आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लता दीदींना कोण नाही ओळखत! अख्ख्या जगामध्ये गानसम्राज्ञी म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवजाची जादू केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशी नागरिकांना देखील तितकीच भुरळ घालते. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गाजवलेला तो काल आणि त्या काळातली गाणी आजही हवीहवीशी वाटतात.
बॉलीवूड चित्रपटांतील कित्येक गाणी त्यांच्या गोड गळ्याने अजरामर झाली आणि त्यांची ख्याती सातासमुद्रापार गेली. आजही ती गाणी परदेशात ऐकली जातात आणि त्या गाण्यांवर तितकंच प्रेम केलं जातं हे विशेष!
लता दीदींच्या आवाजाने प्रसिद्धीला पावलेलं असंच एक गाणं म्हणजे ‘कलियों का चमन जब बनता है’ !
स्रोत
या गाण्याने इतकं धुमाकूळ घातला होता की लाहोर पासून लंडन पर्यंत हे गाणं प्रत्येकाच्या ओठी होतं आणि ३६ वर्षांनी देखील त्या गाण्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही हे दर्शवणारा एक प्रसंग लंडनमध्ये घडला.
या प्रसंगाचे चित्रीकरण करून तो व्हिडियो युट्युबवर टाक्यात आला आणि जगभर प्रसिद्धीस पावला.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
लंडनमध्ये एका सार्वजनिक बसमधील ड्रायव्हरने बस चालवताना अचानक लता ताईंच्या आवाजातील ‘कलियों का चमन जब बनता है’ हे गाणं गुणगुणायला सुरुवात केली.
या बस चालकाला इतर साथीदारांनी वाद्यांच्या सहाय्याने साथ दिली आणि बस चालकाला अजूनच हुरूप आला. पुढील काही क्षणातचं बस मधल्या प्रवाश्यांनी देखील त्याचा आवाजाला दाद देत बसमध्येच ठेका धरला.
हा सर्व प्रसंग या व्हिडियोमध्ये कैद आहे
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.