Site icon InMarathi

कोणाला ‘असं व्यसन’ कसं असू शकतं? ही अतिशय भयानक ‘नशा’ बघून किळस येईल

snake bite 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

व्यसन आणि व्यसनाच्या आहारी जाणारे लोक हे काही आपल्याला नवीन नाही. आपल्या असापास कित्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन करतच असतात.

परंतु, व्यसनाचा हा अघोरी प्रकार तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय तरुणांमध्ये पसरलेल्या नशेच्या या मादक आणि घातक व्यसनामुळे डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

thehindu.com

 

भारतातील दोन तरुणांनी स्वतःला सापाच्या विषाचे व्यसन असल्याचे सांगत स्वतःला या घातक आणि मादक व्यसनापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या मदतीचा धावा केला आहे.

राजस्थानमधील या तरुणांना इतर कोणत्याही मादक पदार्थामुळे इतकी तीव्र नाशा चढत नसल्याने ते स्वतःच्या जिभेवर कोब्राचा डंख करवून घेतात.

यामुळे त्यांना इतकी तीव्र नशा चढते की हा आनंद त्यांना अगदी अवर्णनीय वाटतो, असे ते सांगतात.

चंदिगढच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन पदव्युत्तर शिक्षण संस्थेच्या व्यसन आणि विष तज्ञ आता या गोष्टीवर संशोधन करत आहेत!

की हे तरुण विष चढू नये म्हणून काही विशिष्ट औषधं घेत होते की हे वैद्यकीय क्षेत्रातील खरेच नवे आव्हान आहे.

या दोन तरुणांची ही जगावेगळी कथा नुकतीच इंडियन जर्नल ऑफ सायकॉलॉजीकल मेडिसिन मध्ये प्रसिद्ध झाली आहे.

डॉ. असीम मेहरा, डॉ. देबाशिष बसू आणि डॉ. संदीप ग्रोवर या तिघांनी यांच्यावर “स्नेक वेनोम युज अॅजसबस्टीट्युट फॉर ओपीयड्स : अ केस रिपोर्ट अँड रिव्ह्यू ऑफ लिटरेचर,’ या नावाने संशोधन प्रसिद्ध केले आहे.

हे दोन तरुण, सापांनी त्यांच्या जिभेवर दंश करावा म्हणून गारुड्यांना पैसे देत.

त्यानतंर यांचा शरीराच्या हालचालीवर ताबा राहत नसे, त्यांना अंधुकअंधुक दिसू लागे आणि तब्बल एक तास तरी दोघेही कसलाच प्रतिसाद देत नाहीत,” असे डॉ. ग्रोव्हर म्हणाले.

 

gulfnews.com

 

मात्र एका तासानंतर जेंव्हा त्यांना जाग येई तेंव्हा ते अगदी उत्तेजित असत आणि त्यांना अगदी आरामदायी वाटे, त्यांच्या मते दारू किंवा ओपियम सारख्या अमलीपदार्थामुळे अशी नशा चढत नाही किंवा इतकी मजा येत नाही.

अभ्यासकांनी अशा पदार्थांच्या बेकायदा वापराबाबत जागरूक व्हावे म्हणून हा अभ्यास करण्यात आला. कारण, अशा प्रकारच्या कोणत्याही विषाच्या नशेबाबत वैद्यकीय क्षेत्रात फारशी लिखित माहिती मिळत नाही.

सर्पदंश/ थोडक्यात

दरवर्षी ५.४ दशलक्ष इतक्या सर्पदंशाच्या घटना घडत असतात. यापैकी सापामुळे विष बाधा झाल्याच्या १.८ ते २.७ दशलक्ष घटना असतात.

सर्पदंशामुळे जवळपास ८०,००० ते १, ३८, ००० इतके मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते.

गरीब किंवा मध्यमवर्गीय घटकातील शेतकरी, मुले आणि स्त्रियांवर या विषाचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.

सर्पदंशावर योग्य आणि वेळेत उपचार न केल्यास गंभीर परिणाम दिसून येतात.

ज्यामुळे श्वासोच्छवास करण्यात अडथळे येतात, रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात, किडनी फेल्युअरची शक्यता निर्माण होते, जिथे चावा घेतला असेल शरीराच्या त्या भागातील पेशींची हानी होते.

यामुळे कायमचे अपंगत्व येण्याची देखील दाट शक्यता असते.

सापाचे विष उतरवण्यासाठी, उच्च दर्जाचे सापाचे प्रतीविष वापरावे लागते.

 

The Sunday Guardian

 

हे दोन्ही तरुण तिशीच्या आसपासचे आहेत. परंतु जिथे कोब्राच्या दंशाने मोठा तगडा बैल देखील तडफडून मरू शकतो तिथे या दोघांना कोब्राच्या विषाला प्रतिकार करण्याची क्षमता कुठून मिळत असेल हा खरा प्रश्न आहे.

“या तरुणांना गेली पंधरा वर्षे ओपियमचे व्यसन आहे,” अशी माहिती डॉ ग्रोव्हर यांनी दिली.

“भारतात यापूर्वीही सापाच्या विषाचा आनंद मिळवण्यासाठी देखील वापर केला जातो याची उदाहरणे दर्शवणारी केवळ चार अहवाल आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. हे दोन्ही तरुण चांगल्या साधन कुटुंबातील आहेत.”

 

Chemistry World

 

ही बाब अतिशय दुर्मिळ असली तरी, राजस्थानच्या वायव्य भागातील काही जमतीत सापाच्या विषाचा वापर, औषधासारखा केला जातो- परंतु, तो विशेषतः बाम किंवा मलम प्रमाणे वेदनेपासून आराम मिळावा म्हणून केला जातो.

हा प्रकार देखील क्वचितच आढळतो.

“सापाच्या विषाची नशा करून देखील एखाद्या व्यक्तीमध्ये त्याला प्रतिकारक गुण कसे निर्माण होतात याची काहीही माहिती सध्या तरी नाही, अशी माहिती, डॉ. सविता मल्होत्रा यांनी दिली.

सापाच्या काही जातींचाच वापर अशा प्रकारे व्यसनासाठी वापर केला जातो. या सापांच्या दंशामुळे काही प्रमाणात व्यसन केल्यासारखेच अनुभव येतात.

या दंशामुळे मज्जातंतूतील पेशींवर तशाच प्रकारचा परिणाम होतो जो परिणाम व्यसनामुळे होतो.

यामध्ये होणारे परिणाम

१. वेदनाशामक परिणाम

२. अंधुक दिसणे

३. भोवळ येणे

४. अत्यानंद झाल्याचा भास

५. सुस्तपणा

६. पक्षाघात

चेता पेशी ज्याप्रमाणे व्यसनांना प्रतिसाद देतात त्याचप्रमाणे त्या सर्पदंशाला देखील प्रतिसाद देत असतील.

म्हणजे व्यसन करणाऱ्या व्यक्तीमध्ये मेंदूमधील प्रतिक्रिया देण्याचा मार्ग हा सामान्य व्यक्तीमधील प्रतिक्रियेपेक्षा निश्चितच वेगळा असावा.

सर्पदंशाला कोणकोण बळी पडू शकते?

कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वावर कोणत्या व्यसनाच्या प्रभाव पडू शकतो याचे काही प्रकार दिसून येतात.

काही व्यक्तींमध्ये जन्मतःच तीव्र इच्छा असतात आणि ज्यांना अधिक रोमांच किंवा थरार अनुभवायची इच्छा असते. अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये काही उत्तेजित होण्याचा मूलतः स्वभाव असतो.

 

Indiatimes.com

 

ज्यांना सर्पदंशामुळे आनंद मिळतो अशा व्यक्तींमध्ये खालील गुण असतात.

१. इतर पदार्थांचे व्यसन करण्याची बऱ्याच वर्षांची सवय

२. अधिक थरार अनुभवण्याची सवय यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो.

३. जिथे सर्पांना देवतेचे स्थान दिले जाते अशी सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी

अत्युच्च आनंद मिळवण्यासाठी काही जण स्वतःहून सापाचा चावा करवून घेतात. ज्या लोकांमध्ये मनोविकृती असते ते लोकं अशा प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जातातच. त्यात काहीही आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही.

 

wiredbugs.com

 

मानसिक पातळीवरील अधिकाधिक उत्तेजित अवस्था प्राप्त करण्यासाठीच ते अशा प्रकारचे व्यसन करत असतात.

परंतु या प्रकारे मादक आणि घातक व्यसन करूनही याच्या जीवावर बेतणारा धोका कसा उद्भवला नाही? याचे उत्तर मात्र सध्या तरी गुलदस्त्यातच आहे….

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version