Site icon InMarathi

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सर्वात यशस्वी कंपन्यांची गुपितं!

brands featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दररोज जगभरात  नव्या उद्योगांची सुरुवात एका नव्या कल्पनेच्या आधारावर होत असते. प्रत्येक उद्योगाचं लक्ष हे चांगली सेवा प्रदान करणे आणि आपलं उत्पादन बाजारपेठेत विक्री करणे, हे असतं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादनाची विक्री करणे हे त्यातल्या त्यात महाकठीण कार्य आहे.

आज अनेक प्रथितयश बहुराष्ट्रीय उद्योगसमूह अस्तित्वात असून ज्यांनी आपला वेगळेपणा जपत आपल्या कार्यपद्धतीच्या बळावर आपला व्यवसाय सर्वदूर पोहोचवला आहे.

ह्या उद्योगसमूहांनी हे करण्यासाठी अवलंबलेला मार्ग, निर्माण केलेली कार्यपद्धती, उभारलेली रचना आणि नियमांचे काटेकोर पालन आपल्याला थक्क करून सोडणारे आहे.

चला तर आपण जाणून घेऊयात कि जगभरातले १० प्रथितयश उद्योगसमूहांनी आपल्या व्यवसायवृद्धी साठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला आहे.

१) मॅकडोनाल्डस

मॅकडोनाल्डस हि जगातील पहिली फास्ट फूड कंपनी आहे, जिने आपल्या रेस्टॉरंट चेनमध्ये फॅक्टरी असेम्ब्ली लाईनची उभारणी  केली आहे.

 

 

या असेम्ब्लीच्या माध्यमातून मॅकडोनाल्डने कमीत कमी वेळात आपल्या खाद्य पदार्थांची निर्मिती आणि त्या खाद्य पादार्थांची ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी  करण्यात यश संपादन केले आहे.

या असेम्ब्ली लाईनमुळे कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त निर्मिती आणि वेगवान विक्री हे मॅकडोनाल्डने यशस्वीरित्या साध्य केलं आहे.

थायलंड आणि टर्की पासून सुरुवात करत, त्यांनी अवघ्या काही काळात जगभरात आपल्या फॅक्टरी लाईनचा विस्तार केला आहे.

त्यांच्या ह्या जलद सेवेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

२) वॉलमार्ट

वॉलमार्ट ह्या अमेरिकन रिटेल कंपनीने आपल्या सुरुवातीपासूनच कमी दरात अधिकाधिक मालाच्या विक्रीचे तत्व अंगिकारले होते.

 

 

ह्या बळावर वॉलमार्टने विविध ऑफर्सच्या माध्यमातून अत्यंत कमी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देत प्रचंड मोठया प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यात यश संपादन केले आहे.

वॉलमार्ट हि जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी म्हणून उदयास आली असून, जगभरात वॉलमार्टच्या २८ देशात ५९ बॅनर्सच्या खाली तब्ब्ल ११,६९५ शाखा आहेत.

जरी त्यांना कमी दरांमुळे प्रत्येक उत्पदनाच्या विक्रीमागे तोट्याचा सामना करावा लागत असला, तरी देखील त्यांचं एकूण उत्पन्न हे तुलनेने इतरांपेक्षा अधिक आहे. त्यांचं वार्षिक उत्पन्न ४८५ बिलियन डॉलर्सच्या घरात आहे.

३) अँपल

अँपल हि सध्याच्या घडीला जगातल्या सर्वात जास्त लोकप्रियता असणाऱ्या टेक्नॉलॉजिकल ब्रॅण्ड्सपैकी एक आहे.

अँपलच्या यशामागचं सर्वात मोठं कारण आहे त्यांच्या उत्पादनात असलेला युनिकपणा आणि दर उत्पादनात येत  जाणारी नाविन्यता होय.

आज अँपलच्या यशामागे अँपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्सचा मोठा  वाटा आहे.

 

अँपलचं प्रत्येक उत्पादन हे नाविन्यते बरोबरच भविष्याची कास धरणारं आहे. सोबत त्यांची ग्राहकसेवा आणि रचना हि देखील सुबक आहे.

४)  आदिदास

आदिदास हे सध्याच्या क्रीडासामग्री निर्मिती व विक्रीच्या विश्वातील एक अग्रणी नाव आहे. आदिदासच्या यशामागचं सर्वात मोठं कारण आहे, त्यांची गुणवत्ता होय.

 

आदिदासने याबरोबरच विविध जागतिक ब्रॅण्ड्ससोबत टाय अप करून आपली व्यवसायवृद्धी केली आहे.

तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करत आपल्या ग्राहकांना वेगवेगळे पर्याय देऊ केले आहेत. आदिदास हि आजच्या घडीला जगभरात क्रीडा साहित्या बरोबर इतर अनेक उत्पादनांची निर्यात करते.

५) डिस्ने

वॉल्ट डिस्नेने मुहूर्तमेढ रोवलेल्या ह्या समूहाची  सुरुवात मिकी माउसच्या एका कार्टून पासून झाली, तिथून आजमिती पर्यंत डिस्नेची वाटचाल हि एक जागतिक कीर्तीच्या ब्रँडपर्यंत राहिली आहे.

 

आबालवृद्धांना डिस्नेने भुरळ घातली आहे.

आज ह्या ब्रॅंडने मोठ्या प्रोडक्शन हाऊस पासून ते अम्युझमेंट पार्क्स पर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे.

ते सात्यत्याने नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणत आहेत.

६) अमेझॉन

अमेझॉनची प्राथमिकता नेहमी त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या प्रतिस्पर्धीपेक्षा जास्त राहिली आहे. अमेझॉनचा आज जागतिक मार्केटमध्ये दबदबा आहे.

अमेझॉनच्या ग्राहकांपर्यंत योग्यवेळेत त्यांचे प्रोडक्टस पोहोचवण्याची यंत्रणा हि खूप प्रभावी पणे कार्यरत असते.

सोबत ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा बाबतीत ते कुठल्याही प्रकारची हयगय करत नाहीत.

 

अमेझॉन हे असंख्य प्रॉडक्ट्सचं माहेरघर असून, जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची सेवा पोहोचली आहे.

७) स्टारबक्स

स्टारबक्स हा जागतिक स्तरावरचा कॉफी शॉप चेन्सचा एक ब्रँड आहे. स्टारबक्सची कॉफी हि जगप्रसिद्ध असून, ती एक प्रथितयश संस्था आहे.

 

त्यांनी आपल्या जगभरातील कॉफी शॉप्समध्ये कस्टमर फ्रेंडली वातावरणाची निर्मिती करण्यात यश मिळवलं असून स्टारबक्स एकदा येऊन गेलेल्या कस्टमरला पुन्हा पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे.

स्टारबक्स ने आपल्या प्रोडक्टसची गोपनीयता राखण्यात यश मिळवलं असून, त्यांनी जगभरात एकाच प्रकारची क्वालिटी ग्राहकांना प्रदान केलं आहे.

८) गुगल

गुगल हे आज जागतिक स्तरावरील एक सुप्रसिद्ध सर्च इंजिन आहे.

गुगलने अमर्याद माहितीचा भांडार लोकांसाठी खुला केला आहे.

 

गुगलने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून योग्य ती माहिती योग्य त्या स्वरूपात लोकांपर्यंत सहजगत्या पोहचावी म्हणून नवीन प्रकारच्या अल्गोरिदमची निर्मिती केली असून, त्या माध्यमातून कुठलिही गोष्ट सहजगत्या शोधणं  लोकांना शक्य झालं आहे.

गुगलने यामुळे प्रचंड यश कमावले आहे.

९) ebay

ebay सध्या जगातील सर्वात मोठी ऑनलाईन देवाण घेवाणीला चालना देणारी साईट असून, ह्या साईटच्या माध्यमातून लाखो विक्रेत्यांना लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचणे सहजगत्या शक्य झाले आहे.

 

ह्या कंपनीने दोन नव्या कंपन्या तसेच पे पाल नावाचं मनी ट्रान्सफर ऍप विकत घेतलं होतं. आज ebay जागतिक  स्तरावर प्रचंड नफा कमवत आहे.

१०) कोको कोला

कोको कोला हे जगातील सर्वाधिक खपाचे शीतपेय आहे. “कोको कोला” हा “ओके” नंतर जगभरात समजला जाणारा दुसरा लोकप्रिय शब्द आहे.

 

 

यावरून लक्षात आलंच असेल कि कोको कोला आज जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला आहे.

ह्या  मागे आहे कोको कोलाची गुणवत्ता आणि मार्केटिंग स्किल्स, सोबत कोका कोला बनवायची सीक्रेट रेसिपी जी जगभरात चर्चेचा विषय आहे.

कोको कोला हे सुरवातीपासूनच सर्वाधिक लोकप्रिय असं शीतपेय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version