर न्यूजिलैंड

क्वीन्स टाउन इवेंट सेंटर न्यूजिलैंड हे एक आलीशान स्टेडीयम आहे. ह्याला जॉन डेवीस ओवल स्टेडीयम म्हणूनही ओळखले जाते.

 

Austadiums.com

 

कारण ह्या स्टेडीयम चा आकारा अंडाकृती आहे हे स्टेडीयम डोंगर आणि तळ्याच्या काठी बांधले गेले आहे.

येथे विमाने उतरण्याची देखील सोय केलली आहे बैठक व्यवस्था आणि एकूणच बांधणी एवढी दर्जेदार आहे की, डोळे विस्फारले जातात. ह्या मैदानाची बैठक क्षमता आहे १९,०००.

३. हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा, भारत

समुद्र सपाटीपासून ४७४० फूट उंचीवर असणार्रे हे मैदान किंग्स इलेवन पंजाब साठी दुसर्‍या घरासारखेच आहे. हे स्टेडीयम जागतल्या सर्वात सुंदर स्टेडीयम पैकी एक आहे.

धर्मशाळा सारख्या रम्य ठिकाणी आणि बर्फाच्छादित हिमालयच्या पार्श्वभूमीवर येथे आपला लाडका क्रिकेट सामना बघणे हा एक अद्वितीय अनुभव आहे.

 

youtube.com

 

ह्या मैदानाची बैठक क्षमता सुमारे २३,३०० एवढी आहे. जानेवारी २०१३ साली झालेला भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना येथील सर्वात खास सामना मानला जातो.

४. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, ऑस्ट्रेलिया

मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड किंवा एमसीजी हे स्टेडीयम अत्यंत लोकप्रिय आहे आणि जगातल्या दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे मैदान आहे.

मैदानाचा प्रचंड आकार आणि ज्याप्रकारे ह्या मैदानाची देखरेख केली जाते हे अवाक करणारे आहे. येथे केवळ क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळ खेळले जातात.

मात्र ह्या स्टेडियमला जास्तकरून कसोटी सामने आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड ह्यांच्या झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याचे यजमानपद भूषवण्या साठी ओळखले जाते.

 

playo.co

 

ह्या स्टेडीयमची बैठक क्षमता तब्बल एक लाख माणसांची आहे. इथली डिसेंबर २००६ सालचा शेन वार्न ने ७०० वी टेस्ट विकेट काढलेला सामना विशेष गाजला होता.

५. पुकेकुरा पार्क क्रिकेट स्टेडियम, न्यूजीलैंड

हे मैदान अत्यंत लोकप्रिय मैदानांपैकी एक नसले तरी हे मैदान सुंदर पर्वतराजीने वेढलेले आहे आणि म्हणूनच भोवतीचा निसर्ग अगदी नयनरम्य आहे.

 

Stuff.co.nz

 

येथे सामना बघण्याचा आनंद एक सुंदर अनुभूति आहे. येथील आसनक्षमता २५००० इतकी असून १९९२ सालचा इथे झालेला श्रीलंका विरुद्ध जिंबाब्वे सामना विशेष गाजला होता.

७. इडन गार्डन कलकत्ता भारत

MCG च्या नंतर हे मैदान जगातील दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात मोठं मैदान आहे. ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियम १९८७ साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणारे दुसरे स्टेडीयम होते.

ह्या मैदानाबद्दल असेही बोलले जाते की कोणताही खेळाडू तोवर परिपूर्ण होत नाही जोवर तो ह्या मैदानात खेळत नाही.

 

kkr.com

 

कहा जा रहा है कि, ईडन गार्डन आपल्या उत्कृष्ट पिच साठी ओळखले जाते ज्याला केवळ पेसर ची पिच म्हणून देखील ओळखले जाते. ह्या स्टेडियमची आसन क्षमता सुमारे ६८,००० माणसांची आहे.

येथे खेळला गेलेला रोहित शर्माने १७३ चेंडूत केलेल्या २६४ धावांचा सामना मोस्ट आइकोनिक मैच म्हणून ओळखला जातो.

७. गाळे आंतरराष्ट्रीय स्टेडीयम, श्रीलंका

हिन्दी महासागराच्या दोन कींनार्‍यांवर वसलेले हे स्टेडीयम आपल्या सुंदर पिच साठी प्रसिद्ध आहे. स्पिन बोलिंग साठी ही पिच अत्यंत अनुकूल मनाली जाते.

हे स्टेडीयम २००४ च्या सुनामीत उध्वस्त झाले होते, मात्र आता ते पूर्ववत करण्यात आलेले आहे. आणि अजूनही जगातील सर्वात सुंदर स्टेडीयमच्या पंगतीतले आपले स्थान राखून आहे.

 

bbc.com

 

ह्या स्टेडियमची आसन क्षमता १८,००० लोकांची आहे. २००४ साली खेळला गेलला शेन वार्न चा ५०० वी टेस्ट विकेट सामना हा येथील सर्वाधिक प्रतिष्ठित सामना आहे.

८. वानखेडे स्टेडीयम मुंबई.

ह्या स्टेडियमने आजवर कैक हाय प्रोफाइल सामन्यांचे यजमानपद भूषवले आहे परंतु २०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमान पद भूषवणे हे विशेष उल्लेखनीय आहे.

त्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नुतनीकरणामुळे पूर्वी ४५,००० असलेली आसनक्षमता आता ३३,१०८ एवढी झालेली आहे.

 

Cricbuzz.com

 

आपल्या अंतर्राष्ट्रीय करियरचा शेवटचा सामना सचिन तेंडुलकरने येथेच खेळला, येथे रवी शास्त्रीने एका ओवरमध्ये सहा षटकार ठोकलेला सामना येथील विशेष गाजलेला सामना आहे.

९. न्यूलंड्स स्टेडियम केप टाउन

येथे सर्वच प्रकारचे सामने खेळले जातात. हे स्टेडीयम जगातील सर्वात सुंदर स्टेडीयम पैकी एक आहे. प्रसिद्ध टेबल मौटन्स येथून जवळच आहेत.

 

daily.com

 

पूर्वी येथे केवळ रग्बी आणि फूटबॉल चे सामने खेळले जात त्यानंनतर हे मैदान १८८८ साली क्रिकेटसाठी खुले करण्यात आले. हे मैदान आपल्या खास पिच साठी देखील ओळखले जाते.

१०. WACA (पर्थ)

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट एसोसिएशन म्हणजेच (WACA) हे मैदान समुद्राजवळ वसलेले आहे. WACA च्या पिच ला जगातील सर्वात वेगवान आणि बाउंसी मानले जाते.

 

Austadiums.com

 

ही पिच अगदी असाधारणपणे वेगवान खेळास योग्य असल्याने येथे स्कोरिंग फारच वेगाने होते. फेब्रुवारी २०१६ पर्यंतच्या कसोटी सामन्यातिल सर्वाधिक वेगवान अशी नऊ शतके केवळ WACA च्या मैदानात खेळली गेलेली आहेत.

ह्या मैदानाचा उपयोग एथ्लेटिक्स कार्निवल, फूटबॉल, बेसबॉल, रग्बी इत्यादि खेळांच्या सामन्यासाठीही केला जातो. ह्याशिवाय येथे रॉक कोन्सर्ट देखील पार पडतात.

तर ही होती माहिती जगभरातील प्रसिद्ध दहा स्टेडियम्स विषयी. टीव्हीवर सामने आपण नेहमीच बघतो कधीतरी प्रत्यक्ष खेळाचा अनुभवही जरूर घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version