Site icon InMarathi

डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..

attacks on doctors featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कोलकाता येथील एका रुग्णालयात डॉक्टरांवर पेशंटच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यांमुळे आज देशभरात तणावाचे वातावरण निर्माण  झाले आहे. सर्वत्र डॉक्टरांना संप पुकारला असून, डॉक्टरांना संरक्षण प्रदान करण्याच्या मागणी केली जात आहे.

पश्चिम बंगाल मधील स्थिती तर अजून विस्कळीत झाली असून तिथे आता आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर गेली आहे. अनेक डॉक्टर्स संपावर गेल्याने आणि यावर प्रशासनाला कुठलाच तोडगा काढता न आल्याने परिस्थिती चिघळली असून यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.

 

Reuters India

आज आपल्या जीवाचे रक्षण करणाऱ्या डॉक्टर्सवर फक्त भारतातंच हल्ले होत आहेत असं नाही, जगभरात ह्या हल्ल्यांची संख्या वाढत आहे. अगदी अमेरिकेतहि अश्या प्रकारचे हल्ले होत आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन या संदर्भातला अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. विकसनशील देशात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

ह्या अश्या हल्ल्यां मागची कारणं ती  नेमकी कोणती ते आज  आपण जाणून घेऊयात.

१) डॉक्टरांची दैवी प्रतिमा

डॉक्टरांना आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो परंतु ते देव नसून मनुष्यच आहे हेच आजचे पेशंट्स आणि त्यांचे नातेवकाईक समजून घ्यायला तयार नसतात.

 

 

डॉक्टर कडे नेलं का आपला नातेवाईक बरा होईल ह्या अपेक्षांचं ओझं डॉक्टरांवर लादलं जातं आणि तसं न घडल्यास अश्याप्रकारचे हल्ले घडून येत असतात. त्यामुळे डॉक्टर हा देव नाही तर माणूसच आहे, हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे.

२) डॉक्टरांची वर्तवणूक

डॉक्टरांचा व्यवहार हा पेशंटशी कधीही मृदू आणि समजून घेणारा असला पाहिजे. परंतु बरेच डॉक्टर्स हे आपल्या कामाच्या तणावामुळे म्हणा अथवा मिळालेल्या प्रचंड यशामुळे, पेशंटला अगदी तुच्छता दर्शक वागणूक देतात.

 

 

पेशंटच्या नातेवाईकांची भावना समजून न घेता, त्यांचशी फटकून वागतात, त्यामुळे आधीच तणावात असलेले पेशंटचे नातेवाईक रागावतात आणि अश्या घटना घडतात.

३) आरोग्यविषयक निरक्षरता आणि पेशंटशी असलेला विसंवाद

आज भारतात आरोग्यविषयक अनेक गैरसमज प्रचलित आहे. अनेक रोगांविषयी अत्यंत चुकीचं आकलन आणि उपचार यामुळे बहुतांश रुग्ण दगावतात. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरप्रतीची द्वेषभावना वाढीस लागून अश्या प्रकारचे हल्ले घडून येत असतात.

खरंतर अश्या  वेळी डॉक्टरांनी कुठलीही रिस्क घेण्याचं टाळलं पाहिजे पण जर  अति इमर्जन्सी केस असेल तर डॉक्टरांना काही पावलं उउचलणं आवश्यक असतं.

 

drugfreeguide.over-blog.com

अश्यावेळी पेशंटच्या नातेवाईकांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगणे आणि योग्य ती माहिती देणे अपेक्षित असते परंतु असे न झाल्याने अश्याप्रकारचे प्रसंग उद्भवू शकतात.

४) आरोग्यासाठी मोजावी लागणारी किंमत

आज आरोग्य जपण्याची किंमत वाढली आहे. एकवेळ कोर्टाची पायरी चढलेली ठीक पण दवाखान्याची नको! अशी मानसिकता बळावत चालली आहे. आज साध्या हेल्थ चेक अप साठी लोकांना प्रचंड पैसे मोजावे लागतात.

जेवढा मोठा आजार तेवढा मोठा खर्च, अशी अनेक लोक आहेत ज्यांना हा खर्च परवडत नाही.

 

Scroll.in

बऱ्याचदा लोकांना हॉस्पिटलमध्ये अनावश्यक गोष्टींसाठी खर्च करण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे पेशंटच्या कुटुंबियांच्या व नातलगांच्या मनात असंतोष असतो.

जर अमाप खर्च करून देखील काही परिणाम दिसून आला नाही  तेव्हा अश्या प्रकारचे वाद उदभवतात आणि परस्थिती हाताबाहेर जाऊन तिला हिंसक  वळण लागते.

५) झुंडशाही

जेव्हा एखादा पेशंट क्रिटिकल असतो, तेव्हा त्याचा मोठा गोतावळा त्याठिकाणी उपस्थित असतो. अश्यापरिस्थितीत डॉक्टरांनी निवडक नातेवाईक वगळता इतरांना परत जाणे सांगने हिताचे असते.

 

news18.com

जर पेशंटशी जमावाच्या भावना जोडलेल्या असतील तर मात्र हे गरजेचेच असते. ज्यावेळी ह्या जमावाला एखाद्या गोष्टीचा राग येतो त्यावेळी हा जमाव काही ऐकण्याचा मनस्थितीत मुळातच नसतो, मग ह्या सारख्या घटना घडतात.

झुंड हा बेबंद असतो व त्यावर कोणाचाच कुठल्याही प्रकारचा ताबा नसतो.

त्याला रोखणे अशक्य होऊन बसते आणि तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, त्यामुळे योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. पेशंटच्या परिस्थितीबदल कुठलाही दावा करणे डॉक्टरांनी टाळलं पाहिजे.

६) सुरक्षेचा अभाव

भारत देशातील सरकारी इस्पितळात डॉक्टरांची खासकरून ज्युनिअर डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

जेव्हा कधी जमाव होतो त्यावेळी त्यांना बाहेर काढणायसाठी सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची उपस्थिती अपेक्षित असते, परंतु बहुतांश ठिकाणी सुरक्षेविषयी निष्काळजीचे धोरण बाळगल्यामुळे हल्ले घडताता आणि डॉक्टरांना मारहाण सहन करावी लागते.

 

The Indian Expres

त्यात ज्युनिअर डॉक्टरांना पेशंटच्या परिस्थितीबद्द्दल पूर्ण कल्पना नसल्याने त्यांच्या व पेशंटच्या नातेवाईकात विसंवाद होऊन, अश्या प्रकारच्या घटना अजून मोठ्या प्रमाणावर घडून येतात.

परिस्थिती चिघळते आणि त्यातून मग हल्ले होतात. त्यामुळे डॉक्टरांची सुरक्षा हि प्राथमिकता असली पाहिजे. त्यांना योग्यती सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली पाहिजे.

७) कायदेशीर त्रुटी

डॉक्टरांवर झुंडीने होणाऱ्या हल्ल्यांना इतर झुंडीने होणाऱ्या हल्ल्यांमध्ये फरक आहे, त्यामुळे याला सामान्य घटनांप्रमाणे ट्रीट केलं गेल्याने, अनेकदा योग्य तो न्याय ही होत नाही आणि जरब हि बसत नाही.

यासाठीच एका सशक्त अश्या कायदा नियमाची गरज आहे. ह्या कायद्यांमुळे दोषींवर योग्य ती कारवाई होऊ शकेल आणि पुढे ह्या प्रकारचे हल्ले टाळणे शक्य होऊ शकेल.

आज देशभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांची वाढती संख्या बघता, लवकरात लवकर कायदा बनवणे आणि आरोपीना कठोर शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे.

jksanchezlaw.com

 

डॉक्टरांवर होणारे हल्ले हे ज्या मानसिकतेतुन होत आहे ती मानसिकता समजून घेऊन, डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकात सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, या कडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.

जर वैमनस्यातून अश्या घटना पुढे हि घडत राहिल्या आणि कुठलेही अपेक्षित उपाययोजन शक्य होऊ शकले नाही तर डॉक्टर- पेशंट च्या नात्याला गालबोट लागेलच पण देशाच्या आरोग्यव्यवस्थेला देखील याचा जबर फटका बसल्याशिवाय राहणार नाही.

जगभरात ह्या समस्येवर कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय स्तरावर अनेक परिणामकारक उपाययोजना राबविल्या जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी काही गाईडलाईन्स आखून दिल्या आहेत, त्यांचं पालन होणं गरजेचं आहे, तसं होऊ शकल्यास ह्या समस्येवर तोडगा शक्य होईल. शासन हे किती गांभीर्याने घेते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version