आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
लेखाचं शीर्षक वाचून अनेक जण आश्चर्यचकित झाले असतील. स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीला एके-47 म्हणजे अतिशयोक्ती वाटते, नाही?! काहींच्या मनात विचार आला असेल की खेळण्यातल्या बंदूक वगैरे असतील. तर मित्र हो तसं ही नाहीये. खरंच पाकिस्तानमध्ये एक मार्केट आहे जेथे अतिशय स्वस्त किंमतीला शस्त्र मिळतात. म्हणजे धमाका करण्यासारखं काहीही हवं असेल तर त्यासाठी सर्वात स्वस्त मार्केट म्हणजे पाकिस्तान मधलं “हे” मार्केट असा उल्लेख केला जातो. पाकिस्तानमधील या मार्केटचं नाव आहे ‘दाराअदमखेल आर्म्स मार्केट’!
पाकिस्तानमधील दाराअदमखेल भाग शस्त्रास्त्रांसोबत, दारूगोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर भागात दाराअदमखेल पेशावरपासून फक्त ३५ किलोमीटर दूर वसलेले शहर आहे.
या भागात स्मार्टफोनपेक्षा मशिनगन स्वस्त किमतीत मिळते.पाकिस्तानातील हे शहर शस्त्रास्त्रांचा काळाबाजार, आणि दारूगोळाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
या शहरात चोरीच्या शस्त्रास्त्रांसह नव्या शस्त्रांची दुकानेही पाहायला मिळतात. दारूगोळ्याच्या साठ्यामुळे या भागात पोलीस जाण्यास घाबरतात.
या शहरात ४५०० रुपयांमध्ये MP 5 बंदूक सहज मिळू शकते. तसेच ८२५० रुपयांना AK-47 सारख्या मशिनगनदेखील सहज उपलब्ध आहेत.
या शहरात शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी, जहाजामधील अडगळीतील सामान आणि जुन्या सामानाचा वापर केला जातो. येथे शस्त्रास्त्रे बनवणारे कुशल कारागिर आहेत, आणि हे कारागिर कोणत्याही धातूपासून शस्त्रास्त्रांची निर्मिती करू शकतात.
….असं हे विध्वंसकारी मार्केट पाकिस्तानमध्ये आहे आणि पाकिस्तान म्हणतं आम्ही दहशतवादाला थारा देत नाही. अजबच दावा आहे बुवा!
—
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi