' ८ वर्षाच्या चिमुरड्याने थेट पाठ्यपुस्तकात जागा मिळवली, याची अभिमानास्पद गोष्ट! – InMarathi

८ वर्षाच्या चिमुरड्याने थेट पाठ्यपुस्तकात जागा मिळवली, याची अभिमानास्पद गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस आणि त्याची माणुसकी हा आजही संशोधनाचा विषय. आपली समाजमुल्ये,आपली संस्कृती ‘सत्यम शिवम सुंदरम’ यावर आधारीत आहे. त्यातील प्रामाणिकपणा हा तर मानवी स्वभावातील महत्वाचा पैलू.

काही लोक जीवनाकडे खूप साध्या सरळ मार्गाने बघतात आणि सरळमार्गी जीवन व्यतीत करतात. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही तसाच असतो.

त्यातल्यात्यात लहान मुले तर निरागस आणि संवेदनशील असतात. आपल्या या निरागसपणामुळे ती कधीकधी असे काही करून जातात की साऱ्या समाजाला त्यांच्या कृतीचे कौतुक करावेसे वाटते.

तेव्हा पुन्हा एकदा माणसाच्या माणुसनीतीचे महत्व कळून येते. काही माणसे खरच वेगळी असतात.

आजूबाजूला फक्त स्वतःपुरती जगणारी, फक्त स्वतःचा विचार करणारी माणसे वावरत असताना हे लोक मात्र दुसऱ्याला मदत करणे, आधार देणे, दुसऱ्याचे जगणे सुखकर बनवणे अशा गोष्टींना आपले कर्तव्य मानतात.

 

helping hands inmarathi
pulmonaryfibrosisnews.com

याच कर्तव्याची किंवा चांगल्या कर्माची फळे देखील चांगलीच मिळतात. मराठीत एक म्हण आहे,पेराल तसे उगवते. आपण जर चांगली कृती केली तर त्या कृतीचा परतावाही आपल्याला चांगलाच मिळतो.

कर्म ही मानवी जीवन प्रभावित करणारी गोष्ट आहे. काही लोकांच्या बाबतीत ही गोष्ट शब्दशः खरी होते आणि या मानवी मूल्यांचा चमत्कार पाहून मन सुखावून जाते.

आजही जगात माणुसकी टिकून आहे याचा आनंद होतो. याच प्रमाणिकपणामुळे तामिळनाडूच्या एरोडेमधील ८वर्षाचा एक मुलगा शाळेच्या पाठ्यपुस्तकातून झळकतो आहे.

आपल्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन केलेल्या चांगल्या कृतीचे पडसाद देखील चांगले उमटतात. आपली प्रामाणिकपणे केलेली एक कृती आज त्याला वेगळी ओळख देऊन गेली आणि इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात कहाणीच्या रूपाने ती मांडली गेली.

घडले असे की चिन्नसेमूर, तमिळनाडू इथल्या एका सरकारी शाळेत नुकतीच मधली सुट्टी झाली होती. सारी मुले खेळण्यासाठी वर्गाबाहेर पळाली.

 

honesty 2 inmarathi

 

इयत्ता दुसरीत शिकणारा एम.यासिन हा देखील आपल्या वर्गमित्रांबरोबर खेळण्यासाठी वर्गाबाहेर पळाला.

खेळता खेळता रस्त्यात पडलेली एक बॅग त्याला दिसली. बर्याच वेळापासून ती बॅग पडून असावी कदाचित. यासीनचे त्या बॅगेकडे लक्ष गेले. कुतूहलापोटी तो त्या बॅगेजवळ गेला. ती बॅग कोणाची असावी बरे?

ज्याची असेल त्याला ती परत मिळायला हवी. काही महत्वाचे बॅगेत असेल तर? असा विचार करून यासिन ती बॅग घेऊन त्याच्या वर्गशिक्षिका बाईंकडे गेला आणि त्याने ती बॅग त्यांच्याकडे सुपूर्त केली.

वर्गशिक्षिका बाईंनी ती बॅग उघडून पहिली असता त्या बॅगेत ५०,०००रुपयांची रोख रक्कम आढळून आली. बाईंना छोट्या यासीनचे कौतूक वाटले. आपल्या या विद्यार्थ्यांचा अभिमानही वाटला.

यासीनला जवळ घेऊन त्यांनी त्याला शाब्बासकी तर दिलीच पण नंतर जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधीक्षक शक्तीगणेशन यांच्याकडे ती रोख रक्कम असलेली बॅग जमा केली.

 

honesty 1 inmarathi
deccanchronicle.com

एव्हढे करून त्या थांबल्या नाहीत तर घडलेली हकीकत त्यांनी शक्तीगणेशन याना सांगितली. शक्तीगणेशन यांनीही यासीनचे कौतुक केले. लवकरच ही कहाणी प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोचली.

अनेक वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्या प्रतिनिधींनी यासीनच्या शाळेला भेट देवून आपल्या टीव्ही चॅनल, न्यूज चॅनल तसेच वृत्तपत्रातून यासीनच्या प्रमाणिकपणाची गोष्ट प्रसिद्ध केली. लहानगा यासीन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला.

समाजाच्या सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होवू लागले. यासीनची एक प्रामाणिक कृती त्याला कौतुकाच्या शिखरावर घेऊन गेली.

या कौतुकात भर पडली तेव्हा जेव्हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यापर्यंत यासीनच्या प्रामाणिकपणाची कथा पोचली व त्यांनी यासीनला भेटायची इच्छा व्यक्त केली.

 

rajnikanath inmarathi
indianexpress.com

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी यासीनला आपल्या घरी आमंत्रीत केले आणि त्याचे कौतुक केले. खरच काही लोक आयुष्याकडे सरळ स्वाभाविक दृष्टिकोनातून बघतात.

ते स्वतः तर आयुष्य सकारात्मक जगतातच पण त्याचबरोबर आपल्या वागण्यातून,कृतीतून आपल्या आजूबाजूच्याना एक ऊर्जा देतात.

रियल हिरो हे आपल्यासारखेच कुणीतरी सामान्य असतात पण त्यांच्यातली ही सकारात्मकता किंवा खरेपणा,त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची विचारपद्धती त्यांना आपल्यापेक्षा वेगळे बनवते.

असेही म्हणता येईल, की पाऊस पडताना इतर पक्षी पंख भिजतील म्हणून घरट्यात लपून बसतात. गरुड मात्र पाऊस पाडणाऱ्या ढगांच्याही वर जाऊन त्या पावसापासून आपला बचाव करतो.

गरूडाची हीच कृती त्याला इतर पक्षांपेक्षा वेगळे बनवते. इयत्ता दुसरीत शिकणारा यासीन भलेही शरीराने लहानगा असेल पण त्याच्या एका निरपेक्ष,निरागस कृतीने सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला आहे.

एक रियल हिरो ठरला आहे. यासीन ने नकळत आपल्या मित्रांसमोर प्रमाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे.

त्याच्या या प्रमाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ (SCERT) यांनी देखील या वर्षीच्या इयत्ता दुसरीच्या तमिळ भाषेच्या पुस्तकात यासीनची गोष्ट धड्याच्या रूपात समाविष्ट केली आहे.

 

scert inmarathi
Justdial

या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता दुसरीत शिकणारे सारे विद्यार्थी यासीनच्या प्रमाणिकपणाची गोष्ट आपल्या पुस्तकात वाचतील.

नवीन अभ्यासक्रमानुसार राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाने राज्यातील काही यशस्वी मुलांच्या गोष्टी इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यपुस्तकात घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार एम. यासीन याच्या प्रमाणिकपणाची ही कथा दुसरीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली गेली.

ज्यातून यासीनचा प्रामाणिकपणा इतर मुलांपर्यंत पोचेल. आपण नेहमीच चांगले काम करावे असे मुलांना शिकवतो. यासीनने ती शिकवण समजून तर घेतलीच पण प्रत्यक्ष वागण्यातूनही सिद्ध केली.

अशा कहाण्यांमधूनच आपल्या उगवत्या पिढीला संस्कारांची देणगी मिळेल. आपल्या पूर्वजांचे संस्कार,शिकवण पुढच्या पिढीत झिरपत राहील.

अशीच दुसरी एक माणुसकीची कथा घडली ज्यात एक बारा वर्षाच्या मुलाने पाण्याने भरलेल्या चेंबरमध्ये खेळता खेळता पडलेल्या छोट्या मुलीचे प्राण वाचवले.

माँस्को मध्ये घडलेल्या या घटनेत चेंबरच्या भोवती जमलेल्यानी आपले बेल्ट, दोऱ्या इ. साहित्याची दोरी करून ती त्या मुलाच्या पायाला बांधली व त्यांनी त्या मुलाला चेंबरमध्ये उतरवले आणि चेंबरमध्ये अडकलेल्या चिमुरडीला खेचून वर काढले.

या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यावर सर्वच स्तरातून या मुलावर कौतुकाचा वर्षाव झाला.

तर कॅलिफोर्नियातील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या रायन क्रीकपँट्रीक या ९ वर्षाच्या चिमुरड्याने उन्हाळी सुट्टीत काम करून जमवलेल्या पॉकेतमनीतून आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना मेजवानी दिली.

 

Food Share Inmarathi
CBS News

आपले सारे मित्रमैत्रीण एकत्र यावेत व त्यांनी आनंद साजरा करावा एवढीच रायनची त्यामागे भावना होती.

आपली पुढची पिढी यांत्रिक आणि संवेदनशून्य होत चाललीय. माणुसकी,प्रामाणिकपणा,मदत या साऱ्या मूल्यांपासून लांब चाललीय अशी आपण तक्रार करतो.

तेव्हा एम. यासीन,रायन किंवा मास्कोमधील तो बारा वर्षांचा मुलगा यांची उदाहरणे पहिली की अजूनही या सगळ्या गोष्टी अजूनही कुठे ना कुठे जिवंत आहेत हे जाणवते आणि या लहानग्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या आईवडिलांना, शिक्षकांना सलाम करावासा वाटतो.

ज्यांनी हे संस्कार फक्त सांभाळले नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीत रुजवले देखील आहेत. अशी या मुलांसारखी व्यक्तिमत्वेच आपले रियल हिरो आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?