स्टीव्ह जॉब्सने ३० वर्षांपूर्वी केलेल्या या भविष्यवाण्या आज तंतोतंत खऱ्या ठरल्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
८० च्या दशकात स्टीव्ह जॉब्जने टेक्नोलॉजीच्या बाबतीत काही भाकितं केली होती. जी आज तंतोतंत खरी ठरली आहेत.
जाणून घेऊया स्टीव्ह जॉब्ज नेमकं काय म्हणाला होता, आणि सद्यस्थितीत आपण काय फरक अनुभवत आहोत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१] कम्प्युटर करमणुकीचे साधन ठरेल –
१९८५ साली प्लेबॉयला मुलाखत देताना स्तीव्ह्ने भाकीत केले होते की, पर्सनल कम्प्युटर्सचा वापर घरोघरी होईल.
यावेळेपर्यंत कम्प्युटर्सचा वापर फक्त कंपनीज, शाळा आणि काही घरातून व्यावसाय चालवला जातो अशा ठिकाणी व्हायचा.
युएस सेन्सर ब्युरोच्या अहवालानुसार १९८४ मध्ये अमेरिकेत फक्त ८% घरांमध्ये कम्प्युटर वापरला जायचा. २०१५ पर्यंत हाच आकडा ७९% इतका वाढला.
ज्याप्रमाणे स्टीव्हने भाकीत केले होते, अनेक लोक काम्पुटरचा वापर नवनिर्मितीसाठी करतात. मग तो टीव्ही, पाहण्यासाठी असो, गेम खेळण्यासाठी किंवा मित्रांशी चॅट करण्यासाठी असो.
२] कम्प्युटर सर्वाना जोडणारा दुवा असेल –
याच मुलाखतीमध्ये जॉब्जने कम्प्युटरच्या वाढत्या वापरामागे कोणते अपरिहार्य कारण असेल त्याचे देखील सपष्टीकरण दिले होते.
“जगभरात पसरलेल्या संवादाच्या जाळ्याशी जोडून घेण्यासाठी लोकांना याची गरज भासेल” असे तो म्हणाला होता.
त्याचे हे वाक्य टीम बर्नर्स-लीज यांच्या पहिल्या वर्ल्ड वाइड वेबचे काम सुरु होण्याआधी चार वर्षे पूर्वीचे आहे आणि यानंतर पाच वर्षांनी पहिले वेबपेज ऑनलाईन पोस्ट करण्यात आले.
हे ही वाचा –
===
३] माउसच्या सहाय्याने सूचना देणे सोपे –
१९८३ पूर्वी लिसा काम्पुटर बाजारात येण्या आधी कम्प्युटरला देण्यात येणाऱ्या सूचना या कीबोर्ड वरून टाइप करून द्याव्या लागत. माउसमुळे अशा सूचना देण्याचे काम सोपे झाले.
माउसमुळेच कट, कॉपी, पेस्टिंग अशी कामे करणे जास्त सोपे आणि जलद झाले.
सगळ्या कमांड इतक्या सोप्या झाल्या की कम्प्युटरचे अत्यल्प ज्ञान असणारी व्यक्तीदेखील सहज कम्प्युटर हाताळू शकेल.
आज ३५ वर्षानंतर आपण माउस हा काम्पुटरचा अविभाज्य भाग असल्याचेच मानतो.
आत्ता तर अॅपल सारख्या कंपन्यांनी स्मार्टफोन, टॅबलेट अशा माध्यमातून लोकप्रिय ठरलेली अॅडव्हान्स टचस्क्रीन टेक्नॉलॉजीमुळे जादूच घडली आहे.
४] सर्वत्र वेब डायल टोन उपलब्ध असेल :
१९९६ साली वायर मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉब्जने असे भाकीत केले होते की, जगभरातील लोक वेबशी जोडले जातील आणि त्याचा वापर करतील, वेबचे सर्वव्यापी महत्व जॉब्जला अधोरेखित करायचे होते.
डायल-अप इंटरनेट अॅक्सेसचा जमाना आत्ता निश्चितच मागे पडला आहे.
हे ही वाचा –
===
एप्रिल २०१९ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जगभरात इंटरनेट सेवेचा लाभ घेणारे ४.४ अब्ज ग्राहक आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंखेच्या ५६% लोक नेट वापरतात, ज्यामध्ये ८१% लोक हे विकसित देशातील आहेत.
५] महत्वाची माहिती आपसूक साठवण्याची सोय
वायर मासिकाला १९९६ साली दिलेल्या मुलाखतीत जॉब्जने असे भाकीत केले होते की, डेस्कटॉपवर आपण साठवलेल्या गोष्टींची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते.
मात्र इथून पुढे स्टोरेजसाठी लोकांना पर्याय देणे गरजेचे आहे. तसेही आपले फोटोज, फाइल्स, अशा अनेक गोष्टी आत्ता आपण अॅपल क्लाउड किंवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह करतो.
आपल्या स्टोरेजची काळजीही घ्यावी लागत नाही आणि त्या सांभाळून ठेवण्याची देखील गरज नाही. तो म्हणाला होता, “माझा डाटा मी कधीही साठवून ठेवत नाही, त्यासाठी मी इमेल आणि वेबचाच वापर करतो.
यासाठी मला अतिरिक्त स्टोरेजची गरज भासत नाही. कोणत्याही गोष्टीची आठवण ठेवण्यासाठी मी स्वतःच स्वतःला इमेल करतो. तोच माझा स्टोरेज.”
६] “पुस्तकएवढा कम्प्युटर बनवणे” हेच अॅपलचे धोरण असेल
१९८३ च्या काळात पर्सनल कम्प्युटर फार मोठे आणि जड ठोकळ्यासारखे असत. जे फक्त प्रयोगशाळा किंवा ऑफिसेसमध्येच वापरता येत असत.
पण, अस्पेन येथील इंटरनॅशनल डिझाइन कॉन्फरन्समध्ये बोलताना, जॉब्जने मोबाइलपेक्षा काही वेगळ्या डिव्हाइसची कल्पना मांडली होती.
तो म्हणाला होता, “तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, तुम्ही तुमच्या खिशात कम्प्युटर ठेवू शकाल आणि अगदी पाच मिनिटात तो तुम्ही वापरायलाही शिकाल.”
याचवेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हंटलं होतं,
“मी विचार करतोय की, काम्पुटर ऐवजी एक छोटासा बॉक्स किंवा एक छोटी पाटी जी नेहमी मला सोबत ठेवता येईल, असा जर काही नवीन शोध लागला तर किती छान होईल.”
२०१९ मध्ये आपल्याल्या हे शब्द टॅबलेट किंवा किंडल किंवा स्मार्टफोनसाठीच वापरले असतील असे वाटल्यास त्यात काही आश्चर्य नाही.
७]आपली नेमकी गरज ओळखणारा छोटा दोस्त
न्यूजविकला दिलेल्या या मुलाखातीमध्येच जॉब्जने कम्प्युटर्स हे एजंट्स असतील असे वर्णन केले होते.
जे आपल्या आवडीनिवडीवर लक्ष ठेवतील, माहिती साठवतील, आपल्याशी बोलतील आणि आपली नेमकी गरज काय आहे हे देखील ओळखतील,
ज्याला जॉब्जने “बॉक्समधील एका छोटा दोस्त” म्हंटले होते.
पंचवीस वर्षानंतर, अलेक्सा आणि सिरी हे लाखो लोकांचे अदृश्य मदतनीस बनले आहेत, हे आपण पाहतोच आहोत.
८] खरेदीसाठी दुकानात जाण्याची आवश्यकता नाही.
१९९५ साली काम्पुटर वर्ल्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅवार्ड्स फाउंडेशन येथे बोलत असताना,
नेटमुळे मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होईल हे सांगताना जॉब्जने हे सांगितले की व्यापारावर याचा फार मोठा परिणाम दिसून येईल.
छोट्या स्टार्टअप उद्योगांना जुन्या आणि बड्या उद्योगांशी स्पर्धा करताना, इंटरनेटच्या मदतीने वितरण खर्च कमी करून आपला व्यवसाय वाढवू शकतात याचे भाकीत त्याने फार पूर्वीच केले होते.
आज आपण पाहतो, इंटरनेट वरून व्यवसाय करणाऱ्या शेकडो कंपन्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी पुरवणारे तज्ञ ते अमेझॉन सारख्या महाकाय विस्तार असलेल्या कंपन्या देखील आहेत.
ऑनलाईन व्यापार करण्यासाठी वेबवर मोफत बोर्ड मिळेल त्यासाठी पैसे घालावे लागणार नाहीत, असेही भाकीत जॉब्जने केले होते.
१९९६साली वायर्ड मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना तो म्हणाला होता,
“लोकं खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जाणार नाहीत. उलट, त्यांना हव्या त्या वस्तू ते नेटवरूनच खरेदी करतील. याकडे जर मोठमोठ्या कंपन्यांनी लक्ष नाही दिले तर ऑनलाईन मार्केटमध्ये त्यांना भवितव्य राहणार नाही, त्यांना याची झळ सोसावी लागेल.”
आत्ता आपण पाहतोय की वालमार्ट सारख्या मोठमोठ्या कंपन्याची दुकाने बंद करावी लागत आहेत आणि अमेझॉनसारखी कंपनी इंटरनेट वरील व्यापारातून अब्जावधी डॉलर्सचा फायदा मिळवत आहे.
म्हणजेच बड्याबड्या कंपन्यांना जॉब्जने आधीच धोक्याचा इशारा दिला होता.
९] माहितीचा अतिरिक्त साठा –
१९९६ साली ग्राहक अजून फक्त एकमेकांना इमेल पाठवण्याचा सराव करत होते तेव्हा आपण भरमसाठ माहितीची देवाणघेवाण करू याची कुणी कल्पना देखील केली नव्हती.
१९९६ साली जॉब्जने याचे संकेत दिले होते तरीही एवढी प्रचंड माहिती उपलब्ध होईल याचा कुणीच अंदाज बांधला नसेल.
आता आपल्या फोनवर सेकंदासेकंदाला काही तरी नवीन घडामोडी घडल्याची माहिती मिळतच असते.
एवढ्या माहितीच करायचं तरी काय हे देखील कधीकधी आपल्याला कळत नाही. आता २०१९ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले की, भारतात एक व्यक्ती दिवसातून ६० पेक्षा जास्त वेळा फोन चेक करते.
१०] १० वर्षाच्या वयात तंत्रज्ञानाशी ओळख
स्टीव्ह जॉब्जचे आणखी एक भाकीत होत बदलत्या तंत्रज्ञानाला तरुणांकडून मिळणारी स्वीकाऱ्हार्ता.
नवनव्या तंत्रज्ञानाला तरुणाची अधिक पसंती मिळेल असे तो म्हणाला होता.
याबाबत स्पष्टीकरण देताना तो म्हणाला होता, “तुम्ही जेव्हा १० वर्षांचे होता तेव्हा अर्थातच या गोष्टी तुम्ही ऐकल्या देखील नसतील पण येत्या काळात १० वर्षाच्या मुलांच्या हातात देखील, आयफोन असतील.”
अमेरिकेत १० वर्षाच्या वयातच मुलांना पहिला फोन मिळतो आणि महत्वाचं म्हणजे तो हाताळावा कसा हे देखील त्यांना शिकवावं लागत नाही इतका मुलांना तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा वेग आला आहे.
त्याचे हे भाकीत देखील अगदी तंतोतंत खरे ठरले.
===
हे ही वाचा – २१ व्या शतकातही नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच खऱ्या ठरणार का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.