आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
सध्या भारतातून शेजारच्या देशापर्यंत रॉड ट्रीप काढायची म्हटली की त्यात बरेच अडथळे येतात. त्यामुळे सहसा प्लान बनवून देखील तो नीट पूर्णत्वास जाईल की नाही याची शाश्वती नसते. म्हणून इंटरनॅशनल रोडट्रिप्स तितक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात नाहीत. जर तुम्हाला देखील अशी एखादी मोठी इंटरनॅशनल रोडट्रीप करायची असेल आणि अजूनही तसा योग जुळला नसेल तर तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे समजा कारण आता आम्ही जी बातमी सांगणार आहोत जी ऐकल्यावर रोडट्रीप प्रेमी चक्क उड्या मारतील.
भारत, थायलँड आणि म्यानमार यांना जोडणारा १४०० किलोमीटर लांबीचा महामार्ग निर्माण केला जाणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण-पूर्व देशांशी भारत थेट जोडला जाईल. म्हणजे भारतातून थेट थायलँड आणि म्यानमार रॉड ट्रीप करता येईल आहे की नाही आनंदाची गोष्ट?
थायलँडमधील भारताचे दूत भगवंत सिंह बिश्नोई यांच्या माहितीनुसार,
म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या ७३ पुलांच्या मदतीने हा महामार्ग बनवण्यात येणार आहे. एकूण १८ महिन्यांचा कालावधी या महामार्गासाठी जाणार असून, त्यानंतर महामार्ग भारत, थायलँड आणि म्यानमार या तिन्ही देशांसाठी खुला केला जाणार आहे. भारत आणि थायलँडमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक साम्य आहेत. या महामार्गामुळे व्यापार, पर्यटनासोबत अन्य गोष्टीही जोडल्या जातील. येणाऱ्या काळात चेन्नईलाही हा महामार्ग जोडला जाईल.
भारताच्या मणिपूर राज्यातील मोरेहहून म्यानमारच्या तामू शहरातून थायलँडच्या माई सोट जिल्ह्यापर्यंत पोहोचेल. या महामार्गासाठी तिन्ही देशांमध्ये मोटर व्हेईकल अॅग्रीमेंटवर चर्चा होत आहे.
भारत आणि थायलँडमधील व्यापारसंबंध कमालीचे दृढ आहेत. शिवाय, दरवर्षी १० लाख भारतीय थायलंडमध्ये पर्यटनासाठी जातात. त्यामुळे सर्व दृष्टीने भारत आणि थायलंड एकमेकांशी जोडले जाणे फायद्याचे आहे.
हा महामार्ग एकदा का तयार झाला की एक Ultimate Roadtrip भटक्यांच्या नशिबी येणार हे मात्र नक्की !
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi