आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
२३ जून १७५७ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालच्या नवाबाच्या सैन्यांमधील एक महत्त्वाची लढाई झाली. या लढाईतील विजयाने ब्रिटिशांचे भारतावर साम्राज्य करण्याचे स्वप्न जवळजवळ सत्यात उतरले.
त्यातून दुर्दैव म्हणजे ही लढाई त्यांनी एका फितुरामुळे जिंकली. बंगाल प्रांत जिंकला आणि नंतर संपूर्ण भारत जिंकण्याचे स्वप्न ब्रिटीशांनी ऊरी बाळगले. तर बघूया या पहिल्या लढाईमध्ये नक्की काय झाले.
या लढाईची पार्श्वभूमी :
एप्रिल १७५७ मध्ये २३ व्या वर्षी सिराज-उद-दौला बंगालचा नवाब झाला. या क्षेत्रातील त्यांच्या व्यापारिक पदांवर बळकटी करणारे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीबद्दल त्याला संशय होता. त्याने त्यांना थांबण्याचे आदेश दिले, परंतु ब्रिटीशांनी नकार दिला.
त्यामुळे ब्रिटीशांना शह देण्यासाठी २० जून रोजी सिराजने कलकत्ता येथे ब्रिटीश चौकीवर हल्ला करण्यासाठी पन्नास हजार सैनिकांची सेना सोबत घेतली.
सिराजने कलकत्त्याच्या ब्रिटीश कुटुंबियांतील १२३ ब्रिटीश कैद्यांना ठार मारले आणि शहर लुटले. त्याला प्रत्युउत्तर म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने कर्नल रॉबर्ट क्लाईव्हच्या अधिपत्याखाली २४०० सैनिकांची (त्यापैकी ९०० गोरे, १५०० भारतीय) सैन्याची स्थापना केली.
क्लाईव्हच्या आदेशानुसार कलकत्ता परत मिळावे आणि नवाब यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी सक्ती करण्यात आली. त्यासाठी बोलणी करण्यासाठी क्लाईव्ह २ जानेवारी १७५७ रोजी कलकत्ता येथे पोहोचला आणि सिराज-उद-दौलाशी काही वाटाघाटी करून त्यावर स्वाक्षरी केली.
या तहामुळे ईस्ट इंडिया कंपनीला परत व्यापार करण्यास परवानगी दिली पण कोणतेही नुकसान भरपाई मिळाली नाही.
तथापि, मार्चमध्ये क्लाईव्हने फ्रेंच नियंत्रित शहर चंद्रनगरवर हल्ला केला. त्यांनी ब्रिटीश विरोधी गठबंधन तयार करण्यासाठी फ्रेंचशी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान क्लाईव्ह नवाबच्या सैन्यातील उच्च पदाधिकारी मीर जाफर यांच्या संपर्कात होता. मीर जाफर याला फितूर करण्याचा प्रयत्न त्याने केला.
मीर जाफरनी जर आपल्याला कलकत्त्याचा नवाब केले तर कलकत्त्याच्या उभारण्यासाठी भरपाई देण्याचे वचन रॉबर्ट क्लाईव्हला दिले. क्लाईव्हने ही मागणी मान्य केली. सैन्यात एक जरी फुटीर निघाला तरी सैन्य कसे दगा खाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
त्यानंतर १४ जून रोजी क्लाईव्हने सिराज-उद-दौला यांच्याशी जाहीरपणे युद्ध घोषित केले.
२३ जून रोजी पहाटे, भागीरथीच्या काठावर ब्रिटीश सैन्याने प्लासी गाठली. त्यांनी आंब्याच्या बागेतील जागा निवडली. बंगाली सैन्याने सुमारे एक मैल दूर असलेली, नदीच्या एका बाजूची जागा निवडली.
पहाटे बंगाली सैन्याने ब्रिटीशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. ब्रिटीशांनी ३० जणांना ठार मारले आणि आंब्याच्या झाडांचा आश्रय घेऊन ते मागे फिरले. दोन्ही बाजूंनी बॉम्ब टाकले जात होते.
दुपारच्या जेवणाच्या वेळी मात्र खूप जोराचा पाऊस म्हणजे अतिवृष्टीच झाली. ब्रिटीश सैन्याने त्यासाठी काळजी घेतली होती, मात्र बंगाली सैन्याने कोणतीही सावधगिरी बाळगली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बंदुकी, दारूगोळा भिजले आणि निरुपयोगी झाले.
पाऊस सुमारे दोन वाजता थांबला तेव्हा सिराज-उद-दौलाच्या कमांडर मिर मदन खानने ५००० भारतीय घोडेस्वारांसह हल्ला केला. पावसामुळे तोफांचा पाऊस होणार नाही असे त्याला वाटले, पण तो त्याचा समज चुकीचा होता. त्या हल्ल्यात तो स्वत: मारला गेला.
या आपत्तीनंतर सिराज-उद-दौला हे शेतात मागेच राहिले आणि सैन्याला लढण्यासाठी सोडून दिले.
याचा फायदा मीर जाफरने घेतला. ब्रिटीशांनी आंब्याच्या झाडामागून गोळीबार केला. बंगालच्या सैन्याकडे असलेल्या बंदुका मात्र निरुपयोगी होत्या. कारण त्या पावसामुळे ओल्या झाल्या होत्या.
या वेळी क्लाईव्हने अशी एक कारवाई केली की जी कोणत्याही वेळी मूर्खपणाची वाटेल. त्यांनी बंगाली सैन्याच्या मध्यभागी प्रवेश केला. हे खूपच धक्कादायक होते. बंगाली सैन्याच्या मध्यभागी असलेल्या फ्रेच तोफांचा कब्जा करण्याचा त्यांचा हेतू होता.
उर्वरित सैन्यालासुद्धा त्याच्यासोबत येणे भाग पडले. त्यामुळे बंगाली सैन्य अधिकच गोंधळले. आधीच तोफा आणि दारूगोळा यांचा अभाव होता. त्यात सेनापतीही कुठे दिसत नव्हता.
या सगळ्या गोंधळाचा फायदा मीर जाफरने घेतला. त्याने आपले पाऊल उचलले. तो सिराज-उद-दौलाचा माजी सेनापती होता.
सिराज-उद-दौला ने लढाईत भाग घेतला नव्हता त्यामुळे आपला नेता दिसत नसल्याने बंगाली सैन्य गोंधळले आणि ब्रिटीशांचा विजय नक्की झाला. त्यातच मीर जाफरने सैन्याला युद्धक्षेत्राकडे परत फिरण्याचा आदेश दिला.
सैन्याने विजयी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांपासून पळ काढला. दुसर्या दिवशी मीर जाफर रॉबर्ट क्लाईव्हला भेटले आणि त्यांनी मदतीसाठी त्याचे आभार मानले. सिराज-उद-दौलाचा सरतेशेवटी पराभव झाला व दोनच दिवसांनी सैन्य इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर सिराज-उद-दौलाला ठार मारण्यात आले.
नंतर मीर जाफरला इंग्रजांनी कलकत्त्याचा नवाब बनवला. त्याने कलकत्त्याच्या नुकसान भरपाईसाठी २२ दशलक्ष रुपयांची रक्कम मान्य केली.
पण तो इंग्रजांच्या हातचे बाहुले बनला. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.
क्लाईव्हच्या विजयाचं कारण वादळ आणि पाऊस हेही असू शकतं. त्याप्रमाणेच बंगाली सैन्याचे प्रशिक्षण आणि मनोबल पण कमी होतं. या युद्धाच्या आकडेवारीत ब्रिटीश सैन्याने ३००० सैनिकांतून केवळ २२ लोक गमावले तर बंगाली सैन्याने ५०००० सैनिकांतून ५०० हून अधिक सैनिक गमावले.
युद्ध संपल्यानंतर ब्रिटीश सरकारने प्लासीच्या क्लाईव्ह द बॅरनची निर्मिती केली. प्लासीच्या लढाईत क्लाईव्हच्या विजयानंतर ब्रिटानी ईस्ट इंडिया कंपनीला वेगळे वळण मिळाले.
आणि ब्रिटनला संपूर्ण भारत जिंकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून देणारा हा पहिला विजय मिळाला.
अशाप्रकारे प्लासीची लढाई हे एक ऐतिहासिक वळण होते. या लढाईमुळे ब्रिटीशांच्या आशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला गेला.
ही पहिली लढाई ब्रिटीश जिंकले. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती मिळवली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमारावर संपत्ती कमावण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला.
अशाप्रकारे भारतात ब्रिटीशांनी पाय रोवला. कारण ही भारताविरुद्धची इंग्रजांची पहिली लढाई होती.
स्वत:च्या फायद्यासाठी मीर जाफरने आपल्या सैन्याचा, देशाचा बळी दिला. जर तो फितूर झाला नसता तर लढाई जिंकली असती का नसती हाही एक मुद्दा आहेच, पण तरीही फितुरी केल्यामुळे दुसर्या सैन्याला बळकटी मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.