आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण नेहमी चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहतो की दोन यक्ती मधील वयाचे अंतर हे खूप असत. त्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो.
आपण तुला पाहते रे या मराठी मालिकेत पहिलाच आहे की विक्रांत आणि इशा यांच्या वयामध्ये सुद्धा खूप अंतर होतं.
फक्त तेच नव्हे खऱ्या आयुष्यात असे खूप जोडपे आहेत. प्रेमाला वय नसत म्हणतात ते आपल्याला या सेलिब्रिटीनकडे पाहिल्यावर कळत. कलाकार नेहमी त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत असतात.
काही कलाकार आपल्या वयापेक्षा कितीतरी वर्ष लहान किंवा मोठ्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकले आहेत.
यावरून आपण प्रेम हे आंधळं असतं, असं म्हणूच शकतो. जाणून घेऊयात अश्याच काही कलाकारांबद्दल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१) प्रियंका चोप्रा आणि निक जोन्स
प्रसिद्ध अभिनेत्री आणि देसी गर्ल म्हणूंन ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा ही हॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक निक जोन्स या सोबत विवाहबंधनात अडकली आहे. प्रियांका ही फक्त बॉलीवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूड मध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे.
प्रियांकाला आपण हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. प्रियांका ही निक पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. निक हा २६ वर्षांचा असून त्याने हॉलिवूड स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
यांनी मागील वर्षी जयपूर येते मोठ्या थाटामाटात यांचे शाहीविवाह संपन्न झाला. हे दोघेही नेहमी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून फोटो पोस्ट करताना दिसतात.
२) शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह ७ जुलै २०१५ रोजी झाला आहे. दोघांमध्ये १३ वर्षांचं अंतर आहे शाहिद हा मीरापेक्षा मोठा आहे.
शाहिद हा ३८ वर्षीय आहे तर मीराच वय २५ आहे.
दोघांचे परिवार हे पूर्वी पासूनच एकमेकांना ओळखतात. दोघे फॅमिली फ्रेंड आहेत. शाहिद हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने असे अचानक लग्न केल्यामुळे खुप जणांना धक्का बसला होता.
शहीदच्या लग्नात फक्त मोजकीच मंडळी म्हणजे मित्र परिवार आणि परिवार इतकेच लग्न समारंभात उपस्थित होते.
शहीद कपूर हा आपल्यला त्याच्या नवीन चित्रपट कबीर सिंग मधून लवकरच दिसणार आहे.
३) अमृता सिंग आणि सैफ अली खान आणि करिना कपूर
सैफ अली खानची ही पहिली वेळ नाहीये यापूर्वीही त्याने अमृता सिंग सोबत लग्न केलं होत या दोघांमध्ये १३ वर्षाचं अंतर होतं.
सैफ आली खान हा अमृता पेक्षा १३ वर्षांनी लहान होता. सैफचा २००४ साली अमृता सोबत घटस्फोट झाला.
सैफ अली खान हा त्यानंतर करीना कपूर च्या प्रेमात पडला १६ ऑक्टोबर २०१२ रोजी सैफ आणि करीना यांचे लग्न पार पडेल.
करीना ही सैफ पेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे.
४) दिलीप कुमार आणि सायरा बानू
दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. दिलीप कुमार हे सायरा बानु यांच्या प्रेमात पडले आणि १९६६ मध्ये त्यांच्याशी लग्न केले.
–
हे ही वाचा – या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!
–
या दोघांमध्ये ५ – १० नव्हे तर तब्बल २३ वर्षांचं अंतर आहे. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ते ४५ वर्षांचे होते तर सायरा बानु या २२ वर्षांच्या होत्या.
बॉलीवूड चे कलाकारच नव्हे तर आपले मराठीही कलाकार मागे नाही आहेत.
५) रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा
बॉलीवूड मधील परफेक्ट जोड्यानं पैकी एक म्हणजे रितेश आणि जेनेलिया. हे दोघे सोबत एकदम परफेक्ट वाटतात या दोघांमध्ये ९ वर्षांचं अंतर आहे.
विश्वास बसत नाहीये ना पण हो रितेश हा जेनेलिया पेक्षा ९ वर्षांनी मोठा आहे. रितेश हा ४० वर्षांचा आहे तर जेनेलिया ही ३१ वर्षांची आहे.
हे दोघे ३ फेब्रुवारी २०१२ रोजी यांचा शाहीविवाहसोहळा पार पडला. यांनी हिंदू व ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने विवाह केला.
६) सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर
सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतल सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. सचिन आणि सुप्रिया हे दोघे नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रेमात पडले.
२१ डिसेंबर १९८५ रोजी सचिन-सुप्रिया यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली.या दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे.
ज्यावेळी त्यांचे लग्न झाले तेव्हा सुप्रिया फक्त १७ वर्षाच्या होत्या तर सचिन हे २७ वर्षाचे होते.
७) उमेश कामत आणि प्रिया बापट
मराठीतील क्यूट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या वयात ८ वर्षांचे अंतर आहे. मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध कलाकार पैकी हे आहेत.
दोघांनी सोबत बरेच चित्रपट केले आहेत.
प्रिया बापटने सिटी ऑफ ड्रीमस या हिंदी वेब सिरीज मध्ये काम केले असून ती त्यामधील वादग्रस्त सीन मुळे चर्चेत आहे.
८) अशोक सराफ आणि नावेदिता सराफ
मराठी सिनेसृष्टीतल सुपरस्टार अशोक सराफ हे त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
–
हे ही वाचा – दारूच्या नशेत थेट चेन्नईला जाऊन धर्मेंद्रने थांबवलं हेमामालिनी आणि जितेंद्रचं लग्न!!
–
मात्र अशोक सराफ त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल १८ वर्षांनी मोठे असल्याचे फार जणांना ठाऊक नसावे.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म ६ जून १९६५ चा आहे.
या दोघांच्या वयात तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे.
एकंदरीत या सर्व जोडप्यानं पाहून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की खऱ्या प्रेमात वय हा केवळ आकडाचं असतो. खऱ्या प्रेमात वयापेक्षा भावना महत्वाच्या असतात
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.