Site icon InMarathi

केरळातली शाळकरी मुले स्वतःची आयटी कंपनी सुरू करून संदेश देतायत..”आमच्यासारखे मोठे व्हा!”

kvups school featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

 

===

एखादी आयटी कंपनी म्हटलं की डोळ्यांसमोर नावं येतात ती विप्रो, टीसीएस, इन्फोसिस अशा मोठ्या कंपन्यांची.

खुप मध्यम आणि छोट्या कंपन्या देखील या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसे बरेच विस्तारित क्षेत्र आहे हे. वर सांगितलेल्या मोठ्या कंपन्यांचे जाळे विदेशात देखील पसरलेले आहे.

 

MBA Skool

आता अशा कंपन्यांचे सीईओ म्हटले की सुंदर पिचई, नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी, नंदन निलेकणी अशी मातब्बर नावे नजरेसमोर येतात. अझीम प्रेमजी आणि मूर्ती यांनी सूत्र पुढच्यांच्या हाती सोपवली आहेत.

ही सगळीच मंडळी सिनिअर सिटीझन आहेत किंवा होऊ घातलेली आहेत. समजा मी सांगितलं की एक अशी आयटी कंपनी आहे जिची सीईओ एक तेरा वर्षांची शालेय विद्यार्थिनी आहे.

ठेवाल विश्वास? नाही ना?

पण खरंच अशी एक आयटी कंपनी अस्तित्वात आहे जी शालेय विद्यार्थी चालवतात आणि त्यांची सीईओ आहे केवळ १३ वर्षांची हलाला.

तशी छोटीच आहे ही कंपनी. पण तिच्या कामांचा आवाका आणि ती चालविणाऱ्या विद्यार्थ्यांचा जोश पाहिला तर खरंच होश उडून जातील.
आपण मुलांना नेहमीच थोडं ‘अंडरएस्टीमेट’ करतो.

 

newindianexpress.com

त्यांना काय जमणार? गोंधळ करून ठेवतील.आपल्यालाच सर्व निस्तरावे लागेल.अशी पालकांची समजूत असते.

मुलांनी विद्यार्थी दशेत फक्त अभ्यास करावा आणि चांगले मार्क मिळवून पुढे चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली जाते.

पण हीच ‘चांगली नोकरी’ तुमच्या पालकाला विद्यार्थी दशेतच मिळाली तर ही आश्चर्याचीच गोष्ट असणार नाही का?

केरळच्या एका शाळेतील मुलांकडे अशीच संधी चालून आली आणि ती मुलं चक्क एक आयटी कंपनी चालवू लागली.

बघुया कशी ही संधी मिळाली ते. केरळच्या तिरुअनंतपुरम येथील KVUPS या शाळेने खुप हुशार विद्यार्थी तयार केले आहेत. जणु गुणवंत विद्यार्थ्यांची ही खाणच आहे. या विद्यार्थ्यांनी खुप कर्तृत्व गाजवले आहे.

याच शाळेच्या काही गुणवंत विद्यार्थ्यांनी एकत्र येत चक्क एका आयटी फर्मची स्थापना केली आणि यशस्वीपणे चालवत देखील आहेत. जगात नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे.

 

youtube.com

कॉम्प्युटरवर काम करणारी मंडळी हे तंत्रज्ञान पटकन शिकून घेत आहेत पण एक मोठा वर्ग या नवीन तंत्रज्ञानापासून दूर आहे.अशा वर्गास वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या कंपनीकडून पुरवल्या जातात. या कंपनीचे नाव आहे ग्रोलिअस.

काय खास आहे या नावात?

Grolius हे Gro Like Us याचे संक्षिप्त रूप आहे.  “आमच्या सारखे मोठे व्हा”. असाच जणु संदेश ही कंपनी देत असते. या सर्वाची सुरवात १८ महिन्यांपूर्वी झाली होती.

शाळेला नवनवीन प्रयोग राबविण्यात खुपच रस होता आणि शाळेचा आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता.

आयटी क्षेत्रातील काही तज्ञ मंडळीनी शाळेच्या प्रबंधक मंडळींना हे पटवून दिले होते की विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला.

तर हे विद्यार्थी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या पायावर उभे राहून आपले शिक्षण पूर्ण करू शकतात आणि इतर विद्यार्थ्यांत या आयटी तंत्रज्ञानाची ओळख निर्माण करून देतील आणि या कामाचा अनुभव त्यांना पुढे उपयोग होईल.

सुदैवाने शाळेच्या समितीला हा मुद्दा पटला व लवकरच अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ए. एम. अनास या Talrop आयटी फर्मच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना १४ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त रोज ४५ मिनिटांचा वेळ वेब डिझायनिंगसाठी राखून ठेवण्यात आला.

अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या विद्यार्थ्यांनी केवळ १४ दिवसात वेब डिझायनिंगचे तंत्र शिकून घेतले.

प्रोग्रामिंग आणि कोडींग शिकून घेतल्यावर ही मुलं आता वेबसाईट बनवून देण्याचे काम करतात आणि कामाच्या स्वरूपानुसार ₹२,००० ते ₹१०,००० इतका पॉकेटमनी मिळवतात. अरे हो यांच्या सीईओ विषयी सांगायचेच राहिले.

 

Schools

या कंपनीची सीईओ आहे हलीला फातिमा. जी गेल्याच वर्षी सातवी पास झाली. आठवीच्या वर्गासाठी ती दुसऱ्या शाळेत गेलीय पण तरीही ती Grolius कंपनीचे काम बघते.

डोमेन सेट करून देणे, वेब साईट डिझाईन करणे आणि डेव्हलप करणे, इत्यादी सर्व सेवा पुरवण्यात तिचा देखील सहभाग आहेच.

तिच्या मते ती तिचा मोकळा वेळ या कामासाठी देऊ शकते आणि यात नवनवीन गोष्टी शिकून लोकांना त्यांना हव्या तशा वेबसाईट डिझाईन करून देऊ शकते.

जिथे आयटी इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना देखील काम करणे जड जाते किंवा त्यांच्या पगाराच्या अपेक्षा जास्त असतात त्यांच्या मानाने शालेय विद्यार्थ्यांच्या पगाराच्या अपेक्षा काहीच नसतात.

त्यांच्यावर कर्ज नसते. जबाबदाऱ्या काहीच नसतात त्यामुळे अभ्यास करून झाल्यावर ते यात व्यवस्थित लक्ष घालू शकतात.त्यांना पुढे जाऊन आयटी तज्ञ बनता येईल किंवा दुसऱ्या क्षेत्रात ते गेले तरी तेथे ते इथला अनुभव उपयोगात आणून चांगले कार्य करू शकतात.

 

kvups.in

अनास यांच्या मते त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील ते या फर्मचे काम बघू शकतात. आता नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे.

‘ब्लॉकचेन’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण त्यांना देणे बाकी आहे. ते देखील त्यांना देण्यात येईल.

आज हे कुशाग्र विद्यार्थी आयटी संबंधित सर्व सेवा देत आहेत. इतकेच नाही तर कॉलेजमध्ये जाऊन या संबंधी लेक्चर्स देतात तसेच वर्कशॉप्स घेतात.

पुढे जाऊन Grolius कंपनी मोठी होईल.  KVUPS शाळेतून आणखी काही विद्यार्थ्यांची टीम तयार होईल. लक्षात ठेवा,तुम्ही देखील आपल्या मुलांवर विश्वास ठेवा.त्यांच्यातील टॅलेंट वेळीच ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या.

 

E-Kerala.org

भविष्यात अशीच एखादी कंपनी तुमचा पाल्य उभा करू शकतो. ‘ग्रो लाईक अस’ हे एक चांगले उदाहरण केरळच्या मुलांनी घालून दिले आहे.
भारताच्या इतर भागातून उद्या आणखी अशा कंपन्या उभ्या राहिल्या तर अजिबात आश्चर्य वाटायला नको.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version