Site icon InMarathi

धोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय संस्कृती ही धैर्य, शौर्य आणि विरतेची संस्कृती आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास अनेक विरप्रभुतींच्या पराक्रमाने गौरवान्वीत झाला आहे. आपल्या भारतीय सैन्याने देखील अशाच अनेक पराक्रमांच्या गाथा रचल्या आहेत.

अनेक प्रकारचे सन्मान जसे की ‘विरचक्र’ ‘परमवीर चक्र’ इत्यादी सन्मान आपल्या सैनिकांना त्यांच्या विरता, धैर्य, समर्पण, देशाप्रतीची निष्ठा यासाठी दिले गेले आणि दिले जातात.

दिनांक ५ जून२०१९ रोजी भारत साऊथ आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एम. एस. धोनी याच्या ग्लोव्हजवर दिसलेले ‘बलिदान’ हे भारतीय पँरा स्पेशल फोर्सचे सन्मानचिह्न, ध्येय व देशाप्रतीच्या निष्ठेचे प्रतिक म्हणून दिले जाणारे सन्मानचिह्न आहे.

सदर सामन्यात धोनी हे ‘बलिदान’ चिह्न असलेले स्पेशल ग्लोव्ज घालून खेळताना दिसला.

 

Inkhabar.com

एम.एस.धोनीचे भारतीय सैन्याप्रतीचे प्रेम व आदरभाव सर्वांना परीचयाचा आहे. अनेकदा अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत आपली सैन्यात दाखल होण्याची ईच्छा त्याने बोलूनही दाखवली आहे.

त्याच्या या आदरभावाचा सन्मान म्हणून सन २०११ मध्ये त्याला प्रादेशिक सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

धोनीची नियुक्ती 106 Para TA battalion मध्ये करण्यात आली आहे. जरी हे पद ऑनररी असले तरीही महेंद्रसिंग धोनी याने आग्रा इथे पँरा बेसीक ट्रेनिंग कोर्स तसेच पँरा जंपिंग व पँराशूट हँन्डलींग चे ट्रेनिंग यशस्वीरित्या पुर्ण केले आहे.

जे कोणी भारतीय सैन्यदलाच्या पँरा स्पेशल फोर्समध्ये कार्यरत आहेत त्यांना हा ‘बलिदान’ बँज किंवा चिन्ह वापरण्याची परवानगी आहे.

याच्या आधीदेखील आय.पी.एल. च्या सामन्यांमध्ये त्याने वापरलेल्या टोपीवर तसेच त्याच्या मोबाईल कव्हरवर देखील पँराफोर्सचे हे ‘बलिदान’ चिह्न धोनीने वापरले आहे. नक्की काय आहे ह्या ‘बलिदान’ चिन्हाचा इतिहास?

‘बलिदान’ हे भारतीय सैन्यदलातील श्रेष्ठ व महत्वाचे चिह्न असून सैन्यदलाच्या पँराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्स बटालियनच केवळ हे चिह्न वापरू शकतात.

 

indoframe.com

या बटालियनमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या पँराट्रूपर्स असतात आणि हे सर्व पँराट्रूपर्स हे व्हॉलंटियर्स असतात तर काही सैन्यदलाच्या इतर विभागांतून आलेले असतात.

पँराट्रेनिंग हे एक खडतर व प्रदिर्घकाळ चालणारे प्रशिक्षण आहे. अनेक प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जात व प्रत्यक्ष फिल्डवर्क केलेल्या प्रशिक्षणार्थींनाच केवळ हे चिन्ह वापरता येते ज्याचे पर्सेंटेज फक्त १०℅ आहे.

या पँरा स्पेशल फोर्सचा बेसीक ट्रेनिंग पिरीयड हा कमीतकमी ३ महिन्यांचा असतो जो पँराट्रूपर्ससाठी असतो.

६ महिन्यांचा कोर्स हा पँरा बटालियन्ससाठी असतो.पँरा स्पेशल फोर्समध्ये निवड होण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा पँराट्रूपर असावा लागतो.

स्पेशल फोर्ससाठी निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला हा पुढचा अँडव्हान्स कोर्स पुर्ण करावा लागतो. हा अँडव्हान्स कोर्स वर्षभरात दोनवेळा वसंत व शिशीर ऋतूत आयोजीत केला जातो.

हा प्रशिक्षणाचा कालखंड हा खूप कठिण व दमछाक करणारा तसेच प्रदिर्घ असतो.

प्रशिक्षणादरम्यान अनेक खडतर परिस्थीती, मानसीक, शारीरिक छळवणूकीला सामोरे जावे लागते तर कधीकधी म्रुत्यूलाही. प्रशिक्षणार्थी शारिरीक व मानसीक द्रुष्ट्या कठोर व्हावा यासाठी हे प्रशिक्षण असते.

 

deccanchronicle.com

स्पेशल फोर्स ऑपरेटर होण्यासाठीचा प्रशिक्षण कालावधी हा ३ ते ५ वर्षांचा असतो,जो सातत्यपुर्ण असतो. यामध्ये पँराजंपिंग तसेच पँराशूट हँन्डलिंगचाही समिवेश असतो.

पँराजंपींग मध्ये ३३,५००फूट उंचीवरून कमीतकमी ५० जंप्स मारणे अपेक्षित असते. High Altitude Low Opening व High Altitude High Morning ही दोन्ही टेक्नीक्स शिकवली जातात.

ज्यामधे High Altitude Parachute Penetration System (HAPPS) हँन्डल करण्याचेही ट्रेनिंग असते. कॉम्बँट डायव्हिंग च्या ट्रेनिंगसाठी प्रशिक्षणार्थींना कोचीच्या नेव्हल डायव्हिंग स्कूलमध्ये तसेच बेळगाव( कर्नाटक)येथील बेसीक कमांडो लिडरशीप कँम्पमध्ये पाठवण्यात येते.

सैन्यदलाच्या इतर शाखांप्रमाणेच या पँराकमांडोजना जल,स्थल,वायू या तिन्ही ठिकाणांचे प्रशिक्षण देण्यात येते.

याबरोबरच रोजची २०किमी.ची दौड,वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण,भुसुरूंग शोधणे व नष्ट करणे, पेट्रोलिंग, नाईट पेट्रोलिंग आदिंचाही त्यात समावेश असतो.

त्यांचे ब्रिदवाक्यच जणू त्यांच्या निष्ठेचे प्रतिक आहे”Men apart,every man an emperor”. जरी प्रशिक्षणार्थीने ट्रेनिंग पुर्ण केले तरी अनेक आव्हानात्मक खडतर परीस्थितींना सामोरे गेल्यानंतरच प्रशिक्षणार्थी ‘बलिदान’ हे चिन्ह वापरण्यास पात्र ठरतात. संयम,धीर,निष्ठा यांचे प्रतिक असलेले ‘बलिदान’चिन्ह म्हणूनच मौल्यवान आहे.

 

indiatvnews.com

महेंद्रसिंग धोनीने हे पँरा स्पेशल टास्क फोर्सचे ट्रेनिंग पुर्ण केलेय आणि म्हणूनच तो हे ‘बलिदान’चिन्ह वापरण्यास पात्र ठरला आहे.

२०१९ च्या आय.सी.सी.क्रिकेट वर्ल्ड कप ची भारत आणि साऊथ आफ्रिका एकदिवसीय मँच जेव्हा खेळली गेली तेव्हा भारतीय सैन्याप्रतीचा आदर दर्शवण्यासाठी विकेटकिपींग करताना महेंद्रसिंग धोनी याने ‘बलिदान’ चिन्ह कोरलेले ग्लोव्हज आवर्जून वापरले.

दिवसभर मैदानावर विकेटकिपींग किंवा बँटिंग करताना धोनीच्या हातात तेच ‘बलिदान’ चिह्न असलेले ग्लोव्हज दिसून आले.

असं म्हणतात की लेजंड्स अर्न देअर फेम ऑन देअर ओन बेसीस. सैन्यदलाच्या विशेष टास्क फोर्स मध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत(मानद)असलेला धोनी हा देखील क्रिडाविश्वातला आदर्श आहे.

महेंद्रसिंग धोनी याने भारतीय सैन्यदलाचे विशेष महत्वाचे ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरणे ही त्याने मिळवलेली अचिव्हमेंटच आहे आणि सैन्यदलासाठीची निष्ठादेखील..नाही का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version