Site icon InMarathi

दिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का?

disha patani featured

BookMyShow

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“तू आता है सीने मे, जब जब सांसे भरती हूं”

ह्या गाण्यातला गोड चेहरा आठवतो? आता वेगळं आठवण्यासाठी आधी तो चेहरा विसरायला हवा म्हणा. पण त्याची जादूच अशी आहे की तिला विसरणं तरुणाईला अशक्य झालं आहे. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते.

सप्टेंबर 2016 ला तिचा धोनी द अनटोल्ड स्टोरी रिलीज झाला आणि बॉलीवूड ला नवा प्रॉमिसिंग चेहरा मिळाला… दिशा पटानी! आणि आज काय आहे माहीत आहे?

आज दिशाचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत चित्रपट सृष्टीतला दिशाचा प्रेरक प्रवास.

तुम्हाला माहिती आहे का, ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे फक्त पाचशे रुपये होते. खिशात केवळ पाचशे आणि समोर अफाट मुंबई नगरी. कसा निभाव लागणार ?

 

BizAsia

मात्र तिचा सकारात्मक दृष्टीकोन कामी आला आणि तिने जाहिरातींसाठी ऑडिशन देण्याचा सपाटा लावला.

कारण इथे टिकून राहायचे तर कमाई करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिला ना कोणी गॉडफादर होते ना कोणी स्टार नातेवाईक ना ती स्वतः स्टार कीड होती. त्यामुळे संघर्षाला पर्याय नव्हता.

शिवाय ती शिक्षण अर्धवट सोडून आली होती आणि तिने घरच्यांकडून आर्थिक मदतही घेतली नव्हती त्यामुळे तिची आर्थिक बाजू चांगलीच कमकुवत होती. करियर तर करायचे होतेच पण त्या आधी, रोजच्या गरजा, घराचे भाडे भरणे आवश्यक होते.

त्यामुळे तिने आपला खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम करायला सुरुवात केली. तिला त्यातून पैसे मिळत असले तरी अभिनयाचा आनंद काही मिळत नव्हता. नुसतंच पाट्या टाकणं चाललं होतं.

दिवसभर मरमर काम करणे आणि दमून भागून घरी येऊन ताणून देणे एवढंच तिचं आयुष्य झालं होतं.

आपण कशासाठी आलो आणि काय करतोय असा प्रश्न आता दिशाला वारंवार पडायला लागला आणि तेवढ्यात तिला तिच्या आयुष्याची दिशा मिळाली ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी‘ च्या रूपाने.

 

DNA India

ह्या चित्रपटातल्या आपल्या एवढ्याशा भूमिकेने तिने संपूर्ण इंडस्ट्रीला आपली दाखल घेण्यास भाग पाडलं. हा चित्रपट दिशासाठी आयुष्य बदलणारा ठरला.

ह्या चित्रपटात तिची फारशी मोठी भूमिका नव्हती.

त्यात तिने महेंद्रसिंग धोनीची प्रेमिका प्रियंका झा हिची भूमिका साकारली होती, जी एका दुर्दैवी कार दुर्घटनेत मरण पावते.

ह्या चित्रपटात धोनी ची भूमिका सुशांत सिंग राजपूत ने साकारली होती आणि फॉक्स स्टार स्टुडिओ ची निर्मिती असणार्‍या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते नीरज पांडे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाला आणि तुफान हीट झाला.

हे होतं दिशाचं बॉलीवूड पदार्पण. मात्र दिशाने तत्पूर्वीच चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं होतं. २०१५ मध्ये वरुण तेज बरोबर दिशाने तेलुगू चित्रपट ‘लोफर’ मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

 

telugucinema.com

त्याच्या पुढच्याच वर्षी दिशा ‘आफरीन’ नावच्या टी सिरिजच्या एका म्युजीक विडिओमध्ये टायगर श्रॉफ सोबत दिसली. त्या नंतर तिने जॅकी चॅन सोबत ‘कुंग फु योगा’ हा चित्रपट केला आणि आपले अभिनय कौशल्य वादातीत आहे हे सिद्ध केले.

नंतर आला तिचा बागी २ चित्रपट. हा चित्रपट जगभरात 30 मार्च 2018 रोजी रिलीझ झाला आणि चित्रपटाने अंदाजे 243 कोटींची कमाई केली.

दिशाला आपल्या संघर्षाचा खेद नाही तर अभिमान आहे. तिला खरं तर वायुसेनेत पायलट बनायचे होते, त्या परीक्षेसाठी तिने कठोर मेहनतही घेतली होती. मात्र त्यात तिला यश आले नाही.

दिशाच्या मते जेव्हा आपल्याला काहीतरी मोठी गोष्ट प्राप्त करायची असते तेव्हा मेहनत घ्यावीच लागते. संघर्षाला शॉर्ट्कट नसतो. तिने फार विचारपूर्वक आपल्या भूमिकांची निवड केली आणि आपली समज सार्थ ठरवली.

 

Firstpost

तिला अनेकदा भूमिका मिळत परंतू रिप्लेस केलं जाई, ह्याचं तिला वाईट वाटायचं पण ती खचली नाही. तिच्याकडे हार मानणे आणि परत जाणे हा पर्याय नव्हताच जणू.

ह्याबाबतीत तिने कमालीची सकारात्मकता दाखविली आणि नकार पचवून स्वतःला आणखी मजबूत बनवण्यावर भर दिला. तिला अभिनयाची उत्तम जाण आहेच शिवाय मनापासून आवड आहे.

त्यामुळे फारशी पार्श्वभूमी नसतानाही तिने आज इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

असं असलं तरी दिशाला स्वतःला पडद्यावर बघणे आवडत नाही. आजवर तिने स्वतःचा कुठलाही सिनेमा पडद्यावर बघितलेला नाही. दिशा जे दिग्दर्शक सांगेल तेच आणि तेवढेच ऐकण्यावर विश्वास ठेवते.

 

m.dailyhunt.in

सध्या ती अनेक प्रोजेक्ट्स वर काम करते आहे शिवाय काही परदेशी ब्रँड ची एंडोर्समेंट सुद्धा करते आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनयात आणखी नवे प्रयोग करायची तिची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने तिची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसून येते आहेच.

तर आता एक खास गोष्ट. आपल्या अभिनयाने भूमिकेच सोनं करणार्‍या दिशाचा ड्रिमरोल काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना?

ऐका तर मग, दिशा अगदी तुमच्या आमच्या सारखी सुपर हिरोंच्या चित्रपटांची जबरदस्त चाहती आहे आणि तिचा ड्रिमरोल आहे वंडर वुमन!

होय, तिला अवेंजर्स सारख्या चित्रपटांत काम करायचे आहे. आणि हिन्दी चित्रपट सृष्टीत जर तिला अशी भूमिका मिळाली नाही तर तिची हॉलीवूडला जाण्याची देखील तयारी आहे. मग त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी बेहत्तर.

 

SheThePeople

म्हणजे आता मार्वल सिरिजमध्ये आपली दिशा झळकली तर नवल वाटायला नको. आज तिच्या वाढदिवशी तिला लवकर तिचं ड्रिमरोल साकारण्याची संधी मिळो आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होवू देत हीच सदिच्छा.

ह्या अत्यंत गोड आणि तितक्याच सशक्त अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version