Site icon InMarathi

झोप अपूर्ण राहिल्यामुळे घडलेल्या या भयानक दुर्घटना खरोखरच झोप उडवतात!

insufficient sleep inmarathi

insideevs

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“लवकर निजे लवकर उठे त्यांसी आयुआरोग्य लाभे”

नेहमी ऐकू येणारा हा वाक्यप्रचार. पूर्वी लोकं खरंच या सगळ्या वेळा पाळू शकायचे. दिवसभर दैनंदिन व्यवहार सांभाळून रात्री लवकर योग्य वेळी आणि योग्य वेळ झोपावे आणि पहाटे/सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या सुरू करावी असा याचा अर्थ.

 

shutter stock

 

आजही खेडोपाडी अनेक जण ही दिनचर्या अंमलात आणताना आढळतात. काळ बदलला, माणसाची दिनचर्या बदलली आणि अर्थातच त्याच्या झोपण्या उठण्याच्या वेळाही बदलल्या.

भारतासारख्या विकसनशील देशात प्रगती होताना पूर्वीच्या जडणघडणीत अनेक बदल होताना दिसतात. या सगळ्याचा थेट परिणाम माणसाच्या राहणीमानावर, रोजच्या जगण्यावर झालाय/होत आहे.

 

HuffPost.com

 

आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात माणसाचे शारिरीक आणि मानसिक कामाचे तास वाढले आणि अर्थातच शांत झोपेचे तास कमी झाले.  याचा परिणाम फार भयावह आहे.

पूर्ण वेळ आणि शांत झोपेने माणसाचा मेंदू तल्लख राहतो आणि तो पूर्ण कौशल्याने, एकचित्ताने विचार करू शकतो, काम करू शकतो.
पण झोप पूर्ण झाली नसेल तर त्याचा परिणाम कामावर तर होतोच; पण शरिरावरही होतो.

अपूर्ण झोपेमुळे मेंदुची तल्लखता कमी होते, आकलनशक्ती कमी होते, विचारप्रक्रियेवर परिणाम होतो आणि हळुहळू या सगळ्याचा परिणाम रोजच्या जीवनावर होतो.

 

gypsybulletin

 

“झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम” या विषयावर केल्या गेलेल्या निरीक्षणांत असं आढळून आलं आहे की कारखान्यांमधे काम करताना झोप पूर्ण न झालेल्या कामगारांच्या अपघाताची संख्या ही झोप पूर्ण झालेल्या कामगारांपेक्षा जवळजवळ ७०% जास्त आहे.

 

University of Colorado Boulder

 

तसंच याच विषयावरील एका स्वीडिश निरीक्षणानुसार साधारण पन्नास हजार लोकांची चाचपणी केली असता असं आढळून आलं की काम करताना चूक होऊन मृत्यू येणा-यांपैकी झोप पूर्ण न झालेल्या कामगारांची संख्या ही पूर्ण झोप झालेल्या कामगारांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

अशा झोप पूर्ण न झाल्यामुळे घडलेल्या घटना आपली ही झोप उडवतात.

इतिहासात डोकावता, झोप पूर्ण न झाल्यामुळे कामात हलगर्जीपणा येऊन अनेक दुर्घटना घडल्याचे आढळून येते.

थ्री माइल आयलंड न्युक्लीअर पाॅवर प्लांटचं उदाहरण बघता रात्रभर काम केलेल्या कामगारांनी पहाटे साडे चार वाजता त्वरित रिस्पाँस न दिल्याने अपयश आल्याचं बोललं जातं.

या प्लांटच्या अपयशात अपूर्ण झोप झालेल्या कामगारांकडून झालेली दिरंगाई हे एक कारण अधोरेखित केलं जातं.

असंच अजून एक उदाहरण म्हणजे चर्नोबिल येथील न्युक्लीअर प्लांट !

झोप पूर्ण न झाल्यामुळे पहाटे दीड वाजता कामगारांनी त्वरित योग्य प्रतिसाद न दिल्याने या प्लांटला अपयश आलं. या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला झोप पूर्ण न होऊ शकल्यामुळे होणा-या परिणामांची गंभीरता लक्षात येऊ शकते.

 

daily express

 

योग्य वेळी योग्य प्रमाणात झोप पूर्ण झाली नाही तर शारिरीक व्याधी जडू शकतात. शरीर जडावलेलं राहतं, पेंगळलेली अवस्था राहते, कामात पूर्ण लक्ष रहात नाही आणि अशा अवस्थेत काम करताना / एखादा निर्णय घेताना चूक होऊ शकते.

अशा वेळेस स्वतःचं पूर्ण कौशल्य वापरलं जात नाही. याचे परिणाम निर्णयक्षमतेवर होऊन नुकसान होऊ शकतं.

दूरच्या प्रवासाच्या विमानाच्या वैमानिकांची, अडनिड्या वेळेमुळे झोप पूर्ण होऊ न शकल्यामुळे होणा-या अपघातांची संख्या खूप मोठी आहे.

 

the conversation

 

तसेच अनेक क्षेत्रांत कामाच्या वेगवेगळ्या, बदलणा-या, अनिश्चित वेळा असतील आणि झोप पूर्ण होऊ शकत नसेल तर त्याचाही कामावर आणि त्या व्यक्तिच्या वैयक्तिक आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

झोप पूर्ण व वेळेवर न मिळाल्याचा परिणाम फक्त शरीरावर किंवा कार्यक्षमतेवर होतो असं नाही तर त्याचा थेट परिणाम हा मानसिक आजारात परावर्तित होऊ शकतो.

मेंदू क्षमतेपेक्षा कमी तल्लखतेने काम करणे, विसराळूपणा वाढणे, उत्साह न वाटणे, भिती वाटणे, आभास होणे, चिडचिड होणे असे अनेक मानसिक बदल घडतात आणि या सगळ्याचा पूर्ण आयुष्यावरच विपरीत परिणाम होतो.

अशा वेळेस तज्ञ डाॅक्टरांची मदत घेणे योग्य आणि गरजेचे ठरते.

निराशावादी होण्याकडे कल जाण्यापूर्वीच या सगळ्याचं गांभीर्य ओळखून डाॅक्टरांच्या मदतीने यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे.

 

publiceyemaritzburg.co.za

 

संरक्षण खात्यासारख्या अतिसंवेदनशील कामाच्या ठिकाणी, त्यांच्या वेगवेगळ्या बदलणा-या कामाच्या वेळा आणि स्वरुप, अनेक कारणांमुळे झोपेचा अभाव, त्याचा शरीरावर आणि मनावर येणारा ताण यासाठी अनेकदा त्यांना तज्ञ डाॅक्टरांची मदत घ्यावी लागते, पुरवली जाते.

अपूर्ण, कमी, योग्य व पुरेशा न मिळालेल्या झोपेमुळे सध्याच्या या धावपळीच्या युगात अनेक जण insomnia म्हणजेच अनिद्रा / निद्रानाशाचे बळी होत आहेत. याचा विपरीत परिणाम त्यांच्या पूर्ण आयुष्यावर होत आहे.

म्हणूनच अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार केले गेले तर हा मानसिक आजार बरा होऊ शकतो.

मन प्रफुल्ल, उत्साही असेल तर अर्थातच त्याचा योग्य आणि चांगला परिणाम शरीरावर, कार्यक्षमतेवर आणि ओघानेच पूर्ण आयुष्यावर होतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version