' ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं काय माहित होतं? – InMarathi

ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं काय माहित होतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

ट्रू काॅलरला तुमचं नांव इतकं परफेक्ट कसं कळतं?

निनावी नंबरवरुन एखादा फोन आला… सरप्राइज… दुसऱ्या नंबरवरुन फोन करुन चिडवायचे…रडवायचे…घाबरायचे दिवस आठवतात? आता होतं का तसं? खूपदा नाही.

फोनची रिंग वाजली की नंबर आणि त्यासोबतच येतं ते फोन करणाऱ्या माणसाचं नांव कधी कधी फोटोही.. आता विसरा सरप्राईज द्यायचं.. कुणाला तरी निनावी फोन करुन त्रास द्यायचं.. हे शक्य झालं आहे ते ट्रू काॅलरमुळं!

आश्चर्य म्हणजे ही माहिती चूक नसते. आज आपण ही माहिती इतकी कशी परफेक्ट असते हे माहीत करुन घेऊ.

 

truecaller inmarathi

 

साधारणपणे पाच वर्षांपूर्वी ही सुविधा सुरु झाली ती दोन इंजिनीअर्सना तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी वेगळं. काहीतरी हटके करायचं होतं. तर या दोघांनी जे तंत्रज्ञान विकसित केले ते तंत्रज्ञान म्हणजे लोकांना वरदानच ठरले आहे.

लोक विश्वासानं ते तंत्रज्ञान वापरत आहेत. आज ते दोघेही एक कंपनी म्हणून ओळखले जातात ज्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातून फोन येतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

लोकांना जगाच्या पसाऱ्यात हवी असलेली माहिती बिनचूक दिली जाते. ती कंपनी देत असलेली सेवा आता ट्रू काॅलर या नावाने प्रसिद्ध आहे.

आता करोडो लोक स्मार्टफोन वापरतात. त्यांना येणारे नाना तऱ्हेचे फोन ते फेक आहेत, स्पॅम आहेत का हे सर्व केवळ ट्रू काॅलर वापरत असल्यामुळे समजते. आणि विशेष म्हणजे हे काम बिनचूक आहे.

 

spam calls inmarathi

 

मग सामान्य माणसाला पडतो तो प्रश्न. कसं चालतं हे ट्रू काॅलरचे काम? ते इतके बिनचूक कसे असते? याचे अजून कोणते फीचर्स आहेत?

कसं करतो ट्रू काॅलर आपलं काम चोख?

ट्रू काॅलरचं काम साध्या सोप्या पद्धतीने चालतं. तुमच्या फोनबुकमधला डेटा द्या आणि आमच्याकडून माहीती घ्या!

जेंव्हा तुम्ही ट्रू काॅलर अॅप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करता त्याचवेळी तुम्ही त्या एका मोठ्या गटात सामील होता ज्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये ट्रू काॅलर अॅप घेतलं आहे.

तुम्ही तेंव्हा ट्रू काॅलरचे वापरकर्ते बनता आणि तेंव्हा ट्रू काॅलर तुम्ही मान्य केलेल्या अटींचा भाग म्हणून तुमच्या फोनमधील फोन नंबर्सचा डाटा अॅक्सेस करुन घेतो. ही फोन नंबर्सची यादी कंपनीच्या सर्व्हरकडे पाठवली जाते.

 

truecaller 1 inmarathi

 

बऱ्याच चाचण्या आणि प्रोग्रॅमचे अलगोरिदम पार करत हा डाटा जे जे ट्रू काॅलर अॅप वापरतात त्या वापरकर्त्यांना प्राप्त होतो.

यातील सर्वात महत्त्वाचा भाग असा की, ट्रू काॅलर फक्त फेसबुक, जी मेल, आणि याहू यापैकी एकही नेटवर्क तुम्ही वापरत असाल तरच तुमच्या स्मार्टफोनवर काम करते.

जर या तीन नेटवर्क शिवाय चौथं नेटवर्क तुम्ही वापरत असाल तर ट्रू काॅलर तुमच्या फोनवर अॅक्सेस करता येत नाही.

याचं कारण म्हणजे या तीन नेटवर्कींग साईट्सचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो कारण या तिन्ही साईट्सवर फोन नंबरचा वापर केला जातो आणि तो डाटाबेस विनासायास घेणं ट्रू काॅलरला शक्य होतं.

कारण त्यावर तुमचे फोन नंबर, मेल आयडी, इतर काॅन्टॅक्ट नंबर हे सुरक्षितपणे ट्रू काॅलरला अपलोड करणं सहज शक्य होते. यातील प्रत्येक नंबर ट्रू काॅलर सर्व्हरकडे पाठवतो आणि तो शोधणं किंवा ओळखून ठेवणं हे सोपं जातं.

 

mobile-inmarathi

 

त्यामुळे एखादा माणूस जरी ट्रू काॅलर वापरत असेल तर त्याचा भक्कम डाटाबेस ट्रू काॅलरला अपलोड होतो. इतकंच नव्हे तर त्या डाटाबेसमुळं तुम्ही कोणत्याही माणसाला फोन केला किंवा तुम्हाला कुणीही फोन केला तर त्याचं नांव काहीवेळा फोटोही दिसतो.

तुम्ही मेल आयडी वर लावलेला फोटोच खूपदा या अॅक्सेसवरुन दिसत असतो. हे त्याचं कारण वरवर सोपी साधी दिसणारी गोष्ट किती गुंतागुंतीची असते.

पण आपण वापरकर्ते असल्यामुळे आपल्याकडं येतात ती केवळ दोनच टोकं… फोन करा…नांव पहा!!!! पण त्यात किती प्रक्रिया होत असतात हे आपल्याला माहीत नसते. ट्रू काॅलर वापरत असताना मिळणाऱ्या सुविधा –

काॅल करणाऱ्या माणसाचं नांव समजतं हे जितकं यात आहे तितक्याच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातील काही.

 

१. मोबाईल फोनचे लोकेशन शेअर करणे.

आपल्याला येणाऱ्या फोनवरुन पलिकडील व्यक्तीचं नाव दिसतंच पण त्यांचं ठिकाणही समजतं.

 

Location can be tracked even when GPS is off.Inmarathi

२. प्रोफाईल पहाणारे लोक –

किती लोकांनी आपलं प्रोफाईल पाहीले ही माहीती ट्रू काॅलर आपल्याला आपल्या मेलबाॅक्सला पाठवते. त्यामुळे आपलं प्रोफाईल कुणी पाहीलं आहे याची बिनचूक माहीती मिळते. त्यांचं ट्रॅकिंग ठेवणं शक्य होतं.

 

ethical-hackers-inmarathi

 

३. काॅल रेकॉर्ड-

आपण येणारे सर्व फोन, केलेले फोन यांचं रेकॉर्ड ट्रू काॅलर मध्ये ठेवलेलं रहातं. त्यामुळं एखादा काॅल पुन्हा करताना शोधायला वेळ लागत नाही.

 

truecaller 3 inmarathi

 

४. ब्लाॅक सुविधा-

बरेचसे निरुपयोगी, वेळखाऊ फोन नंबर असतात जे आपल्या कामात अडथळे निर्माण करु शकतात. ते‌ नंबर ब्लाॅकलिस्टला टाकले तर ते फोन आपल्याला न येऊ देण्याची सोय ट्रू काॅलरने आपल्याला दिली आहे.

 

truecaller 2 inmarathi

 

इतकेच नव्हे तर खूप युजर्सनी एखादा नंबर स्पॅम म्हणजे हानिकारक आहे असं सांगितलं असेल तर त्या फोन सोबत तीही सूचना आपल्याला ट्रू काॅलर देतो. त्यावरुन येणारा निनावी फोन घ्यायचा की नाही ते आपण ठरवू शकतो.

मात्र प्रत्येक गोष्टीत जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही असतात. ट्रू काॅलरचे काही तोटे आहेत ते म्हणजे-

१. ट्रू काॅलर सर्व भागात काम करु शकतो असे नाही.

२. ट्रू काॅलरचे काम चालावे यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय ट्रू काॅलर सेवा पुरवू शकत नाही.

३. दिलेल्या माहीतीच्या सुरक्षेची हमी नाही.

४. प्रायव्हसी पॉलिसीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.

 

privacy-inmarathi

 

आता अजून एक फीचर आहे या अॅपचे, की तुम्ही तुमचा नंबर डाटाबेसमधून हटवू शकता. त्यासाठी एका विशिष्ट लिंकवर जाऊन नंबर प्रायव्हेट ठेवण्याचं कारण दिलं तर तुमचा नंबर ट्रू काॅलर शेअर करत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?